नमस्कार मित्रांनो गेले काही दिवस आपण नकारात्मक ऊर्जे विषयी वाचत आहोत पण ती घरातून बाहेर कशी काढायची हेच आज आपण पाहणार आहोत.आपण आपल्यासोबत सकारात्मक तसेच नकारात्मक ऊर्जा आपल्या सोबतच आपल्या घरात येत असते.तर बाहेरून आलेल्या या नकारात्मक ऊर्जेला नष्ट कशे करायचे हे आज आपण पाहू. तसेच वास्तु शास्त्राअंतर्गत घराची नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकण्यासाठी बरेच उपाय केले गेले आहेत,
त्यातील एक म्हणजे खारट पाण्याने आपल्या घराची फरशी पुसणे हा ही एक उपाय आहे.ज्यावेळी आपण आपल्या घराची साफसफाई करत असतो तेव्हा आपल्या ज्या पाण्यानी आपले घर साफ करतो त्यामध्ये थोडे मीठ घालावे आणि मग आपण आपल्या घराची साफसफाई करावी.असे मानले जाते की घराची साफसफाई करताना, जर थोडेसे मीठ पाण्यामध्ये घातले आणि मग पुसले गेले तर घराची नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाते व तिचा नाश होतो.
ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या जीवनातील समस्या या दूर होतात.या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घरात सतत भांडणे होत असतात सुखशांती घरामध्ये वास करत नाही. परंतु आपणास हे माहित आहे का खारट पाण्याणी घर पुसण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे? तर वास्तुशास्त्राचा हा उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
इतरांच्या डोळ्यापासून संरक्षण करा:
म्हणजेच जेव्हा आपण आपले घर पुसून काढत असाल आणि त्याच वेळी कोणीतरी आले असेल तर, त्याच्यासमोर पाण्यात मीठ मिसळू नका. यासह, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की आपल्यास आपले घर साफसफाई साठी कोणी मदत करत असेल तर पुसलेल्या पाण्यात मीठ घातले आहे किवा त्यामध्ये मीठ आहे हे त्याला काळता कामा नये. असे मानले जाते की हे काम करत असताना एखाद्या व्यक्तीला बाहेरून दिसले तर या उपायाचा काहीही परिणाम होणार नाही. यामुळे, आपल्याला कोणताही लाभ मिळत नाही आणि होणारही नाही.
आठवड्याच्या प्रत्येक दिवशी हे काम करू नये:
काही लोक पाण्यात मीठ टाकून दररोज पुसतात, परंतु हे केले जाऊ नये. आठवड्याच्या प्रत्येक दिवशी पाण्यात मीठ मिसळून मिठाने पुसू नये. हे विशेषत: वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी, मंगळवार आणि रविवारी या दिवशी करू नये.बाकी दिवशी पाण्यात मीठ टाकून आपले घर स्वच्छ करावे.
पुसलेले पाणी घरात फेकू नका:
मीठ टाकल्यानंतर घराची साफसफाई केल्यास पुसलेले पाणी चुकूनही घरात टाकू नका. पुसलेले पाणी नेहमी घराबाहेर नाल्यात फेकले पाहिजे. असा विश्वास आहे की जर आपण ते पाणी घरातच फेकले तर नकारात्मक ऊर्जा घरातच राहिली जाते.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.