Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

मंदिरात गेल्यावर जर ‘हे’ दिसले; तर लगेच उचलून घ्या..घरी पैशांचा ढीग लागेल..लक्ष्मी मातेची होते कृपा

नमस्कार मित्रांनो हिंदू ध र्म शास्त्रात देवी देवतांना फार महत्व आहे. देवाची उपासना, देवपूजा, भक्ती, अनेक धार्मिक क्रिया यांना फार महत्व आहे. भारतीय लोक पूर्ण श्रद्धेने देवाला शरण जातात, त्याची आराधना, प्रार्थना करतात. आपल्याकडे मंदिर हे एक साधनेचे, प्रार्थनास्थळ व पवित्र स्थळ मानले गेले आहे.

त्यामुळे शांतीसाठी, साधनेसाठी, पूजेसाठी आपण मंदिरात जातो. मंदिरातील प्रत्येक गोष्टीला एक धार्मिक अर्थ व महत्व आहे. तसेच तेथील प्रत्येक वस्तूत साक्षात ईश्वर वास करतो अशी मान्यता आहे, तेथील सकारात्मक ऊर्जा त्या वस्तूंमध्ये असते.

अशा गोष्टी ज्या आपण मंदिरातून आशीर्वाद म्हणून घरी आणू शकतो व त्यामुळे तुमच्या घरी तितकी सकारात्मक ऊर्जा येईल व देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहतील. आपण अनेकवेळा देवाच्या चरणी वाहिलेले फुल, गंध तसेच मंदिरात मिळालेले पैसे जपून ठेवतो कारण आपली तितकी श्रद्धा असते व देवावरती आपला विश्वास असतो व देवत्व आपण अशा गोष्टींमध्ये पाहत असतो.

माता लक्ष्मी आपल्या सुखी, ऐश्वर्यसंपन्न घरात नेहमी वास करावी असा वाटते व तसेच बलशाली, बुद्धिमान व महान राम भक्त श्री हनुमान यांचीही कृपा आपल्यावरती रहावी अशी इच्छा प्रत्येकाची असते. यासाठी हा उपाय, चमत्कारिक, दैवी अनुभूती देणारा उपाय नक्की करा.

यामुळे तुम्हाला साक्षात माता लक्ष्मी व हनुमान जी दर्शन देतील, प्रसन्न होतील. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने हा उपाय तुम्ही करा. यासाठी मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हे करताना नेहमी ईश्वराचे चिंतन करा. तसेच हे करताना घरातील अडचणी दूर व्हाव्यात अशीही प्रार्थना करा.

कोणत्याही मंगळवारी हा उपाय करा. त्यासाठी 5 बेसनाचे लाडू घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरात जायचे आहे. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने आपल्याला सफलता मिळते. त्यादिवशी या देवतेच्या ऊर्जालहरी जास्त कार्यरत असतात. हे 5 बेसनाचे लाडू घेऊन याचा नैवेद्य त्या मंदिरात द्यायचा आहे.

हे लाडू देऊन तिथे बसून या मंत्राचा जप करा. हा मंत्र आपल्या जीवनातील सर्व कष्ट दूर करतो. सर्व इच्छा पूर्ण करतो. तसेच अडचणींवर मात करण्याचं बळ यामध्ये आहे. ओम हं हनुमतये नमः या मंत्राचा जप करा. हा मंत्र फलदायी, यशदायी आहे.

कमीतकमी 21 वेळा व जास्तीत जास्त कितीही वेळा याचा जप करा. त्यामुळे तुम्हाला मनाला शांती मिळेल व तुम्ही कामात पूर्ण लक्ष देऊ शकाल. तसेच त्यानंतर हनुमानाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालायची आहे. ही प्रदक्षिणा तुम्हाला 1, 3, 5 अशा विषम संख्येत घालायची आहे. संपूर्ण श्रद्धेने हे सर्व करा.

या प्रदक्षिणा घालताना जर तुम्हाला वाटेत एखादे नाणे दिसले, विशेष करून 1 रुपयांचे नाणे किंवा फुल मिळाले तर क्षणाचाही विलंब न करता हे पैसे किंवा फुल उचलून घ्या. त्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण करून आणखीन एकवेळ नमस्कार करून घरी परत जावे. हे नाणे किंवा फुल म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे व तसेच हनुमंताचा देखील आहे.

ते आपल्या देवघरात आणून ठेवायचे आहे. यानंतर एक मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे. हा जप मनोभावे, श्रद्धापुर्वक करायचा आहे. ओम श्री श्रीयेय नमः या मंत्राने धनप्राप्ती साठी असणारे मार्ग खुले होतात. त्यामुळे याचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. हा उपाय म्हणजे धनलाभासाठी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी केला जातो.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *