नमस्कार मित्रानो आपल्या घरामध्ये किवा आपल्या वास्तूमध्ये पृथ्वी,चंद्र आणि सौरऊर्जेचे संतुलन हा आपला उंबरठा करत आसतो.आपल्या वास्तूमध्ये २ प्रकारच्या उर्जा येत असतात एक पॉझीटिव्ह उर्जा आणि दुसरी निगेटिव्ह उर्जा पॉझीटिव्ह एनर्जी म्हणजे की काय तर त्यामध्ये लक्ष्मी चे आगमन हे आपल्या घरामध्ये होत आसते आणि या लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी आपल्या घरातील दरवाज्याची चौखट किवा प्रवेशद्वार हे योग्य पद्धतशीर असने गरजेचे आहे.
आपल्या घरातील प्रवेशद्वार हे तीन गोष्टीनी तयार होत आसतो एक म्हणजे वास्तूची चौखट दोन दरवाजा आणि उंबरठा या तीन गोष्टी जेव्हाएकत्र येतात तेव्हा आपल्या वास्तूचा प्रवेशद्वार हा परिपूर्ण होतो. तर आपल्या वास्तू मध्ये जास्तीत जास्त पॉझीटिव्ह एनर्जी कशी येईल हे बगाने गरजेचे आसते.आता त्यामध्ये सर्वात पहिला महत्वाचा भाग म्हणजे दाराची चौखट आपल्या दाराची चौखट ही नेहमी चौकोणी असावी म्हणजे त्याच्या चारही कोनांमध्ये ९० अंश मध्ये असाव्या.
आता ही चौखट ज्यावेळी पूर्ण होते अश्या वेळी चारही बाजू त्याच्या लाकडी असतात बरयाच वेळा आपण आपल्या घराची चौखट बनवताना त्याच्या तीन बाजू या लाकडी असतात पण खालाचा जमिनीचा भाग ज्याला आपण उंबरठा म्हणतो हा आपण ग्रेनाईट किवा सिमेंटचा बनवतो.आणि मग ती चौखट न होता त्रिकुट होत आसतो आणि म्हणून मग आपण आपल्या चौखटीच्या चारही बाजू या लाकडी बनवाव्या.
ज्यावेळी आपण आपल्या वास्तूची चौखट बसवत आसतो तेव्हा ती शुभ मुहूर्तावर बसवावी ती चौखट बसवता दोघे घरातील पती पत्नी यांनी त्या चौखट पूजा अर्चना करावी. कारण ती चौखट आपल्या वास्तूची मुख्य प्रवेशद्वार आहे.जिथून आपल्या घरामध्ये पॉझीटिव्ह एनर्जी येणार आहे.चौखटीवर आपल्या वरिष्ठ देवतेचे टाईल्स किवा स्टिकर लावावे.आणि त्यावर एक छोटासा लाईट देखील लावावा की जेन्हेकरून तीन्हीसांजेवेली तिथे प्रकाश असावा जेव्हा आपल्या घरामध्ये पॉझीटिव्ह एनर्जी येणार आहे.
तसेच चौखटीच्या दोन्ही बाजुला शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक किवा श्री असे लावावे.तसेच आपल्या चौखटीलाअसणारा दरवाजा हा दोन दारी असावा.तसेच उंबरट्यांवर लक्ष्मीची २ पाऊले देखील लावावे.घरातील सर्व चौखटीपेक्षा प्रवेशद्वाराची चौखट हि मोठी असावी. तर अश्या प्रकारे आपल्या घराचे प्रवेशद्वार व चौखट असावी.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये