Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

घरामध्ये या ठिकाणी ठेवा ५ कवड्या..पैसा वाढेल आणि वाढतच जाईल..माता लक्ष्मी प्रसन्न होईल..दिवाळी विशेष

नमस्कार मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा व्हावी. यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात. यासाठी मित्रांनो आज आम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक अतिशय साधा आणि तितकाच परिणाम कारक असा उपाय आज आपण पहाणार आहोत. या उपायासाठी आपल्याला ५ कवड्या लागणार आहेत.

कवडी आपल्या सर्वांना माहीत असेलच, अगदी पुरातन काळापासून कवडीचा उपयोग लक्ष्मी प्राप्ती साठी आणि धन प्राप्ती साठी करण्यात येतो. आज आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी या कवडीचा उपयोग करणार आहोत. मित्रांनो केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा कवडीला धनदायक मानले जाते.

कवडीचे अनेक प्रकारे वापर केला जातो. आज आपण त्या पैकी एक मार्ग या ठिकाणी पाहणार आहोत जो अतिशय सोपा आहे आणि तात्काळ प्रभाव दाखवणारा सुद्धा आहे. यासाठी आपण ५ कवड्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. शक्यतो सकाळी लवकर स्नान करून आपली नित्य कर्मे करून व देवपूजा करून,

देवघराच्या समोर बसून आपल्या समोर एक पिवळ्या रंगाच छोटस वस्त्र आपण टाकायचं आहे आणि या पिवळ्या रंगाच्या कापडावर ५ कवड्या या एका ओळीमध्ये ठेवायच्या आहेत. यानंतर या कवड्यांना केसर लावायचं व पूजा करून घ्यायाची आहे. आणि हात जोडून आपली जी इच्छा आहे ते बोलून दाखवायची आहे. धन प्राप्ती साठी या कवड्यांना विनंती करा आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद घ्या.

त्यानंतर या कवड्याची पोटली बांधायची आहे. पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचे आहे आणि ही पोटली आपण ज्या ठिकाणी आपले धन, पैसा ठेवतो किंवा मौल्यवान वस्तू ठेवतो अश्या ठिकाणी ही पोटली आपण ठेवायची आहे. हा उपाय करतांना आपण ती पोटली ज्या ठिकाणी ठेवली आहे, तिजोरीत किंवा दुकानाच्या गल्ल्यात आपण ही पोटली ठेवली आहे.

त्या ठिकाणी आपण ज्यावेळी रक्कम ठेवायला जाऊ त्यावेळी श्री लक्ष्मीच्या नावाचा उल्लेख आवर्जून करा श्री लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा केवळ श्री महालक्ष्मीच्या नावाने जरी प्रार्थना केलात तरी सुद्धा चालेल. तुम्हाला दिसेल की अगदी काही दिवसातच पैसा तुमच्या तिजोरीकडे आकर्षित होईल व पैश्याची आवक वाढेल विनाकारण खर्च होत असेल तर तो कमी होऊ लागेल.

पैशांची आवक वाढू लागेल. मित्रांनो हा अतिशय चांगला आणि साधा उपाय आहे आणि तितकाच परिणाम कारक सुद्धा आहे. मात्र एक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ज्या कवड्या आपण वापरणार आहोत त्या तु’टलेल्या किंवा घराब झालेल्या कवड्या असू नयेत चांगल्या कवड्यांचा आपण वापर करा. आणि केसर लावताना सुद्धा चांगल्या प्रकारचे केसर असेल याची आपण काळजी घ्या.

आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहण्यासाठी महालक्ष्मीचा नामउच्चार करण्यास अजिबात विसरू नका. तसेच महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरातील अन्न आणि दूध सुद्धा आपण नेहमी झाकून ठेवायला हवं काहीजण दूध उघडे ठेवतात अन्न उघडे ठेवतात तर हे आपण करू नये. याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.

हे लहान सहान जे उपाय आहेत त्यांची सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी. जेणे करून आपण जो हा कवडीचा उपाय करत आहोत त्याचा इच्छित परिणाम आपल्याला लवकरात लवकर मिळेल. मित्रांनो हा उपाय एकदा नक्की करून पहा. थोड्या दिवसातच तुमच्याकडे पैसा, धन, दौलत मिळायला सुरुवात होईल. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसेल.

टीप :- मित्रांनो वरील माहिती व उपाय हे सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेले आहेत. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *