नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा…त्याचे आपल्याला काय फायदे होतात..? सर्व माहिती जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो, नवरात्रीत दिवा लावून या सं-बंधीचे नियम आणि अटी याची सगळी माहिती आपण पाहूया. दिवा अंधाराच्या जगात प्रकाश पसरवतो आणि प्रकाशा कडून आपली वाटचाल सुरू ज्ञानाकडे होतो. देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावत असतो.

नवरात्री अखंड दिवा का लावतात? 9 दिवसांपर्यंत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून गायीच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावला जातो. जर आपल्याकडे गाईचे तूप उपलब्ध नसेल तर तेलाने सुद्धा दिवा लावू शकतो. नवरात्रातील नऊ दिवस तेवून अखंड दिवा लावा. दिवा किंवा अखंड ज्योत असं म्हटलं जातं , असं म्हटलं जातं की नवरात्रीत दिवा तेवत ठेवावा आणि शांतता बनून राहते. सर्व कार्य सिद्धीस जातात. म्हणून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचं नियमाने संरक्षण करावं.

नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची काही नियम आहेत आणि ते आपण पाहिलेच पाहिजे तरच आपल्याला इच्छित फळ मिळेल. पितळेचा किंवा मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून आपण लावू शकतो. जर आपल्याकडे पितळेचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता. बऱ्याच जणांकडे पारंपारिक दगडी दिवा असतो तर तो सुद्धा तुम्ही अखंड दिवा म्हणून लावू शकता.

पितळेचा दिवा लावणार असाल तर व्यवस्थितपणे पितांबरीने घासून धुवून स्वच्छ पुसून लावून घ्या. पितळेचा दिवा सुद्धा व्यवस्थित तुम्ही घासून धुऊन स्वच्छ करून ठेवा शास्त्रानुसार नवरात्रीत लावण्यापूर्वी आपण मनामध्ये काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. एक गोष्ट लक्षात ठेवा की दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नाही. दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवायचा आहे. आणि नंतरच लावायचा आहे. दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवला तर त्याच्या अगोदर आपल्याला अष्टदल कमळ काढायचा आहे.

तर आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक जण देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा करतो जर तुम्ही दुर्गादेवीच्या महालक्ष्मी लक्ष्मी अशा काही रूपांत पूजन करत असाल किंवा मग कोणताही असो देवीचा तुम्ही पूजा करत असाल तर दिवा ठेवण्यापूर्वी त्याच्या अगोदर आपल्याला अष्टदलकमल काढायचा आहे.

ते तुम्ही तांदळाने काढू शकता किंवा फुलांनी सुद्धा काढू शकता. दिवा लावण्यापूर्वी अगोदर पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे. त्यावर आपली घटाची मांडणी करायची आहे. कलशाची मांडणी करायचे आहे. देवीचा फोटो वरती जे काही असेल ते तुम्हाला पुसायच आणि पुजायच आहे. सगळ्या गोष्टी करण्याअगोदर म्हणजे पूजेची मांडणी आहे ती सुरुवात केल्याबरोबर आपल्याला सर्वात आगोदर गणपती बाप्पांची पूजा करायचे आहे.

कोणतेही कार्य असो गणपतीबाप्पांना सगळ्यात आधी त्यानंतर आपली पूर्ण घटस्थापनेची मांडणी करायची आणि दिवा लावताना सुद्धा त्या खाली लाल रंगाचे कापड आल पाहिजे अशी काळजी घ्या आणि आपल्याला जमिनीवर ठेवायचा नाहीये. त्याच्या खाली लाल रंगाच्या कपडा त्यावर अष्टदल कमळ काढायचं. तांदळाने किंवा फुलांनी त्याच्यावर आपल्याला आपला पितळेचा किंवा मातीचा दिवा ठेवायचा आहे.

दिव्याखाली एक छोटसं खोलगट वाटी दिव्या खाली बसेल अशा पद्धतीने ठेवा. कारण आपण नऊ दिवस दिवा लावणार आहोत. तर त्याचं तेल आहे किंवा काजळी येवू शकते तर त्याच्यासाठी तुमचा कपडा पण खराब होणार नाही ही काळजी घेण्यासाठी तुम्ही दिव्याखाली वाटी किंवा ताट जरूर ठेवावा. ही वात आपल्या सव्वा हात इतक्या मापाची होईल आणि कच्च्या कापसाचे ही वात आपल्याला तयार करायचे आहे. या वातीला रक्षासूत्र सुद्धा म्हटलं जातं. अखंड तेवण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा.

जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण रिफाइंड ऑइल किंवा मोहरीच्या तेलाचा सुद्धा दिवा लावू शकतो. तुपाचा अखंड दिवा देवीच्या उजव्या बाजूस ठेवावा. जर का दिवा तुपाचा असेल तर उजव्या बाजूस ठेवावा. तेलाचा दिवा असेल कोणत्याही तेलाचा असो मग तो देवीच्या डाव्या बाजूस ठेवावा. दिवा लावायला तुम्ही त्याच्यावर काचेचे झाकण सुद्धा ठेवू शकता. संकल्प तुम्ही घ्यायचा आहे. दिवा लावण्यापूर्वी तुमच्या इच्छा असतील उदाहरणार्थ देवी आई माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. मला अमुक अमुक गोष्टींमध्ये यश मिळते आणि दिवा लावताना तुम्हाला हा संकल्प करायचा आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण टेन्शन घेतात. दिवा जर विझला तर काही असो तर असं काही होत नाही दिवा जर विजला असेल तर आपण जेव्हा बघितला तेव्हा त्याला लगेच लावू शकतो. फक्त एक गोष्ट करायची की घटस्थापनेची मांडणी आपणासाठी करायची की जिथे हवा वगैरे लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः फुंकर मारून दिवा कधी विझवायचा नाही. जर तो अचानकपणे विझला असेल तर काही अशुभ मानायचं नाही. जेव्हा तेव्हा लगेच त्याची वात पेटवायचे आहे. कोणत्या बाजूला असावी कोणत्या दिशेला असावे याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व मध्य दिशा.

