नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या मंत्रांनी आपल्या घरामध्ये सुखशांती येते आणि ते आपण रोज सायंकाळी म्हणायचे आहे. मित्रांनो आपल्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये कितीतरी मंत्र सांगितलेले आहेत. सर्व देवी, देवता, ग्रह, नक्षत्र, मनुष्य, प्राणी, पक्षी, कीटक या सर्वांवरच मंत्र लिहिले गेले आहे.
या सर्व मंत्रांमध्ये सर्व भगवंतांच्या या रचनेबद्दल माहिती सांगितली गेली आहे. मित्रांनो आपल्या सर्व प्राचीन वेद पुराणांमध्ये, मंत्र्यांमध्ये इतकी शक्ती आहे की ते आपले संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते.या मंत्राचा जाप केल्याने आपल्या आसपासचं परिवरन शुद्ध होते प्रसन्न होते आणि पवित्र होऊन जाते.
आपल्या मनाला देखील शांतता वाटते कायम ते प्रसन्न राहते यामुळे आपल्या आसपासच्या वातावरणात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो.आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या वेळी, जेवण करताना, झोपताना अशा प्रत्येक वेळी उच्चारण्याचा मंत्र सांगितलेले आहे.
आपल्या रोजच्या या जीवनामध्ये आपण कोणत्या मंत्रांचा उच्चार करावयाचा त्यांचे वर्णन आपल्या धर्मग्रंथात केलेले आहे. कोणत्या मंत्रामुळे आपले जीवन साफलदाई व सुखशांती ने बदलून जाईल हे आज आपण पाहणार आहोत. मंत्रांमध्ये इतकी शक्ती असते की त्याच्या उच्चारण यामुळे आपल्या जीवनातील दारिद्र्य नष्ट होते, संकट समस्या नाहीशा होतात. नकारात्मकता निघून जाते आणि आपलं आयुष्य सुख-समृद्धी आणि धनसंपदने भरून जाते.
रोज सकाळी उठल्यानंतर देवघरामध्ये सर्व प्रथम हा मंत्र म्हणावा :
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥
आपल्या हिंदू धर्मामध्ये तसेच आपल्या घरातील आजी आजोबा आपल्याला सांगतात की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपले हात जोडून देवी लक्ष्मी, देवी सरस्वती, व श्रीहरी विष्णू यांचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार करावा.म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होईल व आपला संपूर्ण दिवसही चांगल्या पद्धतीने व्यतीत होईल.
दुसरा मंत्र :
त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव।।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव।
त्वमेव सर्व मम देवदेव।।
या श्लोकाचा अर्थ आहे भगवंता तुम्हीच माझी आई आहात आणि तुम्हीच माझे वडील आहात. तुम्हीच माझे भाऊ आहात तर तुम्हीच मित्र आहात. तुम्हीच माझी विद्या आहात आणि तुम्हीच माझे धनही आहात. भगवंता तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात.
पुढील मंत्र सूर्य देवांसाठी :
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते,
अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।
मित्रांनो म्हणजेच हजारो किरणांनी तेजस्वी होणाऱ्या हे जगताच्या स्वामी सूर्य देवा माझ्यावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या व माझ्याकडून अर्पण केलेल्या या जलाचा स्वीकार करावा.दररोज सकाळी सुर्यदेवांना अर्ध्य अर्पण करताना या मंत्राचा उच्चार केल्यास आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य व कष्टांचा नाश होतो.
पुढील मंत्र :
ॐ भूर्भुवः स्व: तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥
हा गायत्री मंत्र आहे आपल्या धर्मशास्त्रानुसार गायत्री मंत्र सर्व मंत्रांत मधून श्रेष्ठ असा मंत्र आहे. या मंत्राचा जप आपण कोणत्याही वेळी भगवंतांचे पूजन करताना करू शकतो.
परंतु जर आपण पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी पासून ते सूर्योदय होई पर्यंत पाच मिनिटे तसेच दुपारी सूर्य आपल्या डोक्यावर असतो त्यावेळी पाच मिनिटे आणि सूर्यास्त होण्याच्या पूर्वी पासून ते सूर्यास्त होईपर्यंत पाच मिनिटे जर आपण या मंत्राचा जप केला तर आपल्याला सुख शांतता समृद्धी प्राप्त होत.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.