Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

कोजागिरी पोर्णिमा- घरी पूजन कशा प्रकारे करावे…साक्षात लक्ष्मी घरात येत असते..

नमस्कार मित्रांनो,

उद्या म्हणजेच ९ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. दरवर्षीं तिथीनुसार आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतांच्या अनुसार या रात्री अवकाशातून अमृत वर्षाव होतो अशी श्रद्धा असते.

याशिवाय शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या सोळा कलांमध्ये असतो आणि त्यातून निघणारी किरणे अमृतसारखी असतात. शरद पौर्णिमेला खीर रात्रभर खुल्या आकाशाखाली ठेवली जाते. चंद्राची अमृतसदृश किरणे खीरमध्ये पडली की ती अमृत बनते असे मानले जाते.

का केले जाते लक्ष्मी पूजन- कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला दुधाचा दैवत दाखवल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणून कोजागिरी पौर्णिमेला लक्षीमीची पूजा केली जाते म्हणून श्री लक्ष्मी, शोभा लक्ष्मी, लक्ष्मी वित्त, लक्ष्मी गुण लक्ष्मी भाव लक्ष्मी,महालक्ष्मी अशा या लक्ष्मीचे रूपे आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या सर्व लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते.

देवी लाक्षिमी माता व त्यांचे सर्व रूपे परमदयाळू मानल्या गेलेल्या आहेत. तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दम्याचे आयुर्वेदिक औ-षध घेतल्यास लवकर लागू पडते म्हणून या दिवशी दम्याचे औ-षध घेण्याची पद्धत आहे.

अक्क्बाई संकटे आणते का? देवी लक्ष्मीची मोठी बहीण म्हणजे अक्काबाई या मात्र संकटे आणते असे मान्यता जाते. आक्काबाईला आळशी व्यक्ती नावडत्या आहेत जो कोणी व्यक्ती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी झोपतो त्याच्या आयुष्यात अक्काबाईचा फेरा येतो असे मान्यता आहे. म्हणून ही अक्काबाई कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरावरून फिरत असते व पहात असते कोण जागतय म्हणजे कोण कोजागर्ती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा हे नाव पडले आहे असे सांगितल्या जाते.

कसे करावे लक्ष्मी पूजन- कशी करावी याबद्दल ही शास्त्रात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोजागिरी पूजेची मांडणी करताना प्रथम एक पाट किंवा चौरंग घ्यावा, त्यावर एक पांढरे वस्त्र टाकावे नंतर विड्याचे दोन जोड पान घेऊन तांदळाच्या राशीवर दोन सुपार्‍या ठेवाव्या.

एक सुपारी म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक आणि दुसरी सुपारी म्हणजे कुबेराचे पती प्रतीक होय. नंतर एक तांदळाची रास घालून त्यावर पिताळाचा तांब्या ठेवावा. त्यात आंब्याचे पाने टाकावे हे आंब्याचे पाने चंद्राचे प्रतीक म्हणून मानतात अशाप्रकारे कोजागिरी पूजेची मांडणी केली जाते.

कोजागिरी पौर्णिमला या देवता देवलोकातून पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि लोक त्यांना प्रसन्न करण्यासाठी जागरण करून आटवलेल्या अमृत स्वरूप दुधाचा नैवेद्य या देवतांना दाखवून प्रसन्न करतात म्हणून कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. कोजागरी पौर्णिमाच्या रात्री लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केल्यास लक्ष्मी प्राप्त होते अशी मान्यता आहे.