यांनी दिलेली दुवा असते खूप शक्तिशाली भिकाऱ्यालाही राजा बनवू शकते..

नमस्कार मित्रांनो,

आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन वर्ग आहेत मात्र आपल्या समाजामध्ये तिसरा वर्ग सुद्धा आहे ज्याला तृतीयपंथी असे म्हटले जाते. शास्त्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे असे म्हटले जाते की तृतीयपंथी लोकांनी दिलेला आशीर्वाद हा चिरकाल टिकणारा असतो.

तृतीयपंथी लोकांनी जर तुम्हाला आशीर्वाद दिला तर तुमचं फार बरं होतं परंतु जर या लोकांनी तुम्हाला शाप दिला तर आपल्या आयुष्यामध्ये फार संकटे येतात. बऱ्याचदा आठवड्याच्या बाजारामध्ये वगैरे तुम्हाला तुमच्या आसपास हे तृतीयपंथी लोक दिसले असतील.

हे लोक आपल्याकडे येऊन पैशाची मागणी करत असतात त्यांना जर आपण पाच दहा रुपये दिले तर हे लोक खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळे अशा लोकांना कधीही पैशासाठी नाही म्हणू नका. आपण आज असे दोन शब्द पाहणार आहोत जे शब्द हे तृतीयपंथी लोक दिसताच क्षणी आपल्याला म्हणायचे आहेत.

तृतीयपंथी लोक जर तुमच्याकडे येऊन पैसे मागत असतील तर मनामध्ये सकारात्मक भाव ठेवून चेहऱ्यावर हास्य ठेवून त्यांना मनापासून दान द्या त्यांची इच्छापूर्ती केल्यानंतर हे दोन शब्द आपल्याला म्हणायचे आहेत की “पुन्हा या”.
“पुन्हा या” याचाच अर्थ “परत या”.

हे जे दोन शब्द आहेत ते समोरच्या तृतीयपंथीयांच्या मनामध्ये तुमच्याविषयी अशी भावना निर्माण करेल की तृतीयपंथी तुम्हाला जो आशीर्वाद देतील तो मनापासून असेल. एखाद्या किन्नरच्या तोंडातून निघालेले शब्द हे त्याच्या हृदयातून आलेले असतात,

त्यावेळी प्रत्यक्ष परमेश्वराच्या तोंडून हे शब्द आलेले असतात असे शास्त्र सांगते. त्यामुळे एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीचा आशीर्वाद जर तुम्हाला लाभला तर तुमचे कल्याण होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.
तृतीय पंथी लोकांचे जीवन हे फार खडतर आहे,

हे तृतीयपंथी लोक सुद्धा आपल्यापैकीच एक आहेत त्यामुळे त्यांना सन्मानाने जगवा आणि समाजामध्ये मानाचे स्थान द्या. शास्त्र सुद्धा हेच सांगते की हे तृतीयपंथी लोक तिरस्करणीय अजिबात नाहीत, या लोकांचा मान सन्मान आपण राखला पाहिजे.

रामायण असो किंवा महाभारत प्रत्येक ठिकाणी तृतीयपंथीयांचा उल्लेख आढळतो आणि या लोकांनी जी कार्य केलेली आहे ती अतिशय महान आहेत.