देवी देवतांचे स्थान या ईशान्य दिशेला मानलं जातं. म्हणूनच पूर्व-दक्षिण दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात ठेवणे अशुभ असतं. लक्षात ठेवा पूजेच्या वेळी दिव्याचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे आलं पाहिजे. अखंड दिवा तेवत ठेवण्यापूर्वी श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकर यांची पूजा करावी.

अखंड दिवा लावताना कोणताही एक मंत्र म्हणु शकता. एकदम सोपे मंत्र , यातला पहिला मंत्र आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते किंवा अजून सोपा मंत्र दीपज्योति परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरी पाप संध्या दीपक नमोस्तुते दीपज्योति परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हर नमस्तुते. शिवाय सगळ्यात सोपा आपला जो मंत्र आहे. शुभम करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा दृष्ट बुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. शुभम करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा शत्रू बुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. तुम्हाला जो सोपा मंत्र वाटेल तर तुम्ही म्हणू शकता. नेहमीचा शुभम करोति कल्याणम हा सोपा मंत्र म्हटला तरी चालेल.

दिवा लावण्याचे नियम जाणून घ्या. नवरात्रीमध्ये अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यामुळे आयुष्य वाढतं. दक्षिण दिशेला ठेवल्याने दुःख वाढतं. दिव्याची वात उत्तर दिशेने केल्यामुळे आपल्याला धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्यास तोटा होतो. हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या संबंधित सुद्धा असू शकतो. कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी दिवा लावताना यामुळे त्वरित यश आपल्याला प्राप्त होतं. उष्णता दिव्या पासून सुमारे चार बोट जाणवली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दिव्याची वात ठेवायचे आहे. तेच भाग्याचा सुचक असतं आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपण दिव्या च्या शेजारी कुठेतरी आपल्या घटाची मांडणी केलेली असते तर त्या उष्णतेमुळे गहू किंवा आपण जे काही धान्य पेरतो.

धान्य जे वेदिकेत मिसळलेलं असतं तर ते छान पैकी अंकुरला जातो. दिव्याची वात सोनेरी असावी. लक्षात ठेवा दिव्याची वात किती असावी याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. तर दिव्याची वात बारीक असावी खूप जास्त मोठी नसावी. एकदम सुंदर नाजूक दिव्याची वात तेल किंवा तुपाने ओवाळताना दिवा लावतो. त्याची जशी वात छोटीशी नाजूक लावतो तर अशा पद्धतीने दिव्याची वात सोनेरी म्हटल्यावर त्याला जर काजळी आली असेल तर अगरबत्तीची काडी असते ती छोटीशी काडी घेऊन तुम्ही ती काजळी काढून ठेवू शकता. दिव्याची वात सोनेरी असल्यामुळे आपल्या जीवनाला धनधान्य अफाट मिळतो आणि व्यवसाय सुद्धा आपली प्रगती होते. जर हा दिवा काही कारणास्तव स्वतः असल्यास घरामध्ये आर्थिक संकट येण्याची शक्यता असते.

फक्त फुंकर मारून दिवा विझवायचा नाही अचानक पणे कधी विझला असेल तर त्याला बरीच कारणं असू शकतात. तर अशुभ मानायचं नाही. दिसल तेव्हा लगेच दिव्याची वात लावून द्यायची. दिव्या मध्ये व्यवस्थित वात घालून मगच दिवा लावायचा आहे. जर आपण दिव्यामध्ये वात वारंवार बदलल्या तर ते अशुभ मानलं जातं आणि आजारांमध्ये सुद्धा वाढ होते. मंगल कार्यालयात अडथळा होतो. वास्तू शास्त्राचे काही नियम आहेत. नवरात्रीमध्ये मातीचा अखंड दिवा लावल्यामुळे आर्थिक भरभराट येते आणि आपले सर्व दिशांमध्ये कीर्ति वाढते. नवरात्रीत दिवा लावल्मुयाळे घरामध्ये आणि कुटुंबामध्ये सुख शांती आणि पितृ शांती सुद्धा मिळते. नव

रात्रीमध्ये तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यामुळे सर्व शुभ कार्य सिद्ध होतात. जर विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी काही त्यांचे प्रयत्न चालू असतील पण यश मिळत नसेल तर त्यांनी नवरात्रीमध्ये तुपाचा दिवा लावा. जर आपल्याला काही वास्तुदोष सांगितलेले असतील तर त्याला दूर करण्यासाठी जिथे वास्तुदोष सांगितलं ते ठिकाणी आपल्याला तिळाचा दिवा नवरात्रीमध्ये लावायचा आहे. आणि जर शनीचा काही दुष्प्रभाव तुमच्यावर असेल तुम्हाला जर सांगितलं असेल की तुमच्या वर शनीचा दुष्प्रभाव आहे आहे तर नवरात्रीमध्ये तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा. हा दिवा शुभ मानला जातो.