ओम नमः शिवाय
यावर्षी शनिवार दिनांक 18 मार्च, 2023 रोजी महाशिवरात्री आली आहे ,ज्याची वाट आपण सर्वच जण आतुरतेने पाहत असतो. भगवान शंकर सदाशिव यांना प्रसन्न करून घेण्याचा हा दिवस आहे. भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा हा पवित्र दिवस, आणि अशा दिवशी भगवान शंकरांना प्रिय असणारी यापैकी कोणतेही एक किंवा शक्य झाल्यास जास्तीत जास्त झाडे आपल्या घरात, अंगणात लावा.
वास्तुशास्त्रानुसार महाशिवरात्री दिवशी ही झाडे घरी आणल्याने शंकराची कृपा आपल्यावर असीम कृपा बरसते. घरातील वास्तुदोष, स म स्या, पिडा , बाधा दूर होते आणि त्यामुळे घरात सुख समृद्धी, धनलाभ, समाधान नांदते. आपण आता अशी कोणती सहा झाडे आहेत जी महाशिवरात्री रोजी पवित्र दिनी लावली पाहिजेत हे पाहणार आहोत.
1. शमी:- शमीचे झाड हे आपल्याला प्रत्येक गावात, शहरात दिसून येते. अगदी नर्सरी मध्ये सुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल. हे झाड जर घरात किंवा अंगणात असेल तर सुख समृद्धीचा वास राहतो. शमीची पूजा केल्यानं सर्व देवी देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. आपल्यावर शनी देवाची दृष्टी असेल तर महाशिवरात्रीला रात्री शमीची पूजा करून तिथे एक दिवा लावावा. भगवान शंकर नक्की प्रसन्न होतील आणि शनिदोष देखील दूर होतो.
2. भांगेचं झाड:- भांगेचं झाड लावल्यानं भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यात चमत्कारिक गोष्टी घडू लागतात, भांग ही शंकराला अत्यंत प्रिय अशी गोष्ट आहे. भांग अर्पण केल्याने भगवान शंकर आपल्यावर सदैव आशीर्वाद बरसतात. काही वेळेस वैद्यशास्त्रात वेदना शमक म्हणून भांग वापरली जाते.
3.रुद्राक्ष:- रुद्राक्षाचे झाड महाशिवरात्रीला लावल्याने आपलं भाग्य प्रबळ बनतं, यशप्राप्ती होते, कामात सफलता मिळते. रुद्राक्षाचे झाड हे फार नशीबवान माणसांनाच मिळतं, कारण ते मिळणं खूप कठीण काम आहे.
4. बेलाचे झाड:- आपल्याला माहिती आहेच की शिव शंकराची पूजा करताना बेलाच खूप महत्व आहे. महाशिवरात्रीला बेलाचे झाड आपण लावले तर त्रिजन्म पाप नष्ट होते तसेच या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करावी व दान ध-र्म करावा.
5. रुई:- महाशिवरात्रीला सायंकाळी तुम्ही रुईचे झाड सुद्धा लावू शकता. पांढरी फुलं असलेली रुई अतिशय शुभ मानली जाते. आपल्या घराच्या विरुद्ध दिशेला लावू शकता. जर तुमच्या घरामध्ये वारंवार रोग निर्माण होत असतील, आजारपण सरत नसेल तर महाशिवरात्री दिवशी तुम्ही रुईचे झाड लावा जे तुमची शा रीरिक, मा-नसिकरित्या रक्षा करत तसेच वृद्धत्वाची स म स्या सुद्धा दूर करतं.
रुईच्या झाडाचे मूळ काहीजण हातात तर काहिजण गळ्यात ताविज स्वरूपात रक्षणासाठी घालतात. रुईच्या झाडाची पांढरी फुले महाशिवरात्रीला शंकराला नक्की अर्पण करा जेणेकरून तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होते.
6. धोतरा:- घरात सदैव लक्ष्मीचा वास हवा असेल, नेहमी सुख समृद्धी हवी असेल तसेच लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हे झाड फलीभूत ठरेल. पण हे झाड तुमच्या अंगणात अशा ठिकाणी लागवड करायचे की तिथे लहान मुले पोचणार नाहीत. धोत्र्याचे झाड, त्याची पानं, फुल आयुर्वेदानुसार खूप गुणकारी मानली जातात.
तसेच प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीला अनेकजण शिवशंभोला पांढरे शुभ्र धोत्र्याचे फुल अर्पित करतात ज्यामुळे भगवान शंकर नेहमीच आपल्यावर प्रसन्न राहतात. अशाप्रकारे वरील शक्य तितकी झाडे घरात किंवा अंगणात, घरच्या परिसरात महाशिवरात्री दिवशी अवश्य लावा. आणि त्या दिवशी त्यांची पूजा करा. भगवान शंकर आपल्यावर नक्की प्रसन्न होतील.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.