Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

मेष रास : एप्रिल महिन्यात या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणार…शिवाय या संकटाना द्यावे लागू शकते तोंड..

नमस्कार मित्रांनो,

एप्रिल महिन्यात सर्व ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत आणि ही खूप महत्त्वाची बाब ठरते. हजारो वर्षानंतर हा काळ आला असावा त्यामुळे या काळात युग परिवर्तन होईल अस म्हणता येईल. मार्च महिना सर्व राशींसाठी खास आहे. या महिन्याची सुरुवात ग्रहांचा पंचयोग आणि महाशिवरात्रीने होत आहे.

यासोबतच या महिन्यात शुक्र, बुध आणि सूर्य देवाच्या राशींमध्ये बदल होईल तर या महिन्याच्या शेवटी गुरूचा उदय होईल. यासह संवत २०७८ या महिन्यात संपणार आहे.

व्यक्तीमत्व:- व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामींची स्थिती महत्वाची ठरते. कळत नकळत संताप होणं, एखाद्या शत्रूकडून नकळतपणे दगा दिला जाणे, ज्याच्यावर तुम्ही प्रचंड विश्वास ठेवता त्याच्याकडून फसवणूक होणं हा प्रकार या काळात घडू शकतो म्हणून मेष राशीच्या लोकांनी सावधगिरीने आपली पावले उचलायला हवी.

कुटुंब:- कौटुंबिक दृष्ट्या विचार केला असता तुमचा कुटुंबेश आणि कुटुंब स्थानातील ग्रह यांची स्थिती महत्वाची ठरते. तुमचे कुटुंबेश म्हणजे तुमचे गुरू महाराज होय ते आपल्या सम असलेल्या शनी महाराजांच्या कुंभ राशीत म्हणजे चतुर्थ स्थानात विराजमान आहेत एकंदरीत ही स्थिती कौटुंबिक शिस्तीच, कडक वातावरण दर्शवत आहे.

त्यामुळे कुटुंबात शांतीचे वातावरण राहील. मात्र या काळात तुम्हाला तुमच्या आईच्या आ रोग्यविषयी जास्त काळजी घ्यावी लागेल. वडिलांकडून तुम्हाला विशेष सहयोग प्राप्त होणार आहे. सं ततीचा खोडकर पणा थोडा वाढलेला असेल. एकंदरीत कौटुंबिक पातळीवर तुम्हाला संमिश्र फळं मिळणार आहेत.

परिश्रम:- परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या परिश्रमाचा कारक ग्रह म्हणजे शनी महाराज होय ते परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशी स्वामी सोबत लाभ योग करत असल्यामुळे तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील किंबहुना योग्य प्रमाणात केलेले व योग्य तो लाभ मिळवुन देणारे परिश्रम तुम्ही या काळात करणार आहात. त्याची शुभ फळं शिक्षणात, करियर मध्ये, आर्थिक लाभामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहेत.

वास्तू, वाहन, जमीन खरेदीविक्री:- वास्तू, वाहन, जमीन, सुख-शांती या दृष्टीने विचार केला असता हा काळ मेष जातकांसाठी अजिबात योग्य नाही. त्यामुळे जे जातक नवीन वास्तू किंवा वाहन खरेदी करणार असतील त्यांनी थोडी प्रतिक्षा करावी. पण ज्यांना जमीन म्हणजे एखादा प्लॉट किंवा शेतजमिन घ्यायची असेल त्यांच्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. तसेच शुभ योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. काही लोकांना घराचे नूतनीकरण करायचे असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ योग्य आहे.

शिक्षण:- शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकाना या काळात अधिक परिश्रम घ्यावे लागतील, मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेत असला तरी नेहमी पेक्षा तुम्हाला जास्त वेळ अभ्यास करावा लागणार आहे तरच अपेक्षित यश तुम्हाला मिळेल कारण या महिन्यात ग्रहांचे सहकार्य त्या तुलनेत कमी आहे.

आ रोग्य:- या काळात एक उत्तम आ रोग्य मेष राशीच्या लोकांना प्राप्त होऊ शकतं. आ रोग्य उत्तम असेल तर माणूस कर्तृत्व चांगल्या प्रकारे करू शकतो त्यामुळे या काळाचा सदुपयोग करत तुम्ही मोठं कर्तृत्व गाजवाव. स्पर्धक सहसा तुमच्या वाट्याला जात नाहीत पण या महिन्यात तर ते अजिबात जाणार नाहीत.

नोकरी व व्यवसाय:- नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना सामान्य म्हणता येईल. रोज छोटे मोठे प्रश्न उभे राहतील त्यांच्यावर समाधान शोधत तुम्ही मार्ग काढत रहाल व शेवटी यश मिळेल. तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. मालमत्तेच्या विक्री, खरेदी किंवा बांधकामाशी सं बंधित निर्णय घेणे टाळा. याने व्यावसायिक दृष्ट्या तुमच्या संसाधनांचा योग्य वापर करण्यात, तुमची उत्पादकता वाढवण्यात आणि प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यात मदत होईल.

भाग्य:- भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता, एप्रिल महिन्यात मेष जातकाना संमिश्र फळ प्राप्त होऊ शकतात किंवा महिन्याचे सरळ दोन भाग करता येऊ शकतात. कारण महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला भाग्याचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल तर दुसऱ्या पंधरवाड्यात सहकार्य कमी झालेलं असेल तरी देखील तुम्ही कर्माने यश खेचून आणणार आहात.

शुभ दिवस:- मेष राशीच्या लोकांसाठी 1, 9 आणि 20 हे दिवस शुभ तर 7, 17 हे दिवस त णावाचे व सं घर्षाचे असणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *