25 सप्टेंबर, सर्वपित्री अमावस्या: अंघोळ करताना बोला हे 2 शब्द…पुढच्या ७ पिढ्या पैशांवर राज्य करतील..

नमस्कार मित्रांनो,

25 सप्टेंबर 2022, रविवारचा दिवस आणि या दिवशी सर्वपित्री अमावस्या आलेली आहे. पितृपक्षाचा हा अंतिम दिवस. या दिवशी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितरांची कृपा आशीर्वाद मिळविण्यासाठी फक्त तीन अत्यंत साधी सोपी कार्य म्हणजेच कामे करा. जी व्यक्ती आपल्या पितरांचे साठी 3 कार्ये करते त्यांच्या जीवनातून पितृदोष समाप्त होतो. आणि पितरांच्या कृपाशीर्वादाने त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहते. कामातील अडथळे कार्यातील बाधा दूर होतात. घरामध्ये सुख शांती नांदू लागते. घरातील लोकांचा आरोग्य चांगलं राहतं.

या सर्वपित्री अमावस्या निमित्त ही तीन कार्य करावे. तीन कार्य आपल्या पितरांच्या मुक्ती साठी तुम्ही नक्की करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी पितृतर्पण सुद्धा करायला हरकत नाही. आता स्नान दान आणि ध्यान हे नक्की करावं. सर्वपित्री अमावस्येच्या सकाळी उठल्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी नदीकिनारी स्नान करावे पवित्र नदीमध्ये स्नान करावे मात्र प्रत्येकाला असे करणे शक्य होत नाही अशा वेळी आपल्या अंघोळीच्या पाण्यात आपण थोडसं गंगाजळ टाका किंवा काळे तीळ टाका

आणि या पाण्याने स्नान केल्यास तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे किंवा गंगास्नानाचा पुण्य आपणास प्राप्त होतं. ते स्नान करत असताना हर हर गंगे असेही आपण म्हणू शकता. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण हा उपाय नक्की करा. गोरगरिबांना अन्नदान करा. पांढर्‍या रंगाचे कपडे दान करा. अक्षत म्हणजेच तांदळाचं दान करू शकता. तांदळाचे पीठ असल्यास पिठाचा दान करू शकता. श्वेता पुष्प म्हणजे पांढर्‍या रंगाच्या फुलांचे हे दान करता येतात.

साधे सोपे उपाय आहेत या उपायांनी आपल्या पितरांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो. आपल्या जवळपास गाय असेल तर अशा गाईला आपण एक चपाती किंवा भाकरी थोड्याशा गुळासोबत नक्की खाऊ घाला. तसेच आपण गोमातेची हीच सेवा करू शकता. या नैवेद्याला अक्षय भोग असं म्हटलं जातं आणि जीवनातील तमाम प्रकारचे दोष समाप्त करण्याची क्षमता या भोगा मध्ये असते. थोडसं पाणी पाजा.

थोडसं पाणी गायीच्या शेपटी वरती शिंपडून तेच पाणी तर स्वतःवर शिंपडलं तर जीवनातून भीती अरिष्ट संकटे अशी तमाम प्रकारचे दोष आहे त्याचं निराकरण होतं. गोमाते सोबतच कुत्र्याला सुद्धा आपण या दिवशी काही ना काही नक्की खाऊ घाला. भाकरी टाका. कावळा आहे त्या कावळ्याला सुद्धा या दिवशी आपण काही ना काहीतरी खाऊपिऊ नक्की घाला व दही भात टाका. भाकरी कुस्करून टाका.

तिसरं कार्य म्हणजे स्नान दान आणि ध्यान. पाण्यात थोडे गाईचे कचे दूध टाका व स्नान करा. हिंदू धर्मामध्ये सांगितलं की गोमाता, कुत्रा आणि कावळा आहेत यांना आपण काही ना काही वस्तू खाऊ घाला त्याची सेवा करा. त्यांच्या रूपाने आपले पितर हे प्रसन्न होतील. आपल्या घरातील ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला असतो आपल्या आई असेल आपले वडील असतील आपले जे काही पूर्वज आहे लहानांपासून थोरांपर्यंत आजी-आजोबा असतील हे आपले पितर असतात. ते कोणत्याही रुपात येतात.

तिसरा मार्ग आहे तो म्हणजे ध्यान. त्यातल्या त्यात करणं म्हणजे जप करायचा आहे. आपल्या पितरांच्या निमित्त हा जप करावा, ओम श्री पितृ देवाय नमः ओम श्री पितृ देवाय नमः घरामध्ये रुद्राक्षाची माळ आहे किंवा तुळशीची माळ असेल जपमाळ असेल त्यावर ती या मंत्राचा जप करा. नसेल तरी काही काळजी करू नका पाच मिनिटे दहा मिनिटे पंधरा मिनिटे जितका जास्त वेळ आपल्या पितरांचे स्मरण करण्याची आठवण काढा.

