Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

या मुलाच्या लग्नासाठी आई वडील मागे लागले होते, पण त्याच्या सोबत मावशीने जे केले होते ते पाहून ध’क्का बसेल..यामुळेच तो लग्नासाठी तयार होत नव्हता..

सुमित हा तिशीचा तरुण. देखणा, स्मार्ट, भरपूर शिकलेला, भरपूर कमाई असलेला, सुस्वभावी वगैरे. थोडक्यात ‘लग्नाळू’ मुलींसाठी उत्तम ‘स्थळ’. पण घरात लग्नाचा विषय काढला की “नाही” हा एकच शब्द उच्चारून विषय संपवत असे. तुला आवडलेल्या कुठल्याही मुलीशी लग्न कर. आमचे काही म्हणणे नाही” असेही आईवडिलांनी सांगून पाहिले. ‘सुमितला कुठली मुलगी आवडलीय का ?’ याची चाचपणी त्याच्या मित्रपरिवारात करून झाली. पण याबाबतीत सुमितची पाटी कोरी होती.

सुमितला त्याचा मित्र आनंद आणि त्याची बायको सहज भेटायला घरी आले. मीरा ही सुमित च्या मोठ्या बहिणीप्रमाणे होती. सुमित, आज तुला स्पष्टच विचारते. तू ‘लग्न करायचं नाही’ का म्हणतोस ? मीराने थेट मुद्द्याला हात घातला. “बरं. मग आज मीसुद्धा स्पष्टच सांगतो. मी लग्न करायला ‘लायक’ नाही. मुळात लग्न कशासाठी करतात ? निसर्गतः स्त्री आणि पुरुष एकमेकांकडून कसली अपेक्षा करतात ? ती अपेक्षाच मी पूर्ण करू शकत नाही.

पण मग आपण स्पेशलिस्ट डॉ’क्टरला भेटू या ना. यात डॉ’क्टर काय करणार ? जर शा’रिरीकदृष्ट्या मी केपेबल नसेनच तर त्यात डॉ’क्टर काय करेल. तो काय देव आहे ? अरे, इतका सुशिक्षित असून तू असं वेड्यासारखं काय बोलतोस ? डॉ’क्टरांना म्हणू दे ना, ते यात काही करू शकत नाहीत म्हणून ! आपण एखाद्या जडीबुटीवाल्या वैदूकडे नाही. क्वालिफाईड डॉ’क्टरकडे जाऊ. माझा मित्रच आहे असा एक डॉ’क्टर.

आपल्यापेक्षा वयाने फारतर चार-पाच वर्षांनी मोठा असलेला हा डॉ’क्टर पाहून खूप जुना मित्र भेटल्यासारखे सुमितला वाटले. डॉ’क्टरांनी सुमितचा प्रॉब्लेम शांतपणे ऐकून घेतला आणि त्याअनुषंगाने त्याला एकदोन आवश्यक टेस्ट्स करायला सांगितल्या. त्या टेस्टसचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आले.

मग डॉ’क्टरांनी त्यांचे कौशल्य वापरून सुमितला बोलते केले आणि त्याच्या अं त र्म ना त खोलवर दडपला गेलेला तो ‘नकोसा’ प्रसंग सामोरा आला. सुमितने सांगितले तेव्हा पंधरा वर्षांचा कोवळा कुमार होता. नुकताच यौ’वनात प्रवेश केलेला. एकदा दुपारी तो एकटाच घरात असताना अचानक बेला मावशी आली. आईची मैत्रीण. आईच्याच वयाची. ती अविवाहित होती. खाजगी आयुष्यातील काही अडचणींमुळे तिचे लग्न होऊ शकले नव्हते.

आई घरात नाहीये, मावशी. सुमितने कॉफी केली आणि डिशमध्ये वेफर्स, बिस्किटे घालून ती डिश आणि कॉफीचा मग घेऊन तो बाहेर आला. “काय हँडसम दिसू लागलास रे ! आता पुरुष झालास तू. मी तर तुला अगदी तू ‘बाळ’ असल्यापासून बघते आहे.” मावशीने आधी सुमितचा गा ल गु च्चा घेतला. मग एकदम आवेगाने त्याला जवळ ओ’ढले आणि त्याच्यावर चुं’बनांचा वर्षाव सुरू केला.

मावशी ! मावशी  गांगरून, गोंधळून गेलेला सुमित मोठ्ठ्याने ओ’र’डू लागला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आईच्या वयाच्या, ‘आदरणीय’ बाईचा हा असा विलक्षण ध-क्कादायक अनुभव आल्याने हडबडून गेलेला सुमित सोफ्यावर कोसळलाच. आता मनात खोलवर दडलेला हा प्रसंग बाहेर पडताच सुमित लहान मुलासारखा चक्क रडू लागला.

आता कळलं ना तुला ? ‘हा’ विषय निघाला की तुला घाम का फु’टत होता ते ? तुला काहीही प्रॉब्लेम नाही. तू चांगला धट्टाकट्टा पुरुष आहेस. तुला लग्न करण्यास काही अडचण नाहीये. डॉ’क्टर त्याच्या पाठीवर थाप मा’रत म्हणाले. खरंतर तरुण मुलामुलींना अशा अनेक समस्या येतात.

या विषयाबाबत मनात गैरसमज,भीती असते. उघडपणे कुणाशी याबाबत बोलायला, विचारायला लाज वाटते. कधीकधी बालवयात, उमलत्या वयात नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागलेले असते. फक्त मुलींनाच नव्हे तर मुलग्यांनासुद्धा. बाल लैं-गिक शो’ष’ण हा भयानक प्रकार आहे. अशा प्रसंगांचे परिणाम दूरगामी असतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी न लाजता डॉ’क्टरची मदत घ्यायला हवी. फक्त मुलींनाच नव्हे तर मुलग्यांनाही या बाबतीत सजग करायला हवं आहे. त्यासाठी आधी पालकांनी ‘जागरूक’ असायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *