प्रत्येक कामात येत असेल अडचण तर हा उपाय नक्की करा…सर्व नजरदोष, बाधा दूर होवून काम यशस्वी होते..

नमस्कार मित्रांनो,

जर तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील तर हा उपाय नक्की करा. आपल्या कुंडलीतील गुरू ग्रह अत्यंत महत्वाचा असतो. जर गुरू दोष असेल तर या गुरू दोषाची शांती करण्यासाठी गुरूला प्रसन्न कराव लागतं. सुखी वै-वाहिक जीवनासाठी गुरू ग्रह अत्यंत महत्वाचा आहे.

मुलींचे जर विवाह ठरत नसतील तर त्यासाठी सुद्धा गुरू ग्रह महत्वाचा मानला जातो. पुरुषांना जर जॉब, कामात यश मिळत नसेल तर यासाठी सुद्धा गुरू ग्रह कारणीभूत ठरू शकतो. आजचा विषय आहे की तुम्ही कोणतही काम हाती घेता आणि त्यात अडचणीच अडचणी येतात ते काम अर्धवट राहत.

तर लक्षात घ्या तुमच्या कुंडलीतील गुरू ग्रह खराब आहे. तस तर गुरू ग्रह धनु व मिन राशीचा स्वामी ग्रह आहे. गुरू ग्रह शुभ ग्रह आहे पण कधी कधी गुरू ग्रह राहू , केतू , शनी, मंगळ या ग्रहान सोबत गुरू ग्रह गेला किंवा गुरू ग्रह आपल्या कुंडलीतील नीच स्थानी असेल तर हा गुरू ग्रह आपल्या साठी अडचणीचा कारण ठरतो.

यामुळे अनेक अशुभ फळे प्राप्त होतात. तर यावर उपाय काय? या कामातील अडचणी कश्या दूर करता येतील? हे आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे. आणि उठल्यानंतर आपली नित्यकर्म आटोपयचे आहेत म्हणजेच अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून.

त्यानंतर आपल्या देवघरात जाऊन भगवान विष्णूंची आपण पूजा करायची आहे. पूजा करताना शुद्ध तुपाचा दिवा लावायला विसरू नका. हे तूप गाईच असावं म्हशीच किंवा तत्सम प्राण्यांच नको. पूजा करून झाल्यावर विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करायचा आहे. पाठ करणे शक्य नसेल तर मोबाईल वर ही ऐकू शकता.

आशा प्रकारे पूजा व पाठ करून झाल्यावर आपल्या कपाळावर हळदी ने किंवा केसर ने तिलक लावायचा आहे. आणि आपल्या आई-वडिलांचे किंवा घरातील जे जेष्ठ व्यक्ती असतील त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तसेच जेष्ठांना पिवळ्या रंगाची वस्त्र भेट म्हणून द्यायचे आहेत. जर आई-वडिलांचे दर्शन तुम्ही रोज घेतलात तर तुमचा गुरू ग्रह अत्यंत प्रभळ बनतो. तर आशा प्रकारे आपण हा उपाय करायचा आहे.

आता आपल्याला सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपल्या घराजवळ जर केळीच झाड असेल किंवा शेतामध्ये असेल. तर त्या केळीच्या झाडाखाली तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा. आणि त्या ठिकाणी प्रसाद म्हणून बेसन लाडू असतील किंवा बेसन पासून बनलेली कोणतीही मिठाई असेल हे आपण त्या ठिकाणी ठेवायचे आहे.

दर्शन घेऊन झाल्यानंतर प्रसाद म्हणून ठेवलेली मिठाई घरच्या लोकांना व आजूबाजूच्या लोकांना द्यायची आहे. हा एक सोपा उपाय केल्याने गुरू ग्रह प्रसन्न होतो. गुरू दोष निघून जातो व गुरुची शांती होते. आणि तुमचं कोणतही काम असुद्या त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मात्र तुम्हाला मेहनत ही तितकीच करावी लागणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *