नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत की आपल्याला रात्री उशिरापर्यंत झोपच येत नसेल. रात्री अपरात्री जाग घेऊन झोपच लागत नसेल, तर करा हा घरगुती उपाय. मित्रांनो आपल्या आयुष्यात आपल्या दिनचर्ये वर झोपेचा किती प्रभाव पडतो ते आपल्यालां चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. वारंवार अपुरी झोप झाली. तर आपल्या रक्तातील ग्लुकोज लेव्हल नियंत्रणात राहत नाही आणि त्यामुळे निरोगी व्यक्ती प्री डायबिटीज किंवा अगदी डायबिटीज अवस्थेत जाऊ शकतो.
तसेच मित्रांनो हे जगभरात झोपेवर चाललेल्या संशोधनातून सिद्ध झालेले आहे. पुरेशी झोप न झाल्यामुळे आपल्या दैनंदिन कामामध्ये अनेक अडचणी तर येतातच पण दीर्घकाळ निद्रा नाशाच्या समस्येमुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधूमेहाचा धोका कित्येक पटीने वाढतो. मित्रांनो या आणि इतर अनेक समस्या पासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर झोप न येण्याच्या समस्ये वर वेळेत उपचार करणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी आपण अगदी घरच्या घरी बनवता येणारे घरगुती उपायांची मदत घेऊ शकतो.
आपल्या डोक्यामध्ये असलेली वाढलेली चिंता मोबाईलचा अती वापर किंवा बदलत्या जीवशैलीमुळे निर्माण झालेली निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठीचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे पांढरा कांदा मित्रांनो हा पांढरा कांदा अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो. निद्रानाशाच्या समस्येवर तर पांढरा कांदा रामबाण उपाय आहे.
तसेच आपण हा एक कांदा बारीक चिरून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपल्याला आवश्यक आहे दही अगदी घरी बनवलेले गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापासून बनवलेले दही आपल्या उपयासाठी वापरायचे आहे. साधारण अर्धी वाटी एवढे दही या कांद्याच्या पेस्टमध्ये टाकायचे आहे. आणि हे व्यवस्थितपने मिक्स करायचे आहे.
मित्रांनो निद्रानाशासाठी याचा उपयोग होतो असं नाही! तर यासोबत आपल्या सवयीमध्ये आवश्यक तो बदल करावा लागतो. रात्री झोपण्यापूर्वी किंवा एक ते दोन तास तरी मोबाईल, संगणक किंवा टीव्हीचा वापर करणे टाळावे. याऐवजी तुम्हाला कोणतेही आवडणारे शांत संगीत ऐकू शकता. सकाळी सकाळी सूर्यनमस्काराचा सारखी किंवा इतर योगासने केली तरी देखील फायदा होतो.
मित्रांनो आपल्या शरीरासाठी रात्रीची दहा ते दोन यावेळची झोप आपल्या महत्वाची सांगितलेली आहे. त्यामुळे यावेळेतच म्हणजे रात्री दहा वाजता तुमची सर्व कामे आटोपून झोपल्याने झोप पूर्ण होते. आणि रात्री अपरात्री जाग देखील येत नाही. आता तयार झालेली ही पेस्ट संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान खायची आहे. दही तुमच्या शरीर प्रकृतीला मानवत ते की नाही याची मात्र खातरजमा करा. निद्रानाश दूर करणारा हा उपाय तुम्ही सकाळी बनवून ठेवा आणि संध्याकाळी पाच ते सहा यादरम्यान सेवन करा. तुमची झोप न येण्याची समस्या निश्चितपणे दूर होईल.
टीप: वरील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. आ-जारपण किंवा सं-सर्गाची लक्षणे आढळल्यास आपल्या डॉ-क्टरांचा सल्ला घ्या.