नमस्कार वाचक मित्रानो,
तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये श्रीविष्णू यांच्या प्रत्येक रुपाची कहाणी सांगितली गेलेली आहे. श्री विष्णूच्या कल्की अवताराबद्दल काही माहिती सांगितली आहे. यामध्ये असे सांगितले आहे की, कलियुगात धर्माचा नाश होईल. या युगात राक्षस वृत्तीचे लोक भरपूर प्रमणात आढळतील. कलियुग हा काळ पृथ्वीचा विनाश करण्यासाठी हा काळ आहे असे देखील शास्त्रामध्ये म्हंटले आहे.
कलियुग हा अतिशय शापित आहे. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की,या काळामध्ये ध-र्माचा नाश होत असताना श्री हरी विष्णु हे आपले कलकी अवतार घेवून अधर्माचा नाश करून पुन्हा या धरतीवर धर्माचा संचार पसरवतील परंतु या लेखामध्ये आपण खूप महत्वाच्या रहस्यमय गोष्टी जाणून घेणार आहोत.
द्वारपालामध्ये म्हणजे ज्या वेळी महाभारत चालू होते त्या वेळी श्रींनी या कलियुगातील काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. महाभारत हा ग्रंथ समस्त मानवजातीला उपयुक्त असणारा हा ग्रंथ आहे. यामध्ये मानवजातीला उपयुक्त अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे या कलियुगातील सर्वच लोक हे दुतोंडी असतील म्हणजेच त्यांच्या मनामध्ये दुसरेच कोणते तरी विचार चालू असतील
आणि वरून वेगळेच वागत असतील. एखादा मनुष्य आपल्याला बाहेरून खूप चांगला वाटतो. परंतु त्यांच्या मनामध्ये दुसर्याच गोष्टीचा विचार म्हणजेच त्या व्यक्तीच्या नुकसानीचे विचार चालू असेल, असे प्रकारचे लोक देखील असतात. नेहमी दुसर्यांशी गोड गोड बोलून आपले कार्य साध्य करणारे लोक देखील असतात.
दुसरी गोष्ट म्हणजे या कलीयुगामध्ये असे लोक असतील जे दिसायला खूप विद्वान आहेत. परंतु वास्तवात हे लोक हुशार नसतात. हे लोक राक्षस वृत्तीचे असतील. यामुळे आपल्या सृष्टीचा नाश करतील. या युगामध्ये लोक खूप स्वार्थी बनतील.या युगामध्ये लोकांच्या मनात फक्त द्वेष निर्माण होईल. यामुळे अनेक वाईट कृत्य देखील घडेल.
तिसरी गोष्ट म्हणजेच कलियुगातील प्रत्येक आई आपल्या मुलावर खूप जास्त प्रेम दाखवेल. हे अति प्रेम तिच्या मुलासाठी खूप घा-तक ठरेल. यामुळे मुलांची प्रगती कधीच होणार नाही.मोह, मायामुळे मुले आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा बाळगणार नाहीत. यामुळे त्यांचे जीवन संपून जाईल.
चौथी गोष्ट म्हणजे कलियुगातील असे लोक असतील जे खूप खूप बंगले बांधण्यासाठी ,मुलाच्या शिक्षणासाठी आणि इतर कारणांसाठी खूप पैसे खर्च करतील.एखाद्या गरजू व्यक्तीला मदतीची गरज असेल तर पैशांची मदत करणार नाही. ते खूप लोभी वृत्तीचे असतील. हे लोक फक्त स्वताचा विचार करतील.
पाचवी गोष्ट म्हणजे या कलियुगाचा अंत होताना लोकांना खूप त्रास,वेदना सहन कराव्या लागतील. खूप वाईट हा काळ असल्यामुळे लोकांना त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागणार आहेत. या कलीयुगामध्ये असमानता भरपूर प्रमाणात वाढणार आहे.
या काळामध्ये असे काही लोक असतील जे देवाचे नामस्मरण करतील.गरजू लोकांना नेहमी मदत करतील. उत्तम कार्य केल्यामुळे श्री विष्णूंचा आशीर्वाद देखील लाभेल.या लोकांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीची वृद्धी होईल.
वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमची प्रतिक्रिया कळवा,धन्यवाद.