Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

घरातील दोष, रोग, शत्रूपिडा घालवण्यासाठी कुत्र्याला खावू घाला ही १ गोष्ट..दोष, आजारपण, शत्रू कायमचा दूर होईल..

नमस्कार मित्रांनो, आज आपण असा एक उपाय पहाणार आहे की या उपायाने आपले जीवन सहज सुखी, आनंदी आणि यशस्वी होऊन जाईल. या उपायाने दुःख, दारिद्र्य, कुभाग्य आपल्या जीवनातून निघून जाईल. आज आपण एक विशेष उपाय पहाणार आहे चला तर पाहू या उपयाविषयी.

आपण कुत्र्याला खास अशी वस्तू खायला घाला आणि आपल्या शत्रूवर विजय मिळवा. आपला शत्रू आपल्या जीवनामध्ये कित्येक अडचणी निर्माण करतो आपले शत्रू तेच असतात असे नाही की ज्यांच्या बरोबर आपली मारामारी होते शत्रू ते असतात जे आपले अहित चिंततात शत्रू ते देखील असतो जो आपला विरोधी असतो. जो आपल्या मागारे आपल्या बद्दल वाईट बोलतो.

शत्रू तो देखील असतो जो आपल्या काम धंद्यामध्ये समस्या निर्माण करतो शत्रू ती प्रत्येक व्यक्ती आहे जे आपले अहित चिंतते. आपल्याला त्यांना काही करायचे नाही परंतु आपल्याला त्यांनी केलेल्या क्रियाची का ट करायची आहे त्यांचे आपल्याला अहित कराचे नाही पण आपले हि ट सादायचे आहे त्यांनी केलेल्या तंत्र क्रियापासून आपला बचाव करायचा आहे.

तर या विषया सं-दर्भात शास्त्र काय सांगते ते आपण जाऊन घेऊ या श्रीलिं-ग पुरानामध्ये 52 भैरवाचा उल्लेख आढळतो आणि आजचा जो उपाय आहे तो भैरवाशी सं-बंधित उपाय आहे तसेच जितक्या योगिनी आहेत तितकेच भैरव आहेत. शिवपूरणानुसार कालाष्टमी हा एक विशिष्ट दिवस आहे या दिवशी रुद्र अवतार भैरव उत्पन्न झाले होते त्याचप्रमाणे पौराणिक मान्यतेनुसार भगवान शंकरांच्या शरीरातून भैरवाची उत्पत्ती झाली होती.

तसेच लोक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांना पाच मुख्य होते व सध्या आपण पाहतो की ब्रह्मदेवांना चार मुखे दर्शवली जातात तर पुरातन काळी ब्रह्मदेवांना पाच मुख होते व ते भगवान शंकरांच्या आज्ञेशिवाय पाचव्या वेदाची निर्मिती करत होते व यामुळे भगवान शंकर रुष्ट होऊन त्यांच्या क्रोधमुळे त्यांच्या शरीरातून भैरवानी ज न्म घेतला व ब्रह्मदेवांचे पाचवे मुख कापून टाकले यामुळे भैरवाला ब्रह्म ह-त्येचे पाप लागले.

शास्त्रातील श्री चिदंबरम रहस्य खंडातील आकाश भैरव कल्पामध्ये श्रावण महिन्यातील अष्टमीचे महत्व सांगितले गेले आहे व या तिथीला श्रावण कालाष्टमी असे म्हणतात. यामध्ये 52 भैरवामधील एक भैरव ज्यांचे नाव आहे चंड भैरव तसेच स्वरणाकर्षण भैरव तर कालाष्टमी दिवशी चंड भैरव व स्वरणाकर्षण भैरव यांच्या पूजनाचे विधान आहे शास्त्रात असे सांगितले आहे की चंड भैरवाना पूजणारे व्यक्ती आपल्या शत्रूवर विजय प्राप्त करतो.

तर आपल्याला या उपायात करायचे काय आहे तर कालाष्टमीच्या संध्याकाळच्या वेळी जेव्हा चंद्राचा उदय होतो त्यावेळी आपल्या घराच्या दक्षिण दिशेमध्ये एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर पांढरे कापड अंतरावे व त्यावर चंड भैरवाचा फोटो स्थापित करावा जर आपल्याकडे भैरव यंत्र असेल तर आपण भैरव यंत्र देखील स्थापित करू शकता व मनोभावे पूजन करायचे आहे.

भैरवाला चौमुखी दिवा लावावा चौमुखी म्हणजे चार वात असणारा दिवा व चंदनाचा धूप, अगरबत्ती लावावी व तसेच पांढऱ्या कनेरीचे फुले अर्पण करावीत व पांढऱ्या खाद्यपदार्थाचा नैवेद्य दाखवावा जसे तांदळाची खीर, पांढरे पेढे, शेवायाची इत्यादी. तर भैरवाला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा व हे खीर आपण स्वतः खाऊ नये ही खीर एखाद्या कुत्र्याला खायला घालायची आहे.

व नैवेद्याची खीर बनवताना अगदी अल्प प्रमाणात साखर वापरावी व तांदूळ,दूध अगदी थोडी साखर मिसळून खीर बनवावी आणि खीर थंड करून भगवान भैरवाना खिरीचा नैवेद्य दखवावा व ही खीर नंतर कुत्र्याला खायला घालायची आहे.

या संपूर्ण उपायाच्या वेळी आपल्याला एक विशिष्ट अश्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र आहे ॐ हुं हुं चंड भैरवाय भ्रं हुं फट् या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. या उपायामुळे निश्चितच आपण आपल्या शत्रूवर विजय प्राप्त कराल तर आपण हा उपाय आवश्य करावा.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *