नमस्कार मित्रांनो,
मनातील भीती तेव्हाच नाहीशी होते जेव्हा आपल्याला आपल्या क्षमतांची पूर्ण जाणीव होते. महिन्याच्या सुरुवातीला तुमचा राशी स्वामी शुक्र ग्रह लाभस्थानात विराजमान आहे. त्यामुळे या महिन्यात तुमच्या मनातील भीती निघून जाईल. कारण तुमच्या क्षमतांची तुम्हाला पूर्णपणे जाणीव होईल.
व्यक्तिमत्व – व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामींची स्थिती महत्वाची ठरते. वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा सुरुवातीला लाभ स्थानात विराजमान आहे तिथे तो 23 जून पर्यंत राहील. तो इच्छापूर्तीच्या स्थानात उचीचा आहे त्यामुळे हा जून महिना केवळ तुमचाच आहे अस म्हणता येईल. या महिन्यात तुमच्या अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण होणं, अनेक प्रकारचे लाभ पदरात पडणं, प्रत्येक कार्यात यश मिळणं, नोकरीत पदोन्नती होणं, व्यवसायात लाभ होणं असे अनेक लाभ मिळणार आहेत.
कुटुंब – कौटुंबिक दृष्ट्या विचार केला असता वृषभ राशीचा कुटुंबेश म्हणजे बुध ग्रह होय तो तुमच्या राशीत विराजमान आहे संपूर्ण महिना तो तिथे राहील. कुटुंबेश हा धनेश देखील असतो, धन, कुटुंब आणि वाणी या तीन गोष्टी पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून कळतात. कौटुंबिक सौख्य, धन प्रधान करणं, तुमच्या वाणीतून अभ्यासू वृत्ती प्रतीत होणं या सर्व बाबी एकत्र घडून येतात त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ फळ प्राप्त होणार आहेत.
पराक्रम व परिश्रम – या दृष्टीने विचार केला असता, तुमच्या पराक्रम स्थानावर गुरू महाराजांची नजर पडत आहे. गुरू महाराज तुमचे लाभेश असून लाभ स्थानात विराजमान आहेत. म्हणजे ते तुम्हाला सूचित करत आहेत की तुम्ही पराक्रम करा, परिश्रम करा मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त परिश्रम करणं तुमच्यासाठी योग्य आहे.
वास्तू, वाहन, जमीन – या महिन्यात अनेक कारणांनी तुम्ही वास्तूवर खर्च करणार आहात मग त्यामध्ये नवीन वास्तू घेणं, असलेले वास्तूच नूतनीकरण करणं, नवीन वाहन खरेदी करणं, असलेल्या वाहनावर खर्च करणं यासारखे खर्च होऊ शकतात. हे खर्च तुमच्यासाठी आनंददायक व लाभदायक असतील. शिक्षण – तुमचे शिक्षण उत्तम प्रकारे होईल, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा यश तुमचच आहे.
आ रोग्य – तुमचा राशी स्वामी अत्यंत बळकट अवस्थेत आहे, तो इच्छापूर्तीच्या स्थानात उच्चीचा होऊन बसला आहे. या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुमचा राशी स्वामी बळकट असल्यामुळे तुम्ही जर स्वतःची योग्य काळजी घेतली, नियमित व्यायाम, योग प्राणायम करण्याची सवय लावून घेतली तर तुमचे आ रोग्य चांगले राहील.
नोकरी व व्यवसाय – नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना लाभदायक आहे. जे जातक नोकरी करत आहेत न पदोन्नतीची वाट बघत आहेत त्यांना ती संधी या काळात प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या कामाचं, कर्तृत्वाचा कौतुक होईल. या महिन्यात तुम्ही योग्य परिश्रम करणार आहात, कार्याची दिशा आणि लाभाची दिशा उत्तम राहील.
भाग्य – भाग्याचा विचार केला असता वृषभ राशीचे भागेश शनी महाराज असतात ते तुमच्या दशम स्थानात विराजमान आहेत. ते वृषभ राशीसाठी राजयोग कारक ग्रह आहेत. त्यामुळे भाग्याची साथ नक्की मिळेल. तुम्ही सा माजिक स्तरावर खूप स्थिरावलेले दिसाल. या वर्षी तुम्ही स माजातील मान्यवरांना भेटू शकता. कौटुंबिक कार्यक्रमात तुमची उपस्थिती अशी असेल की लोक तुम्हाला विसरू शकणार नाहीत.
कर्म- कर्मेश ब ळकट झाल्यामुळे कोणत्याही अ डचणीत तुमचे कर्म योग्य राहतील. प्रगतीकडे तुम्ही वाटचाल कराल. या वर्षी शनिदेव तुमच्या नशिबातून तुमच्या कर्माकडे वाटचाल करतील, त्यामुळे करिअरचा आलेख उंचीवर जाईल. या राशीचे लोक जे लोखंडाशी संबं धित व्यवसाय करतात त्यांना फा यदा होऊ शकतो. भूतकाळात तुमची कारकीर्द उजळण्यासाठी तुम्ही केलेल्या मेहनतीचे शुभ फळही शनी देव तुम्हाला देऊ शकतात. यासोबतच या वर्षात तुमच्या लाभ स्थानी गुरुचे भ्रमण होईल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक कमाईचे अनेक स्रोत मिळू शकतात.
लाभ – लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश लाभ स्थानात आहेत. लाभाच्या दृष्टीने भरपूर लाभ तुम्हाला मिळणार आहेत. प्रेमात असलेल्या या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले राहील. या राशीचे काही लोक या वर्षी आपल्या प्रियकरासोबत लग्न करू शकतात. २०२२ मध्ये गुरू तुमच्या अकराव्या भावात प्रवेश करेल, त्यामुळे तुमचे भावंडांसोबतचे संबं धही सुधारतील.
शुभ आणि ता ण त णावाचे दिवस – वृषभ जातकांसाठी 3, 13 आणि 22 हे दिवस शुभ असतील. तर 1, 11 आणि 20 हे दिवस ता ण त णावाचे असतील. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.