सकाळची वेळ ही अत्यंत शुभ आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली वेळ मानली जाते. आणि म्हणूनच सकाळच्या वेळी काही अशुभ वस्तू आपण चुकूनही पाहू नयेत. या अशुभ वस्तू पाहिल्याने आपला संपूर्ण दिवस तर खराब जातोच. मात्र त्याच बरोबर आपल्या घरातून पैसा सुद्धा बाहेर जातो आपल नशीब आपल्याला साथ देत नाही. जसे की सकाळची वेळ अत्यंत शुभ असते.
म्हणून सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या हातांचे दर्शन घ्यावे. कारण आपल्या हातामध्ये प्रत्येक्ष माता सरस्वती व माता लक्ष्मी आणि श्री हरी गोविंद यांचा वास मानला जातो. तसेच आपण आपल्या आई-वडिलांच्या पायांचे सुद्धा दर्शन घेऊ शकता. कारण आपल्या आई वडिलांच्या चरणामध्ये सर्व देवी देवता सामावलेले असतात. मात्र याचबरोबर काही वस्तू की ज्या अत्यंत अशुभ समजले जातात. अश्या वस्तू मात्र आपण चुकूनही पाहू नका. चला तर पाहू त्या कोणत्या वस्तू आहेत.
यात पहिली वस्तू जर तुमच्या घरामध्ये किंवा घराबाहेर एखादी चप्पल उलटी पडलेली असेल. तर सकाळी उठल्यानंतर अश्या उलट्या पडलेल्या चपलीकडे आपण चुकूनही पाहू नये. तसेच जर कोळ्याची जाळी आपल्या घरामध्ये असतील तर उठल्याबरोबर अशी जाळी पहाणे सुद्धा अत्यंत अशुभ समजले जाते.
बऱ्याच महिलांना सवय असते की उठल्याबरोबर भाजी चिरतात. तर सकाळी उठल्यानंतर आपण धारधार ज्या वस्तू असतात विळी असेल चाकू असेल अश्या धारधार वस्तू आपण पाहू नये. बऱ्याच ठिकाणी असे होते की सकाळी उठल्यानंतर आपली रिकामी पर्स पाहतात. जर पैसे ठेवण्याच पाकीट रिकाम असेल तर असा रिकामी पर्स आपण पाहू नये.
कारण याचा खूप नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो. जर तुमच्या तिजोरीत अजिबात पैसे नसतील. तर सकाळी उठल्याबरोबर ही रिकामी असलेली तिजोरी सुद्धा तुम्ही उघडू नका आणि रिकाम्या तिजोरीचे दर्शन सुद्धा घेऊ नका. सकाळी उठल्यानंतर आपल्या कुटुंबियांबरोबर किंवा शेजाऱ्याबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद होणार.
तसेच आपल्या तोंडून कोणते अपशब्द बाहेर पडणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्या. कारण सकाळची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्याची वेळ असते. म्हणून घरात कलह होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. सकाळी उठल्यावर जे गर्विष्ठ पुरुष असतात. ज्यांना स्वतःवर खूप गर्व असतो खूप अभिमानी असतात. अश्या पुरुषांना सुद्धा पाहू नये.
तसेच एखादी चरित्र हीन महिला असेल किंवा पुरुष असेल तर अश्या प्रकारे चरित्र नसणाऱ्या स्त्री किंवा पुरुषांच दर्शन आपण सकाळी उठल्यानंतर अजिबात घेऊ नये. जर आपण या काही महत्वपूर्ण गोष्टींचे पालन केलात. तर आपला संपूर्ण दिवस अतिशय शुभ जातो आपल्या हातून चांगले कर्म घडतात तसेच कोणत्याही कामात अडथळे येत नाहीत.