नमस्कार मित्रांनो, पितृ पक्षातील अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या या वर्षी २५ सप्टेंबर रोजी आली आहे. याला महालय किंवा सर्वपित्री दर्श अमावस्या असेही म्हणले जाते. असे मानले जाते की, या दिवशी आपले पूर्वज देवलोकात परत जातात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व शास्त्रात विशेष मानले गेले आहे.
अशी समजूत आहे की, इतर कोणत्याही कारणामुळे तिथीनुसार तुम्ही श्राद्धविधी करू शकला नाही तर या तिथीला तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध करू शकतात. तसेच काही कारणास्तव सर्वपित्री अमावस्येलाही श्राद्धविधी करू शकला नाही तर या दिवशी दान करून काही उपाय केल्याने आपल्या पूर्वजांना समाधान मिळते आणि ते तुमच्यावर प्रसन्न होतात. तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. चला जाणून घेऊया पितृ अमावस्येची वेळ आणि या दिवशी काय करावे ते.
पितृ अमावस्या तिथी वेळ- पंचांगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, यावेळी सर्वपित्री अमावस्या २५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून ११ मिनिटापासून सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून २२ मिनिटापर्यंत राहील.
अमावस्येला दान करा या गोष्टी- पितरांना अमावस्येचे देवता मानले जाते आणि या दिवशी पूर्वज आपल्या मुलांकडे येतात आणि त्यांच्यासाठी दान करण्याची आशा करतात. पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी नेहमी सत्कर्म करा आणि गरजूंना दान करा. तुमची सत्कर्म पाहून आणि तुमचे दान पाहून पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखी आणि समृद्ध होण्यासाठी आशीर्वाद देतात.
पितृ अमावस्येला काय करावे- पितृ अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करून अन्नपाणी ग्रहण करण्यापूर्वी पितरांना आगारी टाकून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व तेथे पाण्याने भरलेले भांडे ठेवावे.
पितृ अमावस्येला सकाळी सर्वप्रथम पितृ तर्पण करावे. गाईला हिरवा चारा किंवा गवत खाऊ घाला. गाईला चारा दिल्याने पितरांनाही समाधान मिळते. पितृ अमावस्येला संध्याकाळी पितरांसाठी तेलाचा चारमुखी दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. देवलोक सोडताना हा दिवा पितरांचा मार्ग उजळून टाकतो, अशी श्रद्धा आहे.
पितृ अमावस्येला या गोष्टी चुकनही करू नये- पितृ अमावस्येच्या दिवशी दारात रिकाम्या हाताने येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला जाऊ देऊ नका, त्यांना काहितरी दान करा. पितृ अमावस्येच्या दिवशी मांसाहार करू नये. संपूर्ण पितृ पक्षात लोक मांसाहार खात नाहीत आणि पितृ अमावस्या सुरू होताच मांसाहार करायला सुरुवात करतात,
असं अनेकदा पाहायला मिळतं. असे केल्याने पितर तुमच्यावर प्रसन्न होत नाही. पितृ अमावस्येला केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते. तसेही करू नका. या दिवशी पुरुषांनी दाढी करू नये. या दिवशी कोणत्याही वृद्ध, महिला आणि लहान मुलांना चुकनही अपशब्द बोलू नका त्यांचा अपमान करू नका.