त्यांचे स्मरण करत या मंत्राचा जप करून पहा. पितर प्रसन्न होतात शक्यतो धर्मशास्त्र सांगतात की हा जप हे एखाद्या पवित्र नदी आणि गंगाकिनारी करावा किंवा जिथे गोमाता आहे त्या गोमातेच्या जवळ करावा किंवा पिंपळवृक्षाखाली हा जप केल्यास अतिउत्तम आहे. पिंपळ वृक्षात तिथे देव आहेत जे या जगाचे पालन हार भगवान श्रीहरी श्री विष्णू की ज्यांच्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लागते त्यांना मोक्ष मिळतो.

अशा पिंपळाच्या झाडाखाली बसून सुद्धा आपण हा मंत्र जपा करू शकता. ज्यांना यातील काही करणे शक्य होणार नाही ना त्यांनी एखाद्या पवित्र नदीच्या किनारी जाणे शक्य आहे गोशाळा काही न काही मिळतेच. नाहीतर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा एखादी आसन वगैरे काहीतरी टाका आणि दक्षिण दिशेकडे पाहत आपल्या पितरांचे स्मरण करत ओम श्री पितृ देवाय नमः या मंत्राचा जप करा. पिंपळाच्या झाडाखाली जाणार असाल तर जाताना शक्यतो सकाळी सकाळी ह्या सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी ही गोष्ट करा.

जाताना तांब्याभर पाणी घ्या त्या पाण्यामध्ये आपण थोडं गाईचं कच्च दूध टाका आणि दोन चमचे थोडेसे टाका आणि पिंपळाच्या वृक्षाला जाताना शक्यतो सफेद रंगाची वस्त्रे नाद करा श्वेत वस्त्र असा पण त्याला म्हणतो तर जाताना आपण सफेद रंगाचे वस्त्र परिधान करा. ही सर्व सामग्री घेऊन आपण वृक्षाखाली जायचा आहे आणि हे जल आपल्या पितरांचे नाव घेत पितरांचे स्मरण करावे या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचा आहे. हात जोडून प्रार्थना करायचे आहे.

आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभो देण्याची प्रार्थना करा. जाताना थोडासा सफेद धागा सुद्धा घेऊन जा आणि हा धागा सात वेळा या पिंपळ वृक्षाला गुंडाळा. त्याची प्रदक्षिणा घालावी लागेल. ही गोष्ट कुळांचा उद्धार करू लागते. मोठ्या संकटातून आपली सुटका होईल. सोबतच आजच्या दिवशी आपण पक्षांना थोडेफार दाणे खाऊ घाला. कोणताही पक्षी असेल थोडेसे धान्याचे दाणे टाका.

सायंकाळी दीपक या पिंपळाच्या वृक्षाखाली दान नक्की करा म्हणजे एक तेलाचा दिवा या पिंपळाच्या वृक्षाखाली आपण प्रज्वलित करायचा आहे आणि सकाळी आपण केली होती ती पूजा होती की आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभो देत आपल्या पितरांना मोक्ष मिळू देत हीच प्रार्थना आपणास सायंकाळी दीप दान करताना करायचे आहे. दीपदान म्हणजे दिवा प्रज्वलित करा. सर्वपित्री अमावस्या आहे तर या 15 दिवसांसाठी पितर या धरती लोकांवरती येतात व यादिवशी मनुष्य लोकातून त्याचा परत जाण्यासाठी निघतात आणि म्हणून या शेवटच्या दिवशी त्यांना प्रसन्न करण्यासाठी अशा या थोड्याफार गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत करा.

आजच्या दिवशी क्रोध करू नका. कुणावरही रागवू नका. काही सांगता येत नाही की पितर कोणत्या रूपात आपल्याकडे येतील आणि सेवा करून घेतील. कुणाचाही अपमान करू नका ज्येष्ठांचे मन दुखवू नका. स्त्रियांचा अपमान करू नका. कुत्रा असेल कोणालाही मारहाण करू नका. झाडांची कत्तल करू नका. आपल्या जीवनामध्ये लसुन असेल कांदा असेल मांसाहार व्यसन असेल या गोष्टीपासून किमान आजच्या दिवस आपण थोडस दूर राहा. जेणेकरून पितर आपली ही सेवा पाहतील आणि पितरांच्या कृपाशीर्वादाने जीवनात असणारे मोठ्यात मोठे दोष निघून जातील.