नमस्कार मित्रांनो,
नुकतीच श्रावण महिन्याची सुरवात झालेली आहे. हिंदूंमध्ये श्रावण महिना हा खूपच पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवशंकर यांचा महिना. भगवान शंकर यांना अतिशय प्रिय असणारा हा महिना आहे. या महिन्यात सर्वच जण शिव शंकराची मनो भावे प्रार्थना करत असतात. प्रत्येक सोमवारी शिव शंकराचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या मंदिरामध्ये भक्त गण येत असतात.
यातील बरेच जण नदी देवाच्या कानामध्ये काहीतरी बोलत असलेले आपण पाहिलं असेलच किंवा तुम्हीसुद्धा हे केलं असेल. अनेकांना माहित नसेल पण श्रावण महिन्यात नंदी देवाच्या कानात मागितलेली इच्छा पूर्ण होते. श्रवण महिना हा शिव शंकरांना प्रिय असल्या कारणाने शिव त्यांच्या पर्यंत येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करत असतात. तुम्हाला माहित असेल कि, भगवान शंकर नेहमी तपश्चर्या करत असतात.
हो, म्हणूनच भक्त त्यांची जी इच्छा आहे ती ते नंदी देवाला सांगत असतात. मग नंदी देव ती भगवान शंकराने पर्यंत पोहचवत असतात. अगदी प्राचीन काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे, तुम्ही कोणत्याही शिव मंदिरामध्ये जा भगवान नंदी देव त्या ठिकाणी असतातच. भगवान नंदी हे शिवशंकरांचे गण आहेत, भक्त आहेत. तसेच ते शंकरांचे वाहन सुद्धा आहेत.
शिव मंदिरांमध्ये नंदी देवांच्या कानामध्ये मनातील इच्छा, जी’वनातील सर्व प्रॉब्लेम सांगितले तर नंदी देव भगवान शिव यांच्याकडे या सम’स्या नक्की पोहोचवत असतात. पण इच्छापूर्ती होण्यासाठी आम्ही जे दोन शब्द सांगणार आहोत ते महत्वाचे आहेत. याच्या उचारामुळे तुमची जी काही इच्या आहे ती पूर्णत्वास येणास आपल्याला मदत होईल. ते दोन शब्द कोणते ?
मित्रांनो, हे दोन शब्द सांगितल्यानंतर आपली इच्छा त्यांना बोलून दाखवा आणि हे सर्व आपण नंदी देवांच्या उजव्या कानामध्ये सांगायचे आहे. नंदी हे भोलेनाथांचे अवतार आहेत त्याविषयीची कथा आहे. शेलार नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना कोणताही अप’त्य होत नव्हत. त्यांचा वं’श न’ष्ट होणार होता. त्यांनी वं’श वाचवण्यासाठी भगवान शिव शंकराची पूजा करण्याचे ठरवले.
शेलार ऋषींनी तपश्च’र्या केली. भगवान प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांच्या शेतामध्ये एक बालक आढळल, त्यांनी त्या बालकाचा स्वीकार केला आणि त्याचं नाव नंदी अस ठेवलं. काही दिवसांनंतर त्या ठिकाणी मीत्रा आणि वरूण नावाचे दोन ऋषी आले आणि त्यांनी शेलार ऋषिला सांगितलं की हे बालक अ’ल्पायु असणार आहे. तेव्हा शेलार ऋषी खूपच दुःखी झाले.
त्यांना दुखी झालेले पाहून नंदी देवांनी भगवान शिवशंकराची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. भगवान शिव शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की तू तर माझाच अंश आहेस मग तुला मृ त्यूच भय ते कसलं? मृ’त्यूचं भय बाळगण्याचे काही कारण नाही आणि त्यावेळी भगवान शिवशंकरांनी नंदी देवाला आशीर्वाद दिला आणि सांगितल की आज पासून तू माझा प्रमुख गण असशील आणि मी तुझा वाहन म्हणून स्वीकार करत आहे.
आपणास माहीत असेल की, आजही भगवान शिवशंकर नंदी देवावर स्वार होऊन विविध ठिकाणी जात असतात. भक्तांचे कल्याण करत असतात. भगवान शंकरांना प्रसन्न करावयाचे असल्यास आणि आपली इच्छा पूर्णत्वास यावी असे जर वाटत असेल तर शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम नंदी देवाचे दर्शन घ्यावे. त्याच्या चरणापुढे फुले ठेवावीत. आणि त्यांचे दर्शन घेऊन. आणि तिथून भगवान शंकरांना वंदन करून.
नंदीच्या उजव्या कानामध्ये हरि ओम हरि ओम असे दोन शब्द बोला आणि तुमची जी काही सम’स्या, इच्छा आहे ती नंदी देवाला सांगा. भगवान शिव पर्यंत नंदी आपली इच्छा नक्की पोहोचवतात. भगवान शिवशंकर श्रावण महिना प्रिय आहे. म्हणून श्रावण महिन्यातील सोमवारीच असे काही नाही तर कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराची केलेली पूजा ही नक्की फ’लदायी होते. हा लेख आवडला असेल तर आमच्या पेज लाईक करा आणि शे’अर करायला विसरू नका