Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

या राशीच्या लोकांसाठी सुरु होणार आहे खूप त्रास दायक काळ, पुढील अडीच वर्षे राहावं लागणार सांभाळून..बघा आपली राशी तर

नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच ग्रहांची स्थिती देखील बदलत आहे. आणि अशा स्थितीत आता अडीच वर्षानंतर शनि हे आपली राशी बदलणार आहे. शनीची राशी बदलताच अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशांतता सुरू होणार आहे. विशेषत : ज्या राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे किंवा शनी धैय्या सुरू आहेत, अशा राशींवर शनीच्या संक्रमणाचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

शनीचे राशी परिवर्तन हे २९ एप्रिल रोजी होणार असून या दिवशी न्यायाची देवता शनिदेव हे मकर राशी मधे प्रवेश करणार आहेत आणि 29 मार्च 2025 पर्यंत ते या राशीमधे ते राहणार आहेत. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अडीच वर्षांचा हा जो काही कालावधी आहे तो नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात भूकंप आणू शकतो.

तर सर्व प्रथम, आम्ही तुम्हाला सांगतो की शनीची दशा सर्व लोकांसाठी वाईट ठरत नाही. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी मजबूत स्थितीत आहे, त्यांना शनि साढेसातीमधे किंवा शनी धैय्यामध्ये लाभ होण्याची दाट शक्यता निर्माण होत असते. यासोबतच ज्या कोणाच्या कुंडलीत शनि कमकुवत स्थितीत आहे त्यांना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते.

शनीच्या या संक्रमणामुळे कुंभ राशीच्या लोकांना सर्वाधिक त्रास होणार आहे. कारण शनी साडेसातीचा अत्यंत क्लेशदायक पर्व त्यांच्यावर सुरू होणार आहे. शास्त्रानुसार, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शनी साढेसातीचे तीन चरण आहेत, ज्यामध्ये याचा दुसरा टप्पाहा सर्वात जास्त त्रासदायक असल्याचा मानला गेला आहे.

या दरम्यान, कुंभ राशीच्या लोकांवर हा चरण 29 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे आणि हा टप्पा 29 मार्च 2025 रोजी संपेल. त्यामुळे या राशीच्या लोकांनी खूप सावध राहण्याची गरज आहे. या काळात कोणतेही काम अत्यंत सावधपणे करा. तुम्ही ही खबरदारी घ्यायला हवी : या काळात तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नये ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.

कारण तुमच्यासोबत विश्वासघात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि त्याच बरोबर कधीही एकट्याने प्रवास करू नका कारण असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कामाच्या ठिकाणी कोणतेही काम हे पूर्णपणे  त्या कामाला तपासल्यानंतरच आणि त्या कामाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर च करा.

त्याच प्रमाणे कामाच्या ठिकाणी पूर्णपणे शांत राहण्याचा प्रयत्न तुम्ही करा. कोणाशीही भांडू नका. आणि फक्त तुम्ही तुमच्या कामाशी काम चालू ठेवा. शनिदेवाची पूजा तुम्ही नियमित करावी आणि कोर्ट केसेसपासून शक्य तितके दूरच राहावे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हे अवश्य करा : सूर्यास्तानंतर एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या किंवा एखाद्या मंदिरात असणाऱ्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ तुम्ही दिवा लावावा.

त्याच बरोबर हा उपाय जर तुम्ही मनोभावे केला तर या उपायाने तुमची आर्थिक समस्या ही लवकरच दूर होईल. आणि तसेच पिंपळाला जल अर्पण करून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आणि त्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत.  कोणत्याही गरीब व्यक्तीला अन्नदान हे तुम्ही जरूर केले पाहिजे, असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमचे दारिद्र्य दूर होण्यास मदत होते.

शनिदेवाला तेल अर्पण करून तुम्ही त्यांची पूजा करा. त्याच बरोबर शनिदेवाला तुम्ही निळी फुले अर्पण केले तर ते तुमच्यासाठी उत्तम असेल. त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की शनिदेवाची पूजा करताना प्रत्यक्ष शनीची मूर्ती ही तुम्ही बघायची नाही आहे. येणाऱ्या प्रत्येक शनिवारी सकाळी सकाळी आंघोळ करून तुम्ही तेलाचे दान करावे. आणि हे सर्व केल्यानंतर तुम्ही एका भांड्यात तेल घ्या आणि त्या तेलामध्ये तुमचा चेहरा पहा. आणि यानंतर ते तेल एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *