Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

सिल्कच्या साड्या घरीच धुवा; या 5 टिप्स वापरा…कलर, क्वालिटी वर्षानुवर्ष राहील उत्तम…

नमस्कार मित्रांनो,

पारंपरिक साडी नेसायची म्हटली की पहिल्यांदा मनात येते ती सिल्कची साडी. आपल्याकडे खास कार्यक्रमात नेसण्यासाठी हमखास सिल्कची साडी असते. अगदी अनेक अभिनेत्रीही सिल्कच्या साड्यांना पसंती देतात. सिल्कच्या साडीमध्ये एक वेगळीच चमक असते आणि आकर्षकताही. सिल्कची साडी मुळात महाग असते आणि त्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं.

त्यामुळे सिल्कची साडी नेसल्यानंतर बऱ्याचदा ती साडी धुण्यासाठी लाँड्रीमध्येच द्यावी लागते.सिल्कच्या साडीची योग्य काळजी घेतली नाही तर त्याची चमक निघून जाते आणि मग साडी चांगली दिसत नाही. त्यामुळे ही साडी घरी धुता येत नाही असा समज आहे. पण प्रत्येक वेळी साडी ड्रायक्लिनिंगला देणे प्रत्येकाला परवडू शकतेच असं नाही.

त्यामुळे तुम्हाला जर तुमची सिल्कची साडी घरच्या घरी धुवायची असेल आणि तशीच चमक राखायची असेल तर आम्ही तुम्हाला साडी धुण्याची योग्य पद्धत या लेखातून सांगत आहोत. तुम्ही या पद्धतीचा वापर केल्यास, सिल्कची साडी उत्तम तर राहीलच त्याशिवाय त्याची चमकही राहील. सिल्कची साडी तुम्ही घरच्या घरी हाताने धुऊ शकता.

त्याप्रमाणे तुम्ही पद्धत अवलंबली तर तुमची साडी तशीच्या तशी राहील. मात्र त्याआधी मात्र सर्वप्रथम, हे लक्षात ठेवा की सिल्कची साडी धुण्यासाठी अजिबात गरम पाण्याचा वापर करू नका. हाताने स्वच्छ करत असाल तर नेहमी थंड पाणी वापरा.धुण्याआधी एक बादली पाण्याने भरून त्यात सिल्कची साडी भिजण्यासाठी सोडा.

सुमारे अर्धा तासानंतर साडी धुण्यासाठी दुसरी प्रक्रिया सुरू करा. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कडक सूर्यप्रकाशात साडी पसरवू नका. त्याऐवजी घरामध्ये, बाल्कनीमध्ये किंवा सावलीत वाळवा. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बाल्कनीमध्ये ओल्या सिल्कच्या साडीवर कॉटनचे टॉवेल पसरवू शकता.

साडी कोरडी झाली की लगेच सिल्कची साडी घरात आणा. कडक उन्हात साडी वाळवल्याने रंग फिका पडू शकतो. सिल्कची साडी धुण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही बादली पाण्याने भरून घ्या. पाण्यात सिल्क साडीसाठी मिळणारे खास डिजर्टंज मिक्स करा.तुमच्याकडे डिटर्जंट नसेल तर तुम्ही शँपूचा वापर करा. त्यानंतर साडी या पाण्यात 5 मिनिट्स बुडवून ठेवा.

मग त्यानंतर दुसऱ्या बादलीत पाणी घ्या आणि त्यात व्हाईट व्हिनेगर थोडंसं मिक्स करा. व्हिनेगर घातल्याने साडीतील अतिरिक्त राहिलेला साबण निघून जाण्यास मदत होते. या पाण्यातून साडी पुन्हा काढल्यावर तिसऱ्यांदा पुन्हा बादलीत पाणी घ्या. त्यामध्ये फॅब्रिक कंडिशनर मिक्स करा.

त्यानंतर स्वच्छ आणि सुक्या कपड्यावर धुतलेली सिल्क साडी ठेऊन तो कपडा रोल करून घ्या. आता टॉवेल घेऊन हलक्या हाताने दाबून साडीतील अतिरिक्त पाणी काढून टाका. नेहमीसारखी पिळू नका. सिल्कच्या साडीतील पाणी काढण्याची ही पद्धत योग्य आहे. पुन्हा साडी दुसऱ्या सुक्या टॉवेलवर ठेवा आणि मग हवेवर सुकू द्या. तुमच्या सिल्कच्या साडीवर एखादा डाग लागला असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे डाग काढून टाकण्यास सोपे जाईल.

डाग लागल्यावर लगेच साफ करा. मग डाग सुकल्यावर त्याचे पडलेले निशाण काढून टाकणं अत्यंत कठीण होतं. त्यामुळे तुम्ही व्हाईट व्हिनेगर आणि लिंबाच्या रसाच्या मदतीने हा डाग काढू शकता. डाग पडलेल्या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रस चोळा. डाग त्वरीत निघून जाण्यास मदत मिळते. याचबरोबर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिल्क साडी धुण्याआधी त्याचा रंग जातो की नाही याची व्यवस्थित तपासणी करून घ्या.

सिल्क साडीचा रंग जात असल्यास, तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागते. सिल्क साडी धुण्यासाठी क्लिनिंग डिजर्टंज सॉफ्ट असणंही तितकंच गरजेचं आहे. कारण हार्ड डिटर्जंट आणि ब्लीच साडी खराब करू शकते. त्यामुळे या गोष्टींची काळजी सिल्कची साडी घरी धुताना घेणं अत्यंत आवश्यक आहे. जुनी झाल्यावर साडीचा ड्रेसही शिवू शकता.

तसेच सिल्कची साडी कोरडी झाली की ती फोल्ड करून वॉर्डरोबमध्ये ठेवता येते. मात्र, इस्त्री करायची असेल तर तुम्ही कागदाचा थर देऊन प्रेस करू शकता. याशिवाय तुम्ही कॉटनचे कपडेही वापरू शकता. प्रेस करताना लक्षात ठेवा की इस्त्री जास्त गरम नसावी. सामान्य तापमानातच सिल्कची साडी प्रेस करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *