Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

मित्रांनो स्वामी म्हणतात कि मेहनत इतकी करा कि मला तुम्हाला जे पाहिजे ते द्यावेच लागेल..

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि आपण जे रात्रंदिवस मेहनत करत असतो आणि काहीवेळा आपल्याला यश हे भेटत नाही म्हणून आपण ते काम करणे सोडून देतो.तर याबादल स्वामी आपल्यला काय उपदेश देतात हे आज आपण पाहणार आहोत.तर श्री  स्वामी समर्थ महाराज यावर असे  म्हणतात की तुम्ही प्रयत्न एवढे करा की मला द्यावंच लागेल.

मित्रांनो कष्ट इतके करा मेहनत इतकी करा कि देवालाही तुम्हाला ते द्यावेच लागेल मित्रांनो या कलयुगामध्ये आपल्याला फक्त प्रामाणिकपणे कष्ट करायचे आहे आणि शेवटी देवालाही तुमचे म्हणे आईकावे लागेल आणि जे तुम्हाला पाहिजे आहे ते त्याला देण्यास भाग पडेल.

मित्रांनो आपण करत कसलेल्या कामामध्ये  कोणत्याही कामात इतके  झोकून जा कि  रात्रंदिवस मेहनत करा त्या आपल्या स्वप्नांसाठी  आणि त्यासोबत देवाची श्रद्धा ठेवा त्यावर विश्वास ठेवा आणि  खालील प्रमाणे उपायही करा… नक्की  कामामध्ये तुम्हला यश मिळेल.

मित्रांनो  स्वामी  म्हणतात की तुम्ही जगताना  जगा इतकं की आपले  आयुष्य तुम्हाला कमी पडेल. हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले नाही तर तो नशिबाचा खेळ माना. पण प्रयत्न इतके करा की मला देण भागच पडेले पाहिजे. प्रयत्न तुम्हाला दोन गोष्टींचे करायचे आहेत.

पहिला प्रयत्न करायचा तो म्हणजे आपण जे कर्म करत आहोत आपण जे काम करत आहोत त्यामध्ये तुम्हाला तुमचे  शंभर टक्के द्यायचे आहेत.स्वामी म्हणतात आपल्या आसपास जी काही गरीब लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांना मदत करा आपल्याला शक्य असेल तेव्हा कपडे धान्य अशा स्वरूपात दानधर्म  करा.

मित्रांनो  असं केल्याने तुमच्या पुण्याचा वाढ होईल  आणि मग  तुम्हाला जे काही पाहिजे ते देण्याशिवाय माझ्याकडे  पर्यायच उरणार नाही हे स्वामी म्हणतात.आणि  दुसरा प्रयत्न करायचा सेवा करत आहात, जी तुम्ही भक्ती  करत आहात त्यामध्येही १००% द्यायचे. म्हणजे सगळं मनापासून आणि पूर्ण विश्वासाने करायचं आहे.

स्वामी म्हणतात, माझे नित्य स्मरण करा माझ्या नावाचा किमान १०८ वेळा  रात्री जप करा कधीही करा ऑफिसमध्ये करा प्रवासात करा झोपताना करा जेवताना करा.मंत्र जाप केल्यामुळे तुमच्या मनाची शुद्धता होईल तुमचे विचार सकारात्मक होतील.

या तुमच्या झालेल्या सकारात्मक बदलामुळे तुमची परिस्थिती ही बदलत जाईल तुम्ही केलेल्या नामजपामुळे मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला तुम्ही जे मागताय ते देण्याशिवाय माझ्याकडे काय पर्यायच राहणार नाही असे स्वामी म्हणतात.

पण कर्म करताना फळाची अपेक्षा करू नका निस्वार्थपणे स्वामींची सेवा करा लोकांची सेवा करा.म्हणजे काम करत आहात त्याचे फळ पण तुम्हाला मिळेल. मित्रांनो  स्वामींचा महिमा अगाध आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि चांगले कर्म आणि सेवा मनोभावे करा भक्तिभावाने करा तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *