नमस्कार मित्रांनो, आपण देवदर्शनासाठी मंदिरात जातो त्यावेळी आपण देवाचे दर्शन घेतल्यावर तेथील पुजारी देवाला स्पर्श झालेले फुल, प्रसाद देतात अथवा आपण ही देवाच्या चरणावरचे फुल तसेच प्रसाद घेत असतो. मानले जाते की हे देवाच्या आशिर्वादा समान असते. परंतु आपण ते फुल घेतल्यावर काय-काय करावे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही.
काही लोक तसेच आपल्या गाडीत ठेवतात व नंतर तेच फुल आपल्या पायदळी येतात हे एक पाप ठरते त्यामुळे आज आपण मंदिरातून आशिर्वाद रुपी फुलांचे नेमके काय करावे जेणे करून त्याचे शुभ फळ आपल्याला लाभतील. प्रत्येक जण मंदिरामध्ये गेल्यावर देवाचे मुख दर्शन चरण स्पर्श व्हावे देवाला डोळे भरून पहावे तसेच त्यांचा आशिर्वाद म्हणून त्यांना अर्पण केलेली काही तरी वस्तू आपल्याला मिळावी असे वाटत असते.
या प्रमाणे काही लोक देवाजवळील फुले, चुनरी इत्यादी घरी आणतातही जेणे करून देवाचे चरण स्पर्श झालेले वस्तू रुपात आशिर्वाद आपल्या सोबत कायम राहील. परंतु काही काळानंतर त्याचे काय करावे हे त्यांना माहीत नसते. प्रसाद आपण लगेच खातो किंवा वाटून टाकतो परंतु फुले नंतर सुखून जातात मग त्याचे काय करावे.
तर त्या फुलांना घरी ठेवणे अथवा न ठेवणे यासाठी वेगवेगळे नियम आहेत काही लोक ही फुले वाळल्यानंतर कुठे तरी बाजूला ठेवतात अथवा नदीत प्रवाहित करतात. परंतु तुम्हाला तर देवाच्या चरण स्पर्शचे फुल मिळाले तर ते सर्व प्रथम आपण आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी अथवा तिजोरी मध्ये ठेवायची आहे.
परंतु हे फुल सुखल्यानंतर पाकळ्या होतात त्यामुळे आपण ते फुल लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पूजा स्थळी ठेऊ शकता. अथवा आपण आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तिजोरी मध्ये ठेऊ शकता. यामुळे असे मानले जाते की माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहते तसेच धन-धान्यामध्ये वृद्धी होते.
तसेच आपल्यावर देवी-देवतांचा आशिर्वाद राहतो. जर प्रवासा निमित्त बऱ्याच काळ आपण घरापासून दूर असतो तेव्हा मंदिरातून मिळालेला प्रसाद किंवा फुल आपल्या कडे असतील तर त्या वेळी आपण त्याचा सुगंध घेऊन त्याच्या मध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे.
ती आपल्या मध्ये ग्रहण करू शकतो व नंतर ते फुल आपण झाडाच्या खोडाजवळ किंवा पाण्यात विसर्जित करू शकत तो. नाहीतर ते फुल आपल्याला घरी आणायचे असेल ते आपण पांढऱ्या कागतात बांधून आणू शकतो आणि घरी आल्यावर ते पूजा स्थळी किंवा तिजोरी मध्ये ठेवायचे आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला मिळालेले देवस्वरूप फुल हे सदुपयोगी किंवा चांगल्या पवित्र ठिकाणी ठेवायचे आहे किंवा पाण्यात विसर्जन करायचे आहे. याचे आपल्याला निश्चित चांगले फळ मिळेल.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.