नमस्कार मित्रांनो,
11 ऑगस्ट गुरुवारच्या दिवस आणि या दिवशी नारळी पौर्णिमा आलेली आहे. नारळी पौर्णिमेस आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करतो. प्रत्येक बहीण आपल्या भावाला मोठ्या प्रेमाने राखी बांधते आणि भाऊ सुद्धा आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे अभिवचन तिला देत असतो. यावर्षी नारळी पौर्णिमेचा प्रारंभ गुरुवारी सकाळी 10:38 मिनिटांनी होत आणि या पौर्णिमेची समाप्ती 12 ऑगस्ट शुक्रवारी सकाळी 7:05 मिनिटांनी होईल.
जो उपाय आज आपण पहाणार आहोत हा उपाय 11 ऑगस्ट गुरुवारी रक्षाबंधनाच्या दिवशी आपण करायचा आहे. आस्थेने व श्रद्धा भावनेने हा उपाय केल्यास याचा परिणाम तुम्हाला तात्काळ दिसून येईल. सध्याच्या काळात जर कोणती देवता जागृत असेल तर ती आहे भगवान मारोतीराया म्हणजेच हनुमान आहे.
प्रभू श्री रामचंद्रांनी हनुमानाला असं वरदान दिलं होतं की या कलियुगामध्ये जी व्यक्ती मोठ्या प्रेम भावाने हनुमाचे स्मरण करील त्या व्यक्तीकडे तुम्ही धावत जा आणि त्या व्यक्तीचे कार्य तुम्ही सफल करा. हनुमानाला असा आदेश प्रभू रामचंद्रांनी दिला होता.
आता आपण जी राखी बांधतो ती एक प्रकारे एक रक्षासूत्र आहे. जी बहीण राखी बांधते त्या बहिणीनी सुद्धा प्रत्येक संकटाच्या वेळी भावाच्या पाठी शी खंबीरपणे उभं राहायला हवं. आणि भावाने सुद्धा कोणत्याही संकटामध्ये बहिणीची साथ सोडता कामे नये.
परंतु आजच्या कलियुगामध्ये हे सर्व काही विपरीत घडत आहे प्रत्येकजण व्यावहारिकपणे वागत आहे. तर यामुळे रक्षाबंधनाला आपल्या बहिनीकडून तर राखी बांधून घ्याच मात्र स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाने या दिवशी आपल्या जवळपास असणाऱ्या हनुमानांच्या मंदिरात जाऊन मारुतीरायाच्या मूर्तीला किंवा फोटोला एक राखी अर्पण करा आणि त्यांना आपला बंधू माना.
त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आवडत्या देवी देवतेला ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवी देवतेला या रक्षाबंधनाला एक राखी नक्की अर्पण करा. जेंव्हा-जेंव्हा तुम्हाला मदतीची आस असेल त्या प्रत्येक समयी तुम्ही फक्त हाक मारून पहा ती देवता तुमच्या रक्षणार्थ नक्की उभी राहील.
तुमच्या मदतीला ती देवता नक्की येईल फक्त आपण आढळमनाने हा उपाय करायचा आहे. तर या रक्षाबंधनाच्या सणाला हा एक छोटासा उपाय आपण आवर्जून करा. त्या देवतेची कृपा आपल्यावर आयुष्यभर नक्की राहील..