नमस्कार मित्रांनो,
काहीजणांना आपली कुलदेवता माहिती नसते परिणामी कुलाचार पाळले जात नाहीत. आणि मग घरात अनेक प्रकारचे त्रास अडचणी व संकटे सुरू होतात. आज आपण कुलदेवता कशी माहीत करून घ्यावी या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. एक तर जी जुनी जाणती माणसं आहेत आशा लोकांची मदत घेऊन तुम्ही तुमची कुलदेवता माहीत करून घेऊ शकता. मात्र जर हे करणं शक्य नसेल. तर एक प्रभावशाली मार्ग आहे त्या मार्गाने जालं तर तुम्हाला तुमची कुलदेवता माहिती होईल.
तिच्या कुलाचारांचं पालन तुम्हाला करता येईल आणि यामुळे तुमच्या घरातील कोणतेही त्रास असेल ते संपुष्टात येतील. आपण हा उपाय कोणत्याही सलग येणाऱ्या 3 शुक्रवारी करायचा आहे. उपाय अगदी सोपा आहे. आपण 11 नागिनीचे पान घ्यायची आहेत. या प्रत्येक पानावर आपण 1-1 सुपारी मांडायची आहे जर तुमची इच्छा असेल तर या सुपारी खाली 1 सिक्का सुद्धा ठेऊ शकता.
या 11 सुपाऱ्या मांडताना पहिली सुपारी श्री गणेशाच्या नावाने ठेवा, दुसरी सुपारी आपल्या कुलदेवता च्या नावाने तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नाही फक्त कुलदेवतेच्या नावानी ठेवायचे आहे. तिसरी सुपारी कुलपुरुषाच्या नावाने, चौथी सुपारी वास्तु पुरुषाच्या नावे, पाचवी सुपारी वास्तु देवतेच्या नावाने आणि उरलेल्या ज्या सहा सुपाऱ्या आहेत त्या तुमच्या कुलदेवतेच्या नावे तुम्ही ठेवायच्या आहेत. या प्रकारे ही मांडणी केल्यानंतर प्रत्येक सुपारीला हळदी-कुंकू वाहायचं तसेच नैवेद्य म्हणून गोड आणि खार हे दोन्ही प्रकारचे नैवेद्य आपण ठेवणार आहोत.
काही कुलदेवतांना गोडाचा नैवेद्य असतो तर काही कुलदेवतांना मावसांहर म्हणजेच ज्याला आपण खार असं म्हणतो. आता आपल्याला आपली कुलदेवता माहीत नसल्याने आपण हे दोन्ही प्रकारचे नैवेद्य ठेवणार आहोत. गोड नैवेद्य म्हणून शिरा, साखर ठेऊ शकता आणि खार नैवेद्य म्हणजे उकमा हे ठेऊ शकता.
महत्वाची गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी तांबोल म्हणजे पानाचा विडा हे नक्की त्याठिकाणी अर्पण करायचं आहे. तर पहिल्या शुक्रवारी आपण आशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे. आणि प्रार्थना करायची आहे की आमची जी कुलदेवता आहे ती आम्हाला माहिती होऊ देत. तर आशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल की कुलाचारचे पालन न केल्यामुळे जे काही त्रास तुम्हाला होत होते हे त्रास पहिल्याच आठवड्या मध्ये कमी होतील.
दुसऱ्या शुक्रवारी आपण पहिल्या शुक्रवारी ज्या प्रकारे पूजा केलात त्याच प्रमाणे पूजा करून. एखाद्या सवासनी स्त्रीला आपल्या घरी आमंत्रित करायचं आहे. आणि मोठ्या प्रेम भावनेने तिची ओटी भरायची आहे तिला दूध साखर देऊन त्या स्त्रीला आपली कुलदेवता समजून नमस्कार करायचं आहे.
आता तिसरा शुक्रवार म्हणजे अंतिम शुक्रवारी तुमच्या घरातील जी भाऊ बंधू किंवा तुमची भावकी आहेत यांना तुमच्या घरी आमंत्रित करायचं आहे. आणि ज्या प्रकारे पूजा सांगितली आहे त्याप्रमाणे पूजा करून. आपण ज्या-ज्या व्यक्तींना घरी बोलवलं आहे त्यांना जेवण करू घाला. याला आपण कुलाचार पाळणं असं म्हणतो.
तर आशा प्रकारे 3 शुक्रवार आपण हा उपाय केलात तर तुमची जी कुलदेवता आहे ती आपोआप प्रसन्न होते. आणि मग ती कुलदेवता कोण आहे ही जाणून घेण्याची आवश्यक तुम्हाला भासणार नाही.