नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत संत मुक्ताबाई विषयी संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या धाकट्या बहीण म्हणजे लहान बहीण म्हणून सर्वांना ओळखीच्या आहेत. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत व कवयित्री. त्यांचा जन्म इ.स. १२७९ मध्ये झाला. चारही भावंडांमध्ये संत मुक्ताबाई या सर्वात लहान. लहान वयातच भावंडांना त्यांच्याच जातीतील संन्याशाची पोर म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली, सर्व भोग सहन करत या बहिण-भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली.
मित्रांनो आणि भगिनीनो आई वडिलांनी देहत्यागा नंतर कुटुंबाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली आणि तितक्याच समर्थपणे आणि निदरपणे पार केले. संत मुक्ताबाईंनी विसोबा खेचर आणि योगी चांगदेव ह्यांना गुरुमंत्र दिला.
तसेच मुक्ताईने समाजाच्या लोकांवर नाराज होऊन ताटी म्हणजे दरवाजा बंद करून बसलेल्या संत ज्ञानेश्वरांचे सांत्वन करणारे अभंग लिहिले आणि त्याला बोलून दाखवले यालाच “ताटीचे अभंग” म्हणतात. गाथेतील ४२ अभंग, याशिवाय संत नामदेव गाथेतील नामदेव भक्ति गर्वपरिहार या मथळ्याखाली (१३३५ ते १३६५) दहापंधरा अभंग तरी संत मुक्ताईचे आहेत.
ही सर्व रचना अभंग काव्यगुणांनी समृद्ध आहे. या काव्यात अभंगात तिच्या जीवनाचे, प्रतिभेचे अनेक पैलू उठून दिसतात. या अभंगात, काव्यात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहेत, साक्षात्काराचे पडसाद आहेत, आणि भावनेची नाजुक हळुवारताही आहे.
संत ज्ञानदेव आणि संत सोपानदेवांनी एका मागोमाग एक शके १२१८ मध्ये समाधी घेतली, याने संत मुक्ताई व्यथा-व्याकूळ, उदासीन झाली. याच अवस्थेत संत मुक्ताबाई महाराष्ट्रातील तापी तीरावर मेहून (तेव्हाचे महत् नगर) येथे वैशाख वद्य दशमी शके १२१९ या दिवशी विजेच्या कडकडाट झालयानंतर मुक्ताई गुप्त (स्व-स्वरुपकार) झाल्या.
कडाडली वीज निरंजनी जेव्हा । संत मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई झाली संत मुक्ताबाई स्वरुपाकार । संत नामदेव महाराजांनी समाधीग्रहण प्रसंगाचे वर्णन केले आहे. त्याच संत मुक्ताईच्या पावन भुमीमध्ये मुक्ताईचे समाधी स्थळ व प्रगटस्थान म्हणून सध्या भव्य मंदिर आहे.
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक प्रकारचे विधी नियम हे पुरातन काळापासून चालत आले आहेत त्याबदाल आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देत आहोत याबद्दल तुमचे काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आम्ही तुम्हाला अशीच भरपूर सारी माहिती देत राहू.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.