Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

या बैलाने मालका सोबत अस काही केलं ते पाहून आपण देखील..मालकाची मुलगी ग’रोदर राहिली होती..आणि त्यावेळी या बैलाने..

नमस्कार, वडेगाव गावात एक शेतकरी राहत होता, तो आपल्या शेतीत फार कष्ट करीत असे, त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी राहत होते. शेती करीत असल्यामुळे त्यांच्याकडे शेतात कष्ट करण्यासाठी बैल होते. त्यापैकी त्याला पांढऱ्या रंगांची बैल जोडी खूप आवडत होती. बैलजोडी दिसायला खूपच देखणी होती. शेतीतील कामे खूप चांगल्या प्रकारे जोडी करत असे. तसा तो सर्वच बैलांवर प्रेम करायचा सर्वांची, चांगल्या प्रकारे सोय करायचा.

ऋतू बदलले, पावसाळा सुरू झाला , पेरणीचे दिवस सुरू झाले, सगळीकडे कामाची लगबग सुरू झाली. त्या शेतकऱ्याने ही पेरणीला सुरुवात केली. एके दिवशी त्याने आपल्या आवडत्या बैलजोडीला पेरणीला जो’पले, अचानक चार वाजता शेतकऱ्याच्या मुलाचा फोन आला, बाबा आज मी सहा वाजता रेल्वे स्टेशनला येणार आहे, आज मला घ्यायला या.

आता वेळ कमी होता; शेतकऱ्याने जो’पलेले बैल सोडले आणि मुलाचा फोन आला होता म्हणून त्यांनी गड्याला सांगितलं, अरे बाबा आपली पांढरे बैल जोडी गाडीला जुंप, आपल्याला स्टे’शनला जायचं आहे, लगेच गड्याने पांढरे बैल जोडी गाडीला जुंपली, मुलाला घेण्यासाठी स्टेशनला गेले. मुलाला घेऊन घरी येईपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते.

घरी आल्यानंतर गड्याने बैलजोडी गोठ्यात बांधली, त्यांना चारा टाकला आणि घरी निघून गेला. शेतकरी जेवण करून झोपी गेला. रात्रीचे बारा वाजून गेले होते. सर्वजण झोपी गेले होते. शेतकऱ्याच्या मुलीच्या पोटात कळा यायला सुरुवात झाली. ती काही दिवसांपूर्वीच बाळंतपणासाठी माहेरी आली होती.

आता तिला शेजारच्या शहरात दवाखान्यात घेऊन जावं लागणार, शेतकऱ्यांनी आपल्या गड्याला आवाज दिला, त्याला सगळं सांगितलं आणि पांढरे बैल जोडी गाडीला जुंपली कारण तीच जोराने पळत होती. बैलाने खूप मेहनत घेऊन जास्त वाटणारा अंतर कमी वेळात काढून मुलीला दवाखान्यात पोचवलं, बैलगाडी दवाखान्याच्या बाहेर सोडले,

त्या पांढरा बैल जोडीतील 1 बैल पहिला म्हणतो काय रे, या शेतकऱ्याकडे सहा बैल आहेत आणि आपल्यालाच हा कायम टिपणी ला जुंपतो, मुलाला आणायला आपल्याला सांगतो आणि आता शेवटी एवढ्या रात्री आपल्यालाच घेऊन येतो, बाकीच्या बैलांना तो काहीच काम सांगत नाही.

ते मस्त मजा करतात. इतक्यात शेतकरी दवाखान्यातून आनंदाने उड्या मा’रत हसऱ्या चेहऱ्याने पहिला बैलाच्या पाठीवर हात फिरवला आणि त्याच्या पाया पडला आणि म्हणाला बाबांनो तुम्ही माझ्यावर फार उपकार केलं. तुम्ही जर आज नसते तर माझ्या मुलीचा जीवच काय होणार बाळही वाचलं नसतं.

आपल्याला नातू झाला आहे, त्याच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला, त्याने बैलांना मनोमन धन्यवाद दिले. आता मात्र त्या पांढरा बैल जोडीतील पहिला बैलाला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती आणि त्या दोघांचाही दिवसभराचा शीण निघून गेला होता.

काम त्याच्याकडेच येतात जे प्रामाणिक करतात, आपण नेहमीच म्हणतो मीच का? याचे उत्तर ही हेच आहे! एखाद्या वस्तूचे किंवा समाजाचे राखण करायचा असेल तर काही लोकांना जागे रहावेच लागते. त्यात समाजाचे रक्षण होते. तस झाल नाही तर तो समाज नष्ट होण्यास वेळ लागत नाही, म्हणून काही लोकांना जागा रहावच लागतं, प्रामाणिक माणसांमुळे समाजाचे नेहमी भलेच होत असते असा बोध या गोष्टीतून होतो. जय जवान जय किसान..

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *