नमस्कार मित्रांनो,
तसं तर, भारतात अनेक वर्षांपासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याचीही अशा लग्नाला मान्यता आहे. त्यात मामाची मुलगी- आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे. महाराष्ट्रात जवळपास 25 टक्के लग्न हे जवळच्या नात्यामध्ये होतात. त्यात विशिष्ट समाजात याचे प्रमाण खूप जास्त आहे. मात्र, जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणा-या अपत्यात आनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते.
इतर आ-रोग्यविषयक समस्या जास्त असू शकतात. मात्र, या गोष्टीला वैज्ञानिक आधार नसल्याने नात्यामधील लग्नांना उत्तेजन दिले जाते. नात्यामधील लग्नांना वैद्यकीय भाषेत कॉनसॅनग्यूनस मॅरेज असे म्हणतात. त्यात तीन प्रकार आढळून येतात. त्यामुळे मामाची मुलगी म्हटली तर अगदी हक्काची बायको समजली जाते. याचबरोबर, सामान्यतः आपल्याकडे पहिलं गेलं तर महाराष्ट्रात वरील समज फार पूर्वीपासून प्रचलित आहे.
लग्नाला अनुरूप कोणी भेटली नाही की लगेच मामाची मुलगी करून घ्या यची. काही घरी तर लग्नासाठी दुसरीकडे मुलीचा शोध ही घेतलाच जात नाही. त्यातल्या त्यात भावाला मुलगी झाली असली तर कित्येक घरी लहानपणीच सं-बंध पक्के करून घेतले जातात. वचन ज-न्माचा वेळेसच घेतले जात की, तुझी मुलगी माझ्याच घरची सून बनेल आणि जर असा नाहीच झाला तर मग सख्या भावा – बहिनीच्या नातेसं-बंधात कटुता येते.
कारण आजकाल कॉलेज लाईफमध्ये पण अनेक मुलाना पाहील आहे की, त्यांची हक्काची प्रेयसी म्हणजे त्यांची मामाची मुलगी आणि त्यावरून कित्येक जणांना चिडवला ही जाते. खरं तसा बघायला गेलं तर हा फार चुकीचा समज आपल्या समाजात रोवलेला आहे. कारण या ठिकाणी आपल्याला धर्म किंवा त्या गोष्टींच्या अनुषंगाने काहीच यामध्ये सांगितले नाही.
मात्र तुम्हाला माहित आहे का, की नात्याताच लग्न का केले जाते? कारण या मागील सगळ्यात मोठा कारण म्हणजे घरातली संपत्ती घरातच राहावी आणि नातेसं-बंध अधिक बळकट व्हावे. जेव्हा स्त्री आणि पुरुष सं-बंध होतो तेव्हा निसर्ग नियमानुसार अपत्यप्राप्ती होते. परंतु येणारे अपत्य हे स्वास्थवर्धक असेल की नाही हे सर्वस्वी समागम करणाऱ्या स्त्री आणि पुरुषाच्या जनुकांवर अवलंबुन असते.
जर आपण सख्या बहीण आणि भावाचा विचार केला तर त्यांच्यात जनुके जवळपास 50% सारखे असतात. तसेच जेव्हा समान जनुके असलेल्या स्त्री आणि पुरुषाचा सं-बंध होतो तेव्हा त्यांच्यापासून होणाऱ्या अपत्यामध्ये बऱ्याच विकृती उद्भवतात जसे की जन्मतःच बालक विकलांग असणे, त्याची वाढ पुरेशी नसणे, बालक जन्मापासूनच मतिमंद असणे किंवा गतिमंद असणे. त्यामुळेच सख्खा बहीण आणि भावामध्ये कधीच लग्न नाही केला जात.
त्याउलट मामाच्या आणि आत्याचा मुलांमधे इतकी समानता नसते म्हणूनच त्यांचा लग्न केला जातं. परंतु याकडे साफ दुर्लक्ष केलं जात की, शेवटी तेही एकाच कुटुंबात असल्यामुळे काही प्रमाणात का असेना त्यांचाही जनुकांमध्ये समानता असतेच आणि त्याचा त्रास त्या पिढीला जरी नसला तरी येणाऱ्या पिढीला होतोच.
त्यामुळेच आपल्याकडे गोत्र बघण्याची एक पद्धत आहे. त्यामागे हाच हेतू असतो की गोत्र समान असेल म्हणजे कुठे तरी नातं हे असतंच म्हणून समान गोत्र असेल तर लग्न होत नाही. आमच्याकडे अजून एक पद्धत आहे ती म्हणजे मुलीच्या आणि मुलाच्या आडनाव/कुळ सारखा नसावा. तर त्यामागेही हेच कारण आहे. यामुळेच नात्यात लग्न न केलेले केव्हाही चांगलेच राहते.