Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

श्रीकृष्ण सांगतात या दिशेला जेवण केल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते..तसेच अकाली मृत्यू होण्याचा धो’का वाढतो..जाणून घ्या

नमस्कार,

आपलं ध’र्मशास्त्र जीवनातील सर्वच गोष्टींबद्दल खूप सुंदर मार्गदर्शन करते. सकाळी कधी उठावे , वर्तन कसे करावे, कोणते कार्य करावे, कोणते कार्य करण्याची कोणती दिशा योग्य आहे, या विषयी संपूर्ण माहिती आपल्या ध’र्मग्रंथाने दिलेली आहे. जेवण करताना कोणत्या दिशेला तोंड करून जेवण करावे, कोणते जेवण आपल्या जीवनात हानिकारक आणि कोणते भोजन जीवनासाठी लाभदायक, कोणत्या दिशेला तोंड करून जेवल्यास लाभ होतो ज्यामुळे जीवन आपल्याला सुख समृद्धी प्रदान करते. या विषयी बऱ्याच जणांना माहिती नसते.

वास्तुशास्त्रात याविषयी काही नियम सांगितलेले आहेत, जेवण करताना काय करावे व काय करू नये याविषयी सविस्तर वर्णन वास्तुशास्त्रात आहे, चुकीच्या दिशेला बसून जेवण केल्याने ते जेवण आपल्या शरीराला लाभदायी ठरत नाही. त्यापासून आपल्या शरीराला हानी पोहोचते. जेवण करण्यापूर्वी काही मंत्रांचा जप केल्यास भोजन करताना आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक उर्जा प्राप्त होते आणि त्या ऊर्जेचा आपल्या जीवनावर शुभ प्रभाव पडतो. जर आपण जेवण करताना योग्य दिशेला तोंड करून जेवायला बसलो तर घरातील भांडण तंटे वाद विवाद मिटतात व देवीच्या कृपेने आपल्या घरात सुख समृद्धी व आनंद येतो. त्याबरोबरच घरातील सर्व सदस्यांचे आ’रोग्यही चांगले राहते.

इतरांच्या हीश्याचे अन्न आपण स्वतः कधीही खाऊ नये. त्यांचे अन्न आपण स्वतः खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्य येते. जसे सुदामाने भगवंत श्रीकृष्णांच्या नावाचे अन्न गुपचूपपणे खाऊन घेतले होते, त्याला गरिबी आली होती. म्हणून आपल्या भोजनाचे पशुपक्षी, अतिथी, याचक यांचा भाग त्यांना देऊन मगच आपले भोजन ग्रहण करावे. सर्वांनी वाटून मिळून-मिसळून भोजन केल्यास आपल्याला त्याचे पुण्य मिळते व देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. वास्तुशास्त्रानुसार तु’टलेल्या फु’टलेल्या भांड्यांमध्ये जेवण करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण देण्यासारखे होते.

जेवणाचे ताट स्वच्छ असावे. कारण आपल्या जीवनात दुःख व दारिद्र्य प्रवेश करते. एकादशीच्या दिवशी कधीही तामसीक भोजन करू नये. एकादशीच्या दिवशी मांसाहार तसेच म द्य पा न करू नये. तसेच सात्विक अन्नाचे सेवन करावे.जेवणाची नासाडी करणे,अन्नाचा दुरुपयोग करणे हे शास्त्रानुसार चुकीचे मानले जाते. ताटात कधीही उष्टे सोडू नये, आपल्याला जेव्हा आवश्यकता असते तेवढेच अन्न घ्यावे. जर एकत्र जेवणाला बसलेले असाल तर आपले जेवण झाले तरीही इतर सर्वजण उठल्याशिवाय आपण ताटावरून उठू नये.

असे केल्यास आपले पितर आपल्यावर नाराज होतात, आपल्याला पितृदोष लागतो, जेवण झाले की ताटात हात धुणे हेही शास्त्रानुसार निषिद्ध मानले गेले आहे, ताटात कधीही हात धुवू नये, जेवण झाले की ताटात थोडेसे पाणी टाकून द्यावे आणि हात दुसरीकडे धुवावे. ताटात हात धुणे हे अन्नाचा अपमान करण्यासारखे आहे. म्हणून ही चूक कधीही करू नये.

जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ओम शांती या मंत्राचा जप करावा, या मंत्राचा जप केल्यास सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व सर्वजण प्रसन्न होतात. सर्व देवी देवताची आज्ञा घेऊन मगच जेवायला सुरुवात करावी. या श्लोकाचा अर्थ आहे या सृष्टीतील सर्व जीवांना अन्न मिळुदेत, कोणीही उपाशी राहू नये, प्रार्थना करून पूजन केल्यास भगवंतांची आपल्यावर कृपा होते, नंतर जेवणाला सुरुवात करावी. आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते. घरात अन्नधान्यात बरकत येते.

जेवण करायला बसण्यापूर्वी सर्वात आधी भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा म्हणजे ते अन्न न राहता प्रसाद होईल, असा प्रसाद ग्रहण केल्यास आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. भगवंतांना न चुकता दररोज नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या घरात भरभराट होते , घरात कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही, अंथरुणावर बसून कधीही जेवण करू नये. यामुळे व्यक्तीला कितीतरी रोगांचा सामना करावा लागू शकतो. नेहमी जमिनीवर आसन टाकून त्यावर बसूनच जेवण करावे. जेवण करताना कधीही कोणालाही फ’टकू नये.

जेवण करताना जर चुकीचा व्यवहार केला तर वाद उत्पन्न होऊ शकतात. जेवण करताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे हे देखील महत्वाचे असते. भोजन सेवन करताना पूर्व दिशेकडे तोंड करून बसल्यास व्यक्ती रोगांपासून व मानसिक ता ण त’णावापासून मुक्त होते. म्हणून आ’जारी वृद्ध व्यक्तीने पूर्वेला मुख करून भोजन करावे. त्यामुळे आपल्या आ’रोग्यामध्ये निश्चितच सुधारणा होते. कारण पूर्वेची देवता सूर्य आहे, यामुळे सूर्य देवाच्या कृपेमुळे आपल्या शरीरातील सर्व रोगांचा नाश होतो.

जर कोणाला नोकरी मिळवण्याची इच्छा असेल किंवा भरभराट मिळवण्याची इच्छा असेल तर अशा व्यक्तींनी उत्तर दिशेला तोंड करून जेवायला बसावे. उत्तर दिशा ही देवी सरस्वतीची आहे, व्यक्तीला त्याच्या सर्व कार्यांमध्ये यश मिळते, म्हणून याकडे विशेष लक्ष द्यावे. दक्षिण दिशेला तोंड करून कधीही जेवण करू नये. ही दिशा यमाची म्हणजेच मृत्यूची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून जेवल्यास व्यक्ती अल्पायुषी होते. अकाली मृत्यू होऊ शकतो.

म्हणून दक्षिण दिशेला तोंड करून कधीही जेवण करून नये. पश्चिम दिशेला तोंड करून जेवणे ही शुभ मानले जाते, सुख-समृद्धी मिळवण्याची इच्छा असेल त्यांनी पश्चिम दिशेला तोंड करून जेवण करावे. अशा प्रकारे आपल्या शास्त्रांमध्ये जेवणाविषयीचे नियम आहेत.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *