नमस्कार मित्रांनो,
घरातील सर्वात पवित्र, महत्वाची जागा म्हणजे आपलं देवघर आणि देवघरातील मूर्ती. या मूर्ती नेहमीच चमकत असाव्यात जेणेकरून, प्रसन्न वाटावे, असे प्रत्येकाला वाटते. यासाठी कमी त्रा’सात कमी खर्चात विना रासायनिक पदार्थ हे काम कमी वेळेत कराल, तर किती छान होईल. अनेकवेळी आपल्या देवघरातील देवांच्या मुर्त्या या थोड्याशा काळपट होतात.
पितळ धातूच्या मुर्त्या असल्यामुळे, पितळ हे लवकर काळे पडत असते. त्यासाठी बऱ्याचदा बाहेरच्या दुकानांमध्ये जाऊन त्या साफ करून आणतो किंवा बरेच घरगुती उपाय देखील आपण करतो. जर एक असा उपाय, जो घरीच घरातील सामान वापरून केला व त्याचा परिणाम देखील बघत रहाल,
असा झाला, तर कोणाला आवडणार नाही. यासाठी तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थित जाणून घ्या. काही वेळी वातावरण तर काही वेळी ऍसिड युक्त पाणी, हळद कुंकू, तेल, अभिषेक यामुळे देव मूर्ती चिकट व काळे दिसतात. अशा वेळी काही उलट सुलट परिणाम करणारे रासायनिक वापरण्या शिवाय काही सोपे उपाय देखील आपण करूच शकतो.
आपल्या देवघरातील देवांच्या मुर्त्या अशा पध्दतीने साफ करायच्या आहेत, आणि त्यासाठी आपल्याला घरातील काही सामग्री लागणार आहे. आणि साफ करण्यासाठी आपल्याला साधी सोपी प्रक्रिया करायची आहे. सगळ्यात पहिला आपल्याला एका मोठ्या पात्रामध्ये कोमट पाणी घ्यायचे आहे. हे पाणी कोमट असले पाहिजे.
गरम पाणी घेण्याची काहीही गरज नाहीये. त्यामुळे आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये गरम पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये चिंच टाकायचे आहे. आता आपल्या घरामध्ये दही असले नसले तरी चालेल. चिंच मात्र सगळ्यांच्याच घरांमध्ये असते. त्यामुळे आपल्याला छोटासा एक चिंचेचा गोळा या पाण्यामध्ये टाकायचा आहे.
चींचेच्या मदतीने आपल्याला देवांच्या मुर्त्या साफ करण्यास मदत होणार आहे. चिंच ही नेहमीच रासायनिक प्रक्रिया घडवते. व ती नैसर्गिकरित्या वापरली, तर तिचा उलट परिणाम नाही होणार. चिंचेचा वापर केल्यामुळे मूर्त्यां वर एक चमक यायला मदत होणार आहे आणि मुर्त्यांवर जमा झालेला काळा थर लवकर निघून जाणार आहे.
त्यानंतर या पात्रांमध्ये आपल्याला दोन चमचे रांगोळी देखील टाकायची आहे. रांगोळी ही इथे स्क्रब सारखे काम करणार आहे. त्यामुळे दोन चमचे रांगोळीचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यानंतर शेवटची गोष्ट आपल्याला इथे टाकायची आहे, ती म्हणजे एक चमचा बेसन पीठ. बऱ्याचदा बेसन त्व’चेच्या उपायांसाठी वापरले जाते.
बेसन पिठामध्ये असे काही औ’षधी गुणधर्म असतात, जे वस्तू अधिक उजळ बनविण्यासाठी कामी येतात. त्यामुळे आपल्याला एक चमचा बेसन यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता मुर्त्या ठेवायचे आहेत. या सर्व मुर्त्या या पात्रामध्ये टाकल्यानंतर,
एकेक मूर्ती घेऊन आपल्याला चिंचेच्या सहाय्याने मूर्तीला हळूवारपणे घासायला सुरुवात करायची आहे. मूर्तीचा प्रत्येक भाग काळजीपूर्वक घासा. तुम्ही यामुळे त्यांना हळुवारपणे घासायला सुरुवात कराल, तसे त्यावरील काळपटपणा कमी होईल. आणि रांगोळी मुळे मूर्तीवर असलेल्या छोट्या छोट्या छी’द्रंमधील देखील काळपटपणा निघून जाईल.
रांगोळी ही एक स्क्रब सारखी काम करणार आहे. त्यामुळे मुर्त्या लवकर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे आहे आणि अजून आक’र्षित दिसायला देखील मदत होईल. दुकानातून छोटा ब्रश मूर्ती घासण्यासाठी आणू शकतात, ज्या मूर्ती किचकट बनवलेल्या असतात, त्या तुम्ही ब्रशने साफ करा. एकदा का चींचेने देवांना एका ब्रशच्या सहाय्याने याने मुर्त्यांना घासून घ्यायचे आहे,
थोडा वेळ घासल्यानंतर तुम्हाला स्वतःला एक फरक जाणून येईल आणि मुर्त्या मध्ये झालेला फरक तुम्हाला दिसून येईल. मुर्त्या पूर्वीसारख्या नवीन असल्यासारखा चमकू लागतील. त्यावर एक चमक येईल आणि मुर्त्या नवीनच दिसू लागतील आणि हा उपाय केल्यामुळे परत मुर्त्या लवकर काळया पडणार नाहीत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप कमी वेळेत आणि कमी त्रा’सात तुम्ही तुमच्या देवांची चमक परत मिळवू शकता. याचा वापर आपण दररोज देखील करू शकतो किंवा महिन्यातून एकदा दोनदा देखील करू शकतो आणि मुर्त्या साफ करण्यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील होणार नाही.
वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.