Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

श्री राम यांच्या बहिणीचे रहस्यमय जीवन…असे काय घडले होते की, श्री रामाची बहीण कधी समोर आली नाही? का तिचा कुठे उल्लेख केला नाही…

नमस्कार मित्रांनो,

मर्यादा, प्रेम, आपुलकी, संस्कार, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण होय. अयोध्येचा राजा असूनही रामाला वनवासात जावे लागले. श्रीविष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. मात्र, असे असले तरी मानवी जीवनातील सर्व भो’ग श्रीरामांना भो’गावे लागले. राम समजून घेण्यासाठी राम म्हणेपर्यंत मेंदू आणि दे ह झिजवला तरी त्यामधील काहीच भाग,

आपल्या हाती लागेल. रामायण हे आयुष्य कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन करणारे महाकाव्य आहे. मूळ रामायण वाल्मिकींनी लिहिले असले, तरी अनेकांनी ते विविध भाषांमध्ये अनुवादित केले आहे. वाल्मिकी रामायणानंतर तुलसीदासांचे रामचरितमानस प्रमाण मानले जाते. श्रीविष्णूंचा अवतार असलेल्या रामाला एक बहीणही होती. मात्र, त्याबाबत अधिक माहिती नाही.

आपण आज रामाची बहीण कोण होती ते जाणून घेणार आहोत. रामभगिनीचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही तर श्री व्यासमुनींच्या महाभारतात सापडतो. त्या उल्लेखानुसार अंगदेशाच्या लोम्पाद (रोमपाद/ चित्ररथ) नामक राजाने म्हणजेच कौसल्येच्या बहिणीच्या, वर्षिणीच्या नवऱ्याने, दशरथाची ही कन्या दत्तक घेतलेली होती. काही रामकथांमधे हा उल्लेख नेमका उलटा आढळतो.

म्हणजे ती रोमपदाची कन्या होती आणि दशरथाने तिला दत्तक घेतलं होतं. म्हणजेच अशी नाही तर तशी ती रामाची बहीण नक्कीच होती. अयोध्येचा राजा दशरथाला चार पुत्र होते. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. श्रीविष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. मात्र, दशरथ राजाला एक मुलगी होती आणि ती या भावंडांमध्ये सर्वांत मोठी होती. तिचे नाव होते शांता. ती कौसल्या राणीची मुलगी होती.

एकदा अंग देशाचे राजा रोमपद आणि त्यांची पत्नी वर्षीणी अयोध्येत आले होते. त्यांना अपत्य नव्हते. एका चर्चेवेळी राजा दशरथांना ते समजले. आपली मुलगी शांता त्यांना दत्तक देण्याचा निर्णय दशरथाने घेतला. दशरथाचा निर्णय ऐकताच राजा रोमपद आणि राणी वर्षीणी प्रसन्न झाले. त्यांनी तिचा उत्तम प्रकारे सांभाळ केला. उत्तर रामायणात रामाने सीतेचा त्याग केल्याचे समजताच ती रामाला खूप राग भरते,

अशी आख्यायिका आढळून येते. हिमाचल प्रदेशमधील कुल्लूजवळ शांता देवीचे मंदिर आहे. ही शांता देवी श्रीरामांची बहीण असल्याचे सांगितले जाते. शांता म्हणजे शांत मुलगी. गंमत म्हणजे जुन्या तेलगू लोकगीतांमध्ये ही शांत शांता सीता त्यागाच्या वेळी श्रीरामावर खूप भ’डकली होती अशा अर्थाची गाणी आहेत. साध्या धोब्याच्या शब्दावर विश्वास ठेवून पत्नी त्याग करणारा आपला भाऊ तिला अजिबात आवडलेला नव्हता. रामायणात श्रीरामाची मोठी बहीण शांता आणि तिचे पती ऋषी शृंगी यांचे अनन्य साधारण महत्व आहे.

श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्यापेक्ष्या शांता ही वयाने बरीच मोठी होती. शांताची माहिती सांगणारी एका कथेत असे सांगतात की, तिच्या ज’न्मानंतर अयोध्येत १२ वर्षे दुष्काळ पडला. हा दुष्काळ तिच्या ज’न्मामुळे पडल्याचे राजाला सांगितले गेल्यावर दशरथ राजाने तिची रवानगी तिच्या मावशीकडे केली. त्यानंतर शांता परत कधीच अयोध्येला आली नाही. अजुन एका कथेत असे सांगितले आहे की,

अंगदेश नरेश रोमपद म्हणजे वर्षीणीचा पती (शांताची मावशी ) शांतेशी खेळण्यात मग्न असताना एक ब्राह्मण पावसाळ्यातील शेतीकामासाठी राजाची मदत मागण्यास आला पण राजाने त्याच्या कडे दुर्लक्ष केल्याने तो परत गेला. त्यामुळे रा’गावलेल्या इंद्राने तेथे पाऊस पाडलाच नाही. शेवटी श्रृंग ऋषींनी त्यावर उपाय म्हणून यज्ञ केला. नंतर पाऊस पडला.

खूष झालेल्या राजा रोमपदयाने शांतेचा विवाह या ऋषींबरोबर करून दिला. तिचे मंदिर तिच्या पतीसह बांधले गेले. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे रामाची बहीण देवी शांता हिचे मंदिर आहे. या मंदिरात ती आपले पती ऋषी श्रृंग यांच्यासोबत विराजमान आहे. देशभरातून दूरदूरून भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कुल्लू पासून ५० किमी अंतरावर हे मंदिर आहे. रामायणात या घटना सापडतात.

मात्र यापूर्वी घडलेल्या घटनांचा उल्लेख नाही. अशीच उल्लेख नसलेली आहे ही शांता या कन्येची कथा. म्हणून रामायणात फारसा उल्लेख नाही. रामायणाचती कथा सुरु होते ती दशरथ राजा आणि त्याच्या तिन्ही राण्यांना अपत्यप्राप्ती होत नसल्याच्या चिंतेपासून! शांताच्या ज’न्मानंतर पुन्हा एकदा आपल्या घरात बाललिला दिसू लागतील.

या विचारांनी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांनी आपल्या लेकीला बहिणीला दत्तक दिले, मात्र त्यानंतर अनेक वर्ष त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. अशातच राणी कैकयी आणि सुमित्रा यांच्याही पदरी मुलबाळ नव्हते. राजा दशरथ यांनी श्रृंगी ऋषींच्या आदेशाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्याचेच फलित म्हणजे अयोध्येत चार बालकांचा ज’न्म झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *