सकाळी उठल्यावर या वस्तू व गोष्टी दिसल्या तर हा स्वामींचा संकेत आहे. तसेच त्या गोष्टी व वस्तू शुभ मानल्या गेल्या आहेत. आपल्यासाठी दररोजची नवीन सकाळ नवा आनंद नवा उत्साह नवीन स्वप्न घेऊन येते. आपण सकाळी उठल्यावर आपल्याला काही तरी नवीन करण्याची आशा असते.
असे म्हटले जाते की दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो दिवसभरात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात. कधी कधी नैसर्गिक काही अश्या गोष्टी दिसतात ज्या आपल्याला संपूर्ण दिवसाशी निगडित असतात आणि या गोष्टींचे दिसणे आपल्यासाठी शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या आहेत त्या शुभ गोष्टी व वस्तू ज्यांचे दर्शन झाल्यावर आपले दिवस चांगला जातो.
पहिली गोष्ट सकाळी सकाळी उठल्याबरोबर जर भिंतीवर कोळी दिसला तर हे आपल्यासाठी बढतीचा शुभ संकेत आहे. सकाळच्या वेळी भिंतीवर कोळी दिसणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे. दुसरी गोष्ट सकाळच्या वेळी आपल्या दारी गाय येऊन हंबरत असेल तर ते शुभ सुचक आहे. याचा अर्थ असा आहे की देवी महालक्ष्मी स्वतः आपल्या दारी चालत आलेली आहे.
अश्या वेळी त्या गाईची पूजा करा व गाईला खाण्यासाठी पोळी द्या. तिसरी गोष्ट जर सकाळी उठल्यावर कोणत्या देवळातील घंटीचा आवाज किंवा पूजा करतानाचा आवाज आल्यास हे फार शुभ मानले गेले आहे. याचा अर्थ असा की देवाची कृपा आपल्यावर अनंत आहे व त्याचा शुभारंभ झाला आहे. आपल्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होण्याची वेळ येऊ पहात आहे.
नंतरचा संकेत जर सकाळी उठल्यावर तुमच्या गॅलरीत किंवा खिकीत, गच्चीवर कजबुतर, पोपट, चिमणी चिवचिवत असतील तर हे शुभ संकेत आहेत. याचा अर्थ असा आहे की आता आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत. आपल्यावर देवाची कृपा दृष्टी आहे व देवाचे दूत आपल्याला पक्षी बनून आपल्याला तो शुभ संकेत द्यायला आले आहेत. तुमच्या घरात पक्षांना दाणे व पाणी पिण्याची सोय करावी.
नंतरचा संकेत सकाळी उठल्यावर शेण, सोन, हिरवे गवत दिसल्यास हे शुभ संकेत आहेत. या सर्व वस्तू आपल्याला निसर्गाशी बांधून ठेवतात आणि आपला दिवस चांगला जातो. खर तर सकाळ हे खूप शुभ आहे सकाळी 4 ते 6 हे ब्रह्म मुहूर्ताचे आहे. अस म्हटले जाते की सकाळी 4 ते 6 दरम्यान देव पृथ्वीचे भ्रमण करत असतात. या वेळेस खूप कमी लोक जागे असल्यामुळे देवांची ऊर्जा थेट आपल्या पर्यंत पोहोचते. त्यामुळे या वेळेत केलेलं कोणताही काम एकाग्रतेने होते. तर हे होते स्वामींचे काही संकेत.