नमस्कार मित्रांनो,
आपण आपले घर स्वच्छ, सुंदर व नीटनेटके दिसावे यासाठी कितीतरी प्रयत्न करतो. घरातील स्त्रिया तर घरात सतत काही ना काही आवर सवर करतच असतात. परंतु काही स्त्रिया घरात व्यवस्थित लक्ष देत नाहीत आजचे काम उद्यावर ढकलत असतात. विशेषतः बहुतेक स्त्रिया रात्रीचे उष्टे भांडे तसेच जमा करून ठेऊन देतात.
व दुसऱ्या दिवशी जमा झालेली भांडी स्वच्छ करतात. परंतु कधी चुकूनही रात्री उष्टे भांडे तसेच ठेऊ नये. कारण ज्यावेळी श्री विष्णू भगवंतांनी माता लक्ष्मीची बहीण दरिद्रा देवी यांचा विवाह दुर्वास ऋषी यांच्या सोबत लावला. त्यावेळी दुर्वास ऋषींनी श्री हरी विष्णू भगवंतांना सांगितले की भगवंता तुमची आज्ञा म्हणून मी दरिद्राशी विवाह केला.
परंतु ज्या ठिकाणी भगवंतांचे नामस्मरण होते आशा ठिकाणी माझी पत्नी दरिद्रा काही प्रवेश करत नाही. तर मग मी माझ्या पत्नीला कुठे घेऊन जावू. त्यावेळी श्री विष्णू दुर्वास ऋषींना सांगितले की ज्या घरात अस्वच्छ असते आणि ज्या घरात रात्रीचे उष्टे भांडे तसेच पडलेले असतात आशा घरात तुम्ही तुमच्या पत्नी सह प्रवेश करू शकता.
तसेच ज्या घरात दुपारच्या वेळेस स्त्री झोपलेली असते आशा घरात ही दरिद्रा देवी प्रवेश करेल. तसेच ज्या घराच्या दारात काट्यांची झाडे लावलेली असतात आशा घरात ही दरिद्रा देवी प्रवेश करते. तर श्री हरी विष्णूंनी दरिद्रा देवीला या 3 ठिकाणी प्रवेश करायला संगितले आहे. म्हणून कितीही घाई गडबड असेल तरी ही रात्री उष्टे खरकटे भांडे तसेच ठेवू नयेत.
तसेच आपले घर नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवावे. बाहेरून कोणी जर अचानक घरी आले असतील तर त्यांना प्रसन्न वाटायला हवे. म्हणजे आपल्या घरात दरिद्रा देवी प्रवेश करणार नाही. तसेच देवी लक्ष्मी व देवी दरिद्रा यांचे 2 बंधू म्हणजे दाता व विधाता दाता ला तुरटी प्रिय आहे.
तर विधाताला मीठ प्रिय आहे. जर घरात लक्ष्मी टिकत नसेल घरात सुख-समाधान लाभत नसेल तर तुरटी व मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी. यामुळे घरात सुख संपन्नता व शांतता येईल आणि घरात माता लक्ष्मीचा वास होईल.