ताकात मिक्स करा हा 1 पदार्थ शरीरातील उष्णता 1 मिनिटात गायब वजन कमी घरगुती उपाय..

नमस्कार मित्रांनो,

आज आपण ताकाचा उपयोग करून शरीरातील उष्णता अगदी 1 मिनिटात नष्ट करणार आहोत. आणि हा उपाय केल्याने ज्यांचं वजन वाढत आहे त्यांच वजन सुद्धा कमी होणार आहे. खरतर ताकाला आयुर्वेदामध्ये खुप उच्च स्थान देण्यात आलेला आहे. ताक पिल्याने आपल्या शरीरातील अनेक रोग नष्ट होतात.

मात्र या ताकात ज्यावेळी आपण आणखीन 1 पदार्थ मिक्स करतो तेंव्हा या ताकाची ताकद अजून वाढते. हा पदार्थ आहे जिरेपूड जिरे थोडावेळ भाजायचं जोपर्यंत त्याचा छान वास सुटत नाही तोपर्यंत ही जिरे भाजून घ्यायची आहे. आणि फक्त अर्धा चमचा जिरेपूड आपण 1 ग्लास ताकात टाकायची आहे आणि चांगल्याप्रकारे मिक्स करून चांगल मिश्रण तयार करून घ्या.

हे मिश्रण आपण सेवन केल्यानंतर आपल्या शरीरातील चयापचय शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते मेटाबोलिजम वाढतो. आणि तुमच्या शरीरात जे अतिरिक्त चरबी जमा झालेली आहे तर हे चरबी कमी होण्यास मदत होते आणि परिणामी तुमचं वजन आपोआप कमी होत. तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी असा ताक दुपारच्या वेळी पित चला तुमच्या शरीरातील उष्णता निघून जाते.

तुम्ही ज्या दिवशी ताक सेवन कराल त्याच दिवशी तुम्हाला परिणाम दिसून येईल. तसेच तुमच्या हातापायाची होणारी आग थांबेल व घामोळे, फोड आले असतील किंवा बरेच जणांना तोंड येतं हे सुद्धा तुम्हाला कमी झालेलं दिसेल. आपल्याला डोळ्या संबंधित समस्या असतील तर त्यावर सुद्धा तुम्ही हा ताक घेवू शकता.

आयुर्वेद अस मानतं 2 ते 3 दिवस सलग ताक आणि जिरेपूड एकत्र करून पिल्याने आपल्याला पंच कर्म केल्यासारखे फायदे होतात. मात्र लक्षात ठेवा रात्रीच्यावेळी ताक,दूध,दही हे पिणे कटाक्षाने टाळा. ताक करताना काही गोष्टींना लक्षात ठेवा की बरेचजण मिक्सरचा वापर करतात तर अस करू नका बाजारात रवी मिळते त्या रवीने घुसळून ते ताक आपण तयार करा.

आणखीन एक गोष्ट अनेक ठिकाणी ताक बनवल्यानंतर त्यात मीठ टाकतात तर त्यात मीठ टाकू नका त्यामुळे तुम्हाला बीपी चा त्रास होऊ शकतो. ज्यांना बाथरूमचा त्रास होत असेल किंवा लघवी करताना ज ळ ज ळ होत असेल आशा लोकांनी मीठ टाकून पिलात तर त्यांना फायदा होईल.

जर तुम्हाला उन्हाळी लागत असेल. तर आशा लोकांनी ताकामध्ये जिरेपूड मिक्स करू नका केवळ ताक आणि एखादा गुळाचा खडा मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही सेवन करा. यामुळे तुमची उन्हाळी थांबते. जर तुम्हाला ताक नको असेल तर तुम्ही थंड पाणी प्या आणि त्यासोबत गुळ खात चला तर असं केल्याने सुद्धा तुमची उन्हाळी अगदी एका मिनिटात थांबते. तर वजन कमी करण्यासाठी व उष्णतेचा त्रास बंद करण्यासाठी असा हा अतिशय चांगला उपाय तुम्ही नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *