नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत की आपल्या त्वच्यावर जे काही रोग होतात त्यावर घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे वेगवेगळे आजार होत असतात. सततची वाढती लोकसंख्या त्यामुळे होणारे प्रदूषण आपल्याला बाधत असते. प्रदूषणामुळे इन्फेक्शन चा त्रास होत असतो. त्यामुळे अनेक फंगल इन्फेक्शन आपल्याला होत असते. श’रीराची अस्वछता तसेच श’रीर निरोगी न ठेवणे या सारख्या कारणांमुळे सुद्धा बरेच आजार होण्याची शक्यता असते.
मित्रांनो नायटा हा विशिष्ट प्रकारच्या कवकसं’सर्गामुळे म्हणजेच बुरशीसारख्या सं’सर्गामुळे हा रोग होत असतो. नायटा हा श’रीरावर गोलाकार उमटलेला चंकदळ सारखा असतो. नायटा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. नायटा हा मुख्यतः कमरेवर, जांघेत आणि श’रीराच्या मऊ भागावर आणि डोक्यावर उमटत असतो. ‘नायटा’ हा दगडी फुलासारखा दिसत असून तो पसरत असतो.
तसेच मित्रांनो नायटा हा गोल चट्ट्यासारखा असून अतिप्रमाणात खाज उठत असते आणि जळजळ वाढत असते. यामध्ये नायटा ज्या ठिकाणी उटतो त्या ठिकाणी त्वचा ही काळवंडत असते. नायटा उटण्याची कोणती कारणे आहेत ते आपण पाहूया… “नायटा” हा अस्वच्छतेमुळे होणारा आजार आहे. नायटा होण्याची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, तसेच एकमेकांचे कपडे परिधान करणे आणि ओले कपडे वापरणे.
“नायटा” होण्याची लक्षणे एकदा जाणून घ्या –
मित्रांनो नायटा हा अस्वच्छतेमुळे होणारा आजार तर आहेच पण नायटा हा कंबर, पोट, मांड्या, जांघेत या भागात जास्त करून होण्याची शक्यता असते. ज्या ठिकाणी ‘नायटा’ उद्भवलेला आहे त्या ठिकाणी खाज आणि जळजळ दोन्ही चा त्रास सुरु होतो. नायटा हा दिसायला लाला चट्ट्यासारखा असतो. नायट्याची वाढ ही वेगाने होत असते. नायटा झाल्यावर कातडीवर बधिरता नसते.
नायटा हा जर मुळापासून घालवायचा असेल तर काही घरगुती उपाय आपल्याला लाभदायक ठरतील. नायट्यावर उपाय कोणते आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत…
१) कोरफड – कोरफड ही वनस्पती औषधी असून आयुर्वेद शास्त्रामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते. कोरफड चा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. कोरफड हे नायट्यावर अत्यंत लाभदायक मानले जाते. नायटा कायमचा दूर करण्यासाठी कोरफडीचे सेवन हे नेहमी करावे. कोरफडीचा अर्क हे सर्व प्रकारचे बुरशीज’न्य रोग बरे करतो. ज्या ठिकाणी नायटा झाला आहे त्या ठिकाणी रात्रभर लावून ठेवावे त्याचा परिणाम आपल्याला लवकरच दिसून येईल.
२) आवळा – नायट्यावर आवळा हा प्रभावी ठरतो. ज्या ठिकाणी नायटा उठला आहे त्या ठिकाणी आवळ्याची साल काढून टाकल्यांनतर त्यामध्ये असणाऱ्या गुठळ्या जाळून त्याची जी राख होते. त्या राखेत नारळ तेल मिक्स करून लावल्यामुळे नायटा कमी होऊन खाज उठायची कमी होते.
३) ओवा – ओवा हा स्वयंपाक बनवण्यासाठी वापरला जात असतो. पण याचे सुद्धा आपल्या श’रीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते. ओवा हा नायट्याची स’मस्या दूर करतो. ओव्याला पाण्यात मिक्स करून पाण्याने धुवून घ्यायचे. ओव्यामध्ये कोमट पाणी मिक्स करून पेस्ट तयार करून एक आठवडा नायटा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लावावे. नायट्याची उपचारासाठी ओवा महत्वपूर्ण ठरते.
४) कच्चा बटाटा – कच्चा बटाटा हा सर्वांसाठी उपयुक्त ठरतो. बटाट्याचा उपयोग वेगवेगळ्या आजारांपासून ते त्वचेसाठी उपयुक्त ठरते. कच्चा बटाट्याच्या उपयोग करून नायटा दूर करू शकतो. कच्या बटाट्याचा रस पिल्यामुळे नायट्यावर चांगल्या पद्धतीने परिणाम होतो.
५) त्रिफळा – त्रिफळा हा गरम मसाल्यापैकी एक आहे. त्रिफळा बारीक करून त्याची पेस्ट मध्ये मोहरीचे तेल, तूप, फिटकरी आणि पाणी घालून एकत्रित मिश्रण करून नायट्यावर लावल्यामुळे नायटा हा कमी होऊ शकतो.
६) हळद – हळद ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हळदी ही दाहक असून तिच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्या ठिकाणी नायटा झाला आहे त्या ठिकाणी हळदी मध्ये पाणी मिक्स करून लावल्याने नायटा निघून जाण्यास मदत होईल. हळदीमध्ये बुरशीजन्य सं’सर्ग रोखण्यासाठी अँटी फंगल हा गुणधर्म आहे.
७) सफरचंद व्हिनेगर – नायटा कमी करण्यासाठी सफरचंद व्हिनेगर चा सुद्धा वापर आपण करू शकतो. या व्हिनेगर मध्ये भरपूर प्रमाणात अँटी फंगल हा गुणधर्म आढळतो. व्हिनेगर मध्ये कापूस भीजवून ज्या ठिकाणी नायटा आहे त्या ठिकाणी हळुवारपणे लावावे. आपल्याला नायटा ही स’मस्या दूर होऊन आपल्याला आराम सुद्धा मिळेल.
८) कडुलिंब – कडुलिंब हे आरोग्यासाठी अत्यंत प्र’भावशाली मानले जाते. कडुलिंबाचे भरपूर फा’यदे आपल्याला होत असतात. कडुलिंबाची पाने गरम पाण्यात उकळून घेऊन दररोज अंघोळ करावी असे केल्यामुळे श’रीरातील अस्वछता नाहीशी होऊन नायटा सुद्धा कमी होऊ शकतो.
९) बथुवा – नायटा दूर करण्यासाठी बथुवा हा उपयोगी पडेल. त्वचेच्या रोगाच्या बाबतीत जास्त वापर बथुवा चा करण्यात येत असतो. नायटा जर पूर्णपणे जायचा असेल तर बथुवाचा रस आणि त्याचे सेवन करणे गरचेचे आहे.
१०) लिंबू – नायटा हा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी लिंबू हा महत्त्वाचा ठरतो. लिंबूचे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नायट्यावर लिंबाचा रस लावल्याने थोडाशी जळजळ होईल पण ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
नायटा हा असा आजार आहे की प्रचंड त्रास होत असतो. नायट्यावर प्रथम आपल्याला स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ज्या ठिकाणी नायटा आहे त्या भागाची दररोज स्वच्छता करणे गरचेचे आहे. नायटा हा पसरणारा रोग आहे. एका व्यक्ती पासून तो दुसऱ्या व्यक्ती पर्यंत जाण्यासाठी वेळ लागत नाही म्हणूनच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आणि वेळीच त्याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे.
टीप: वरील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. आ-जारपण किंवा सं-सर्गाची लक्षणे आढळल्यास आपल्या डॉ-क्टरांचा सल्ला घ्या.