गुरुवारी या वेळी दिवाळीत करा हा गुप्त उपाय आणि पूजा, पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आई लक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो ४  नोव्हेंबर २०२१  गुरुवारचा दिवस आणि या दिवशी लक्ष्मी पूजन आपण करणार आहोत. हा दिवस जीवनातील समस्त प्रकारचे दुःख, दारिद्र्य, कष्ट यांचा निवारण करणारा दिवस मानला जातो. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा हा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी तुमच्या जीवनातील कोणत्याही प्रकारची संकटे, दुःख, कष्ट दूर करण्यासाठी घरातून गरिबी दूर करण्यासाठी आपण रस्त्याच्या कडेला उगवलेल हे एक रोपटं मुळासकट उपटून नक्की घरी आणा.

व स्वतःच्या डोक्यावरून ३ वेळा ओवाळून आपण ते एखाद्या सुनसान ठिकाणी टाकून द्या किंवा एखाद्या चौकात टाकून द्या. असे केल्याने आपल्या घरातील अलक्ष्मी निघून जाते किंवा कोणाची नजर लागली असेल किंवा बाधा असेल तुम्हाला यश प्राप्त करण्यात जे काही अडथळे येतात हे सर्व अडथळे यामुळे दूर होतात जीवनातील कोणत्याही क्षेत्रात यशाची प्राप्ती होते. आज आपण ज्या रोपट्या बद्दल जाणून घेणार आहोत याच नाव अपामार्ग असा आहे.

मित्रांनो  कोणत्याही रस्त्याच्या कडेला हे रोपटं तुम्हाला सहज मिळून जाईल. तंत्र मंत्र शास्त्रात या रोपट्यास भय, दुःख , कष्ट निवारक मान्यता आलेलं आहे. आणि जी दिवाळीची अमावस्या असते या अमावस्येला या अपामार्ग रोपट्यामध्ये जी शक्ती आहे ती कोट्यावधी पटीने अधिक वाढते अशी मान्यता आहे. म्हणून हे रोपटे अश्विन अमावस्येला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण उपटून आणायचं आहे. आणि स्वतःच्या डोक्यावरून ३ वेळा ओवाळायच आहे आणि त्यानंतर ते रोपटे कोणत्याही चौकात किंवा सुनसान ठिकाणी ते फेकून द्यायचे आहे.

यामुळे तुमच्या डोक्यावर प्रचंड कर्ज असेल दुःख असेल संकटे असतील या सर्वातून मुक्ती मिळते व घरातून अलक्ष्मी व गरीबी निघून जाते. तंत्र शास्त्रात अस वर्णन केलं जातं की गरिबी दूर करणारा हा सर्वोत्तम प्रथम उपाय आहे यापेक्षा कोणताही उत्तम उपाय नाही.याची विधी आपण ४  नोव्हेंबर अश्विन अमावस्येच्या सकाळी लवकर उठून आणि स्नान करून सूर्योदय होण्यापूर्वी तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये सूर्योदयापूर्वी १२ मिनिटे आधी आपण या अपामार्ग झाडाजवळ जायचं आहे व झाड मुळासकट उपटायच आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे.

घरी आपल्यानंतर सूर्योदयाच्या १  तासाच्या आत हा उपाय आपल्याला पूर्ण करायचा आहे. जर 6 वाजता सुर्योदय होत असेल तर 7 वाजण्याच्या आधी हा उपाय पूर्ण व्हायला हवा. हे रोपटे उपटून घरी आल्यावर ३ वेळा हा मंत्र बोलायचा आहे. मंत्र असा आहे ।।आता मार्ग लते देवी अपवर्ध प्रवेश अलक्ष्मी नास्य नास्य मन ग्रहस्थितीत सर्व संपत्तीस निवारे निवारे सर्व संकटे जोरी जोरी मनुष्य दृष्टी पिशाच्च दृष्टी राक्षस दृष्टी ब्रेताण दृष्टी याक्ष दृष्टी गरुड दृष्टी पक्षी दृष्टी पशु दृष्टी सर्व दृष्टी नास्य नास्य जोरीय जोरीय पीडा निवारे निवारे सर्व संकटे विनाशे विनाशे मम सर्व साधना मोचे मोचे सर्व अपत्ये आणि उद्धार्य उद्धार्य भगवती अपामार्गे अपवर्ग प्रदे कल्यानम गुरूमे स्वाहा।

प्रत्येक १ मंत्र ऐकताना आपल्या डोक्यावरून एकदा हे रोपटं ओवाळायच ३ वेळा आपण हा मंत्र ऐका आणि ३ वेळेस हे रोपटे ओवाळा त्यानंतर आपण हे रोपटं जवळपासच्या चौकातमध्ये जिथे ४ रस्ते एकत्र येतात तिथे फेकून द्या. हे रोपटे फेकल्यानंतर पाठीमागे वळून न बघता घरी परत यायचं आहे स्वच्छ अंघोळ करायची आहे आणि नवीन वस्त्र परिधान करायचं आहे आणि सकाळी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे. व लक्ष्मी पुढे नतमस्तक होऊन प्रार्थना करा की आम्ही या अश्विन अमावस्येस या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा उपाय केलेला आहे या उपायच फळ तुमच्या कृपेने आम्हास प्राप्त होवो. अशी प्रार्थना करा घरात गरिबी आहे दुःख आहेत तुमच्या ज्या समस्या आहेत ती बोलून दाखवा आणि हे समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *