श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रेरणादायी बोध उज्ज्वल भविष्यासाठी आणि आनंदासाठी स्वामींचा संदेश…

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ  महाराज हे कृपेचा सागर आहेत. स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण करत होते. स्वामी महाराज कल्पवृक्ष आहेत. अशी ख्याती जेव्हा सर्वसामान्य लोकांमध्ये झाली, तेव्हा मागणाऱ्याच्या रांगाच रांगा लागू लागल्या. परंतु यात कधी कधी मागणारा इतका आंधळा झालेला असे की तो काय मागत आहे, याच सुद्धा त्याला भान राहत नसे.

मित्रांनो आणि अशा लोकांना स्वामी संकेत सुद्धा देतात.असाच एक भाविक भक्त आला त्याने स्वामींच्या समोर एक इच्छा व्यक्त केली. स्वामींनी त्याच्याकडे बघितले, आणि बोलले कुग्राम वस्ती.. कूलहीन सेवा.. त्यावेळेला त्याला काहीच समजले नाही. परंतु तिथल्या काही सेवेकर्‍यांनी त्या भक्ताला असे  समजावून सांगितले, की अरे तू निरर्थक मागतो आहेस याची प्राप्ती जर आली तर त्याचा तुला काहीच फायदा होणार नाही.

श्री स्वामींचे संकेत त्याला समजले आणि आपली झालेली चुक त्याच्या लक्षात आली आणि उपस्थित सर्वांनी अ-नन्य-भक्‍तीचा भावनेने स्वामी नामाचा जयजयकार केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजची स्वामी वाणी म्हणजे कृपाच आहे, आजच्या स्वामी वाणीतून निरर्थक कर्माचा त्याग करून सार्थक कर्म करण्याची प्रेरणा स्वामी महाराज तुम्हा आम्हा सर्वांना देत आहेत.

बघा कुग्राम वस्ती म्हणजे असे गाव की जिथे अन्न वस्त्र निवारा अशा मुलभूत गरजांची पूर्तता होऊ शकत नाही. अशा गावात राहणे जसे निरर्थक आहे, पण कुलहीन सेवा खरं तर यातून अनेकांना गैरसमज होऊ शकतो परंतु कुलहीन सेवा याचा खरा अर्थ समजावून घेताना कुलहीनसेवा म्हणजे अशा लोकांची सेवा की ज्यांना सेवेची गरज नाही. उदाहरणार्थ जसे कोणी करोडपती आहे आणि आपण त्याचे कल्याण व्हावे या उद्देशाने आपण त्याला दहा रुपयांचे दान देण्याची सेवा करतो.

खरतर ही निरर्थक गोष्ट आहे. अशा कर्माला कुलहीन सेवा असे म्हटले आहे. असो थोडक्यात आजच्या लीलेतून प्रेरणा घेताना आपल्याला सुद्धा निरर्थक गोष्टींचा त्याग करायचा आहे. आणि आपल्याला असे सार्थक कर्म करायचे आहे की जे आपल्या ध्येयाच्या दिशेने असतात बघा जसे कोणाला पैशाची समस्या असेल तर गप्पाटप्पा सोशल मीडिया व इतर काहीही असेल.

अशा ठिकाणी उगीच वेळ वाया घालवण्याचे निरर्थक कर्म करण्यापेक्षा स्वामींना प्रार्थना करत नवीन पार्ट टाइम इन्कम चा व्यवसाय निवडून पैसा प्राप्तीच्या दिशेने असलेले सार्थक कर्म करायचे आहे. किंवा कोणाच्या नातेसंबंधात दुरावा आलेला असेल तर एकमेकांच्या चुकांचा पाढा वाचत बसण्याचे निरर्थक कर्म करण्यापेक्षा स्वामी आपले कुटुंब प्रमुख आहेत. या विश्वासाने एकमेकांना माफ करून संबंध सुधारण्याच्या दिशेने सार्थक कर्म करायचे आहे.

मित्रांनो आणि भगिनीनो थोडक्यात आजच्या स्वामी वाणीतून बोध घेता आपल्याला अनन्य भक्तिभाव मनात ठेवून निरर्थक कर्माचा त्याग करत ध्येयाच्या दिशेने असलेले सार्थक कर्म हे स्वामी सेवा या भावनेने करायचे आहे. बघा निश्चितच आपले भविष्य उज्वल असेल आनंदी असेल. मित्रांनो आपण जर स्वामींची भक्ती नित्य नियमाने श्रध्येने भावनेने केले तर तर नक्कीच आपल्याला त्याचे फळ मिळते.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *