महादेवांचे निवासस्थान रहस्यमय कैलास पर्वत ? जिथे विज्ञाण संपते तिथे अध्यात्म सुरु होते..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो हिंदू धर्मामध्ये तसेच संपूर्ण विश्वात आणि . भारतीय लोकांमध्ये कैलास पर्वताला धार्मिकरित्या अनन्यसाधारण महत्व आहे. कैलास पर्वत हा भगवान शंकरांचे निवासस्थान आहे असं मानलं जातं. चीनच्या तिबेट भागात आणि ट्रान्सहिमालयीन भागात कैलास पर्वत पसरलेला आहे. कैलास पर्वत हा जगातील सर्वाधिक रहस्यमयी पर्वत आहे. कैलास पर्वतावर कितीतरी रहस्ये आहेत जी अजूनही उजेडात आलेली नाहीत. आणि पुढेही येतील अशी शक्यता कमीच आहे. कैलास पर्वताची उंची ६६३८ मीटर म्हणजेच २१७७८ फूट आहे.

विविध धर्मात कैलास पर्वताला असलेले धार्मिक महत्व यामुळे कैलास पर्वत पृथ्वीवरचे पवित्र स्थान मानले जाते. धार्मिक महत्व आणि लोकांना येणाऱ्या अनुभवांमुळे कैलास पर्वताचे रहस्य अजूनच गडद होते.आजवर अनेक लोकांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. माउंट एव्हरेस्ट ची उंची ८८४८ मीटर आहे. जी कैलास पर्वतापेक्षा जवळपास २२०० मीटर जास्त आहे. माउंट एव्हरेस्ट पेक्षा कमी उंची असूनही आजवर कोणत्याही मानवाला कैलास पर्वत सर करता आलेला नाही.

मित्रांनो आणि भगिनीनो तुम्हाला सांगावेसे वाटते कि ८८४८ मीटर उंच असलेलं माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर करतात, तर त्यापेक्षा कमी उंची असलेला कैलास पर्वत सर करणं सहज शक्य व्हायला हवं. पण कैलास पर्वताच्या धार्मिक महत्वामुळे आणि कैलासावर असलेल्या अनेक रहस्यांनी कैलास पर्वतावर चढाई करणं हेच पूर्णपणे निषिद्ध मानलं गेलंय.भारतातील हिंदू, बौद्ध, जैन आणि बोन धर्मात कैलास पर्वताला अनन्य साधारण महत्व आहे. कैलास पर्वत हे सर्वच धर्मात पवित्र स्थान मानलं गेलं आहे.

कैलास पर्वतावर सृष्टीला नष्ट करण्याची क्षमता असणाऱ्या भगवान शंकरांचा निवास आहे असं हिंदू धर्मात मानलं जातं. त्यामुळे हिंदू धर्माने कैलास पर्वतावर चढाई करणं निषिद्ध मानलं आहे. भारतातील इतर धर्मांमध्ये सुद्धा कैलास पर्वतावर कोणत्याही मानवाने चढाई करू नये असं मानलं गेलंय.असं असताना सुद्धा १९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक साहसी गिर्यारोहकांनी कैलास पर्वत सर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण आजपर्यंत एकाही गिर्यारोहकाला यामध्ये यश आलेलं नाही.

अनेक गिर्यारोहकांप्रमाणेच कैलास पर्वतावर जतानाचा आपला अनुभव सांगताना म्हणतात की,“मी जेव्हा पर्वतावर जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग शोधला तेव्हा अचानक जोरदार बर्फ पडण्यास सुरुवात झाली, त्यामुळे पुढे जाणे शक्यच नव्हतं.” एक रशियन गिर्यारोहक सर्जी ख्रिस्तीकोव्ह सुद्धा आपला अनुभव सांगताना म्हणतो की, “जेव्हा आम्ही पर्वताच्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी पवित्र पर्वताच्या समोर उभा होतो. ज्या पर्वतावर कोणीही विजय मिळवू शकत नाही अशा पर्वता समोर मी उभा होतो.

मला अचानक माझ्या अंगात त्राण नसल्या सारख वाटायला लागलं, आणि असं वाटायला लागलं की मी या पर्वतावर नाहीच आहे. मला तिथून परत जावं असं वाटू लागलं. जसं आम्ही परत खाली उतरलो मला मुक्ती मिळल्यासारखं वाटलं.” कैलास पर्वतावर अनेकांना अनेक विलक्षण अनुभव आलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कैलासावर चढाई करायला गेलेल्या लोकांना आपले नख आणि केस हे अचानक वाढत असल्याचे दिसून आलेलं आहे. अवघ्या 12 तासात केस आणि नख हे 2 आठवड्यात जेवढे वाढतात तेवढे वाढल्याचं अनेकांनी नमूद केलेले आहे. केस आणि नखांची वाढ खूप वेगात होते.

कैलास पर्वताच्या आजूबाजूला वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आणि हवेमुळे या भागात वय अतिशय वेगात वाढतं असा अनुभव सुद्धा काही जणांनी घेतला आहे.काही गिर्यारोहक सर्बिया मधून कैलास पर्वतावर चढाई करण्यासाठी आलेले. त्यांनी तसा प्रयत्न केला तेव्हा अचानक त्यांना त्यांचं वय वाढत असल्याचं जाणवलं. आणि त्यामुळे त्या सर्वांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला.

माघारी फिरल्यानंतर एक वर्षातच त्या सर्वांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. रशियन नेत्ररोग तज्ञ असलेले अर्नेस्ट मुलाडेसेव्ह यांनी कैलास पर्वताचा अभ्यास करण्यासाठी आखलेल्या मोहिमेत जिओलॉजिस्ट, इतिहास संशोधक आणि फिजिक्स विषयातील तज्ञांना समाविष्ट केले होते.कैलासाच्या पायथ्याशी अनेक महिने केलेल्या संशोधन आणि अभ्यासावरून त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं की कैलास पर्वत हा मानवनिर्मित पिरॅमिड आहे. कैलास पर्वताच्या वर अनेक लहान मोठे पिरॅमिड असून त्या सर्वांनी मिळून कैलास पर्वत बनला आहे. हे सर्व एक असामान्य घटनेचा भाग आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे.

अर्नेस्ट यांनी पुढे असही लिहलं आहे की, “कैलास पर्वत या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा करणं खूप कठीण आहे. पण मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की कैलास पर्वताचा संबंध हा पृथ्वीवरील मानवी जीवनाशी जोडलेला आहे.” काही धार्मिक पुराव्यांच्या आधारे कैलास पर्वताला सगळ्या जगाचा केंद्रबिंदू मानला गेला आहे. विज्ञान आणि भक्ती यांचा संगम जिकडे होतो त्या कैलास पर्वतावर स्वर्गाचा रस्ता आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच जगातील करोडो लोकांच्या मनात कैलासा प्रति भक्तीयुक्त आदर आहे.

स्पेनच्या गिर्यारोहकांच्या एका टीम ला चीनने २००१ साली कैलास पर्वतावर चढाई करण्याची परवानगी दिली होती. पण कैलास पर्वता बद्दल जगभरातील लोकांच्या मनात असलेला आदर आणि भक्तिभाव, आणि कैलास पर्वताच्या पावित्र्याचा मुद्द्यावरून वाढलेल्या दबावामुळे चीन ला कैलासावर होणाऱ्या मोहिमांवर कायमस्वरूपी बंदी आणावी लागली.

कैलास पर्वताच्या बाजूला असलेल्या २ जलशयांपैकी एक आहे मानसरोवर. मानसरोवर हे जवळपास १५०६० फूट उंचीवर म्हणजेच ४५९० मीटर उंचीवर आहे. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेलं सरोवर म्हणून मानसरोवर ला ओळखलं जातं.मानसरोवर हे गोल असून त्याची खोली ९० मीटर आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ४१० चौरस किलोमीटर आहे. इकडेच ब्रह्मपुत्रा, इन्ड्स आणि घागरा नद्यांचे उगमस्थान आहे. मानसरोवर हे पौराणिक दृष्ट्या खूप महत्वपूर्ण आहे.

मानसरोवर पासून जवळच म्हणजे फक्त ३.८ किलोमीटर वर अजून एक तळं आहे. त्याच नाव राक्षसतळ असं आहे. हे तळं मानसरोवरपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे.राक्षसतळ हे रावणाने शंकराला प्रसन्न करताना बनवलं होत अशी कथा सांगितली जाते. या तळ्याच पाणी खारट आहे. इकडूनच सतलज या नदीचा उगम होतो.दोन्ही जलाशये जवळ जवळ असून सुद्धा दोन्हीच्या पाण्यामध्ये खुपच फरक आहे. राक्षसतळ्यात कोणत्याही प्रकारचे जलचर किंवा वनस्पती यांचं आतित्व नाही.

त्याच बरोबर मानसरोवरचं पाणी हे नेहमी शांत असतं तर राक्षसतळ्याचं पाणी नेहमीच अशांत असत. कितीही मोठा वारा, वादळ असलं तरी मानसरोवरच पाणी नेहमीच शांत असतं.कैलास पर्वताच्या आजूबