नमस्कार मित्रांनो,
सध्याच्या काळात पैशांचे महत्व अनन्य साधारण झालं आहे. पैसे कमवण्यासाठी अनेकजण विशेषतः घरातला कर्ता पुरुष तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत असतो. आशा वेळी असं दिसून येत की आपण खूप मेहनत करतो मात्र त्या मेहनतीला यश येत नाही.
आशा वेळी पैशाला आकृष्ट करण्यासाठी आपण अंकशास्त्राची मदत घेऊ शकतो.हा अगदी साधा सोपा उपाय आहे. काही दैवीय अंक आपण पाहणार आहोत हा दैवीय अंक एका पांढऱ्या कागदावर लिहायचा आहे. आणि तो कागद झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचा आहे आणि त्या उशीवर डोक ठेऊन झोपी जायचं आहे. जर तुम्ही उशी घेत नसाल तर गादी खाली किंवा चटई खाली ठेऊन झोपलात तरी चालेल.
मात्र झोपी जाण्यापूर्वी त्या कागदाकडे पाहायचं आणि त्यावर जे नंबर आहे तो नंबर पुन्हा पुन्हा बोलायचे आहेत आणि आपलकडे भरपूर प्रमाणात पैसा येत आहे अशी मनोमन कल्पना करून आपण झोपी जायचं आहे. हा उपाय तुमच्याकडे पैसा आकर्षित करू लागतो व पैशात वाढ होते. नंबर आहे 5, 2, 0, 7, 4, 1, 7,7 ,7 हा एक दैवीय नंबर आहे.
अंकशास्त्रात या अंकाचे फार मोठे महत्व सांगितले गेले आहे. हा नंबर लिहताना हिरवा किंवा निळ्या रंगाच्या पेनचा वापर करायचा आहे. विशेष करून हिरव्या शाईच्या पेनचा वापर केलात तर अति उत्तम ठरेल. आणि हा उपाय दररोज रात्री करायचा आहे.
आणि तुम्हाला हा उपाय अजून पुढच्या लेवल ला घेऊन जायचं आहे तर एखाद्या हिरव्या काचेच्या बॉटल वर निळ्या किंवा हिरव्या शाईने हा नंबर लिहा त्या बॉटल मध्ये पाणी भरा मग या बॉटलीतले पाणी पिण्यास सुरू करा. याने सुद्धा अनेकजनांना फायदा पडलेला आहे.
तसेच आणखीन एक गोष्ट आपल्या डाव्या हातावर किंवा शरीराच्या कोणत्याही डाव्या भागावर हा नंबर निळ्या किंवा हिरव्या पेनाने लिहा. आणि या नंबर कडे दिवसातून जितक्या वेळ पाहणं शक्य आहे तितक्या वेळ पाहायचं आणि मनातल्या मनात तो अंक म्हणायचा.
हा अत्यंत छोटासा उपाय जी व्यक्ती मनात संकोच न ठेवता विश्वासाने अंकशास्त्राचे उपाय करते त्या व्यक्तींना आजपर्यंत फायदा झालेला आहे. तर उपाय नक्की करून पहा.