नमस्कार मित्रानो,
तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. आपला सर्वाचा देवावर खूप विश्वास आहे. आपण आपल्या देवासोबत आपल्या गुरुवर देखील श्रद्धा ठेवतो. स्वामी समर्थांची महिमा नेहमी प्रचीती आणि अनुभव देणारी आहे.स्वामी महाराजांची सेवा केल्याने स्वामी नेहमी उत्तम आशीर्वाद देतात,यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. स्वामींची शक्ती खूप महान आहे.
स्वामी समर्थांची शक्ती बघायची असेल,स्वामीची कृपा अनुभव करायची असेल तर स्वामी महाराजांना प्रसन्न करायचे आहे.स्वामी प्रत्येक संकटातून आपल्याला सुखरूप बाहेर काढतात. श्री स्वामी समर्थ.
तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही सुद्धा स्वामीची सेवा करा. ही सेवा तुम्हाला तीन महिने न चुकता करायची आहे. यामध्ये स्त्रियांच्या काही अडचणी असतील तर ही सेवा चार ते पाच दिवस टाळू शकता. परंतु तों महिने ही सेवा तुम्हाला खूप भक्तीने करायची आहे. ही सेवा उत्तम होण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी करायची आहे.
पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी या नामाचा मंत्र जाप करायचा आहे.आणि तोही अकरा माळी करायचा आहे.या जप मात्र खूप श्रद्धेने आणि भक्तीने करायचा आहे.जप झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित सारामृत या पारायणाचे,ग्रंथांचे क्रमश तीन अध्याय रोज वाचायचे आहे.
तीन महिन्या पर्यंत रोज तीन अध्याय वाचायचे आहे. एकूण 21 अधाय्य असतात. सात दिवसात तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात. पुन्हा आठ दिवसापासून पुन्हा नवीन 3-3 अध्याय सुरु करावे.
असे तुम्हाला तीन महिने ही सेवा करायची आहे.
तीन महिन्याच्या आत तुम्हाला स्वामींची प्रचीती येवून इच्छा पूर्ण होतील. स्वामिच्न्ही अनुभव खूप सुदंर आहेत. मनोभावे फक्त स्वामींवर खूप जास्त विश्वास ठेवा. स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात. आपल्या भक्ताला ते प्रत्येक अडचणीतून आणि समस्येतून बाहेर काढतात. उत्तम कर्म आणि सत्याची बाजू घेणारी लोक स्वामींना खूप आवडता. स्वामी नेहमी प्रत्येक चांगल्या व्यक्तीला खूप साथ देतात
वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा,धन्यवाद.