Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

पितृदोषाची 7 लक्षणे…घरात हे घडत असेल तर पितृदोष असतो..यावरील उपाय जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो,

पितृपक्षात आपण आपल्या पितृचं श्राद्ध घालतो. अनेक लोकांना हे माहिती नसेल जे आपले पितृ कोणत्याही कारणास्तव अप्रसन्न असतील तर त्यामुळे आपल्या जीवनात पितृदोष निर्माण होतात. आणि यामुळे अनेक प्रकारच्या समस्या जीवनात दिसून येतात. तर नक्की या दोषांना ओळखायचं कस की आपल्या पितृदोष जीवनात आहे. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते लक्षणे.

यात पहिला दोष जेंव्हा जेंव्हा अमावस्या असेल तेंव्हा अमावास्याच्या 2 दिवस आधी आणि अमावस्यानंतर 2 दिवस या 3 ते 4 दिवसात व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल व घरामध्ये एक प्रकारची उदासीनता दिसून येते असेल मन अस्वस्थ राहणे व अचानक दचकने, भास होणे तसेच नदी किंवा समुद्राला पाहून त्रास होणे. तसेच जर तुमच्या घरात असाध्य रोग झालेला आहे किंवा वि-षारी सर्प दं’श होणे हा सुद्धा पितृदोषाचा प्रकार आहे.

जेंव्हा पितृ कोपतात तेंव्हा घरात आजारपण येत. त्याचबरोबर जेवण करताना भांडणे होतात आणि एखादी व्यक्ती अन्न न खाता त्या अन्नाचा त्याग करून उठते. बऱ्याचदा मुलबाळ होत नसेल किंवा मुलबाळ झाले पण ते अपंग जन्माला येणे. तर अशा प्रकारे त्रास हे पितृदोषामुळे होऊ शकतात.

निद्रा नाश होणे, वाईट स्वप्न पडतात. देवा धर्मावरचा विश्वास उटतो. ही सर्व पितृ दोषाचे लक्षणे आहेत. घरात जर पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल. पती पत्नीच्या वैवाहिक जीवनात सुख समाधान लाभत नसेल. किंवा कोणतेही शुभ कार्य ठरताना त्यात जर विनाकारण अडथळे निर्माण होत असतील. तर लक्षात घ्या ही पितृदोषाची लक्षणे आहेत.

तुमच्या वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला मिळायला हवी ती जर तुम्हाला मिळत नसेल तर लक्षात घ्या तुमचे पितृ या सर्व गोष्टीत अडथळा निर्माण करत आहेत. शेजाऱ्यांशी किंवा समाजातील लोकांशी तुमचे विनाकारण भांडणे होत असतील. त्याचबरोबर कोर्ट कचेरीचा त्रास तुम्हाला चालू आहे किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा होते. ही सर्व लक्षणे पितृ दोषाची आहेत.

आर्थिक दृष्ट्या पाहिलं तर घरात कितीही पैसा येऊ द्या तो पुरत नाही. घरात धन, धान्य कमी हाऊ लागत. तसेच नौकरी मध्ये स्थिरता लाभत नाही. व्यवसायात स्थिरता नसते. डोक्यावर कर्ज होऊ लागत. हे सुद्धा पितृदोषाचे एक मोठं कारण आहे. मग यावर आपण नक्की आपल्या पितृना प्रसन्न कसं करावं. जर पितृ संतुष्ट असतील तर आयुष्यात काहीच कमी पडत नाही.

याच कारण असं आहे की आदिभौतिक स्थूल राज्याचे संचालक पितृ आहेत. आणि म्हणूनच आपल्या पितृच्या तृप्तीने आपल्या अनेक सुखांचा लाभ होतो. म्हणून पितृना प्रसन्न करणं हा अग्रक्रम आहे. सर्वात आधी आपल्या कुलदेवतेची पूजा करण्याआधी त्यांना प्रसन्न करण्यातआधी आपल्या पितृना प्रसन्न करणे आवश्यक आहे.

तर पितृना प्रसन्न कसे करावं? तर पहिली गोष्ट गो मातेला दररोज न चुकता आपल्या घरायली पहिली रोटी, चपाती आपण देऊ शकता. किंवा थोडस गवत जरी गो मातेला खाऊ घातलत तर यामुळे पितृ प्रसन्न होतात. आपण किमान 1 वर्षभरासाठी दररोज जेवण करण्यापूर्वी दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर कावळ्याला, गाईला किंवा कुत्र्याला किमान 1 घास अन्नदान नक्की करा. यामुळे सुद्धा पितृदोष नष्ट होतात.

त्याचबरोबर घरी जे अतिथी येतात त्यांचा पाहुणचार व्यवस्थित करा. पशु, पक्ष्यांना अन्न, धान्य देत चला. त्याचबरोबर वाहत्या पाण्यामध्ये थोडासा दही, भात आपण सोडा आपल्या पितृच्या नावाने या सर्व गोष्टी पितृदोषाला क्षमवतात. दररोज सकाळी एक चमचा सुद्धा गाईचे तूप घालून जर 1 दिवा आपल्या देवघरात आणि दुसरा दिवा आपल्या पूर्वजांच्या फोटो पूढे जर लावला.

तर यामुळे सुद्धा आपले पितृ प्रसन्न होतात. हे जे उपाय आहेत अगदी स्त्री असो किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. अगदी सोपे उपाय आहेत करून पहा मोठ्यातले मोठे अडचणी दूर होतील. आणि तुमच्यावरील पितृदोष ही नष्ट होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *