Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

कोणत्या राशीच्या मुलींना मिळतो सर्वात चांगला नवरा…या मुलींच्या नशिबात श्रीमंत व देखणा नवरा असतो..

नमस्कार मित्रांनो,

आपल्या मुलींसाठी योग्य वर मिळावा अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. प्रत्येक मुलींना असं वाटत की तिचा होणारा पती तिचा आदर करणारा असावा, आपल्यावर खुप प्रेम करावे असे जोडीदार आई-वडिलांनी आपल्यासाठी निवडावा जने करून आयुष्य मजेत जाईल अशी प्रत्येक मुलींची अपेक्षा असते.

जोतिष शास्त्रात वधू- वरा बद्दल त्यांच्या राशींना अनुसरून बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. कुमारी मुलींना त्यांचा राशीनुसार कोणत्या प्रकारचा वर मिळेल त्याबद्दल सुद्धा सांगण्यात येतो. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या राशींच्या मुलींना कशा प्रकारचा नवरा मिळू शकतो.

मेष रास : जोतिष शास्त्रानुसार मेष राशींच्या मुलींना सुंदर, उच्चशिक्षित वर मिळतो. इतकेच नाही तर त्यांचा पती धार्मिक रूपाचा असल्याचा सुद्धा सांगितलं जातं.

वृषभ रास : जोतिष शास्त्रानुसार या राशींच्या मुलींच्या पतीला आयुष्यात खुप संघर्ष करावा लागू शकतो. तसेच तिच्यापेक्षा कमी शिकलेला मुलगा मिळण्याची सुद्धा शक्यता असते.

मिथुन रास : या राशींच्या मुलींना गर्विष्ठ पती मिळण्याची शक्यता असते. त्यांना राग ही पटकन येतो. कर्क रास : या राशींच्या मुलींना जोतिष शास्त्रानुसार त्यांचा पती आदर करणारा मिळतो. पण त्याच्या म्हणण्यानुसार जर काही घडलं नाही तर त्याचा पारा चढू शकतो.

सिंह रास : जोतिष शास्त्रानुसार या राशींच्या मुलींना आदरणीय पती मिळतो. त्यासोबतच त्यांची होणारी मुलं सुद्धा स्वभावाने चांगली असतात.
कन्या रास : या राशींच्या मुलींचे पती चंचल असतात. चंचलता जरी अंगी असली तरी दिसायला मात्र त्याचे पती स्मार्ट असू शकतात.

तुला रास : या राशींच्या मुलींचे पती त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल खुप गंभीर असतात. आणि त्यांना छोट्या-छोट्या गोष्टींचा राग ही येण्याची शक्यता असते. वृश्चिक रास : वृश्चिक राशींच्या मुलींचे पती स्वभावाने खुप चांगले असतात. तसेच त्यांना उत्तम संवाद सादन्यामध्ये रस असतो. आणि त्यांचे पती रोमँटिक असल्याचे सुद्धा सांगण्यात येतं.

धनु रास : धनु राशींच्या मुलींना भाग्यवान नवरा मिळतो. जोतिष शास्त्रानुसार त्यांचे पती त्याचं म्हणणं ऐकण्यास उत्सुक असतो.
मकर रास : मकर राशींच्या मुलींना गोड स्वभाचा नवरा मिळतो. यांच्या पतीमध्ये कठीण प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता सुद्धा असते.

कुंभ रास : या राशींच्या मुलींचे पती एकलकोंडी स्वभावाचे असू शकतात. या लोकांना एकटं राहणं आवडत. मीन रास : जोतिष शास्त्रानुसार या राशींच्या मुलींना सुंदर व चांगला पती मिळतो. शिवाय आर्थिक दृष्ट्या ही सक्षम असतो. तर तुमची रास कोणती आहे आणि याबाबतीत तुमचा काय अनुभव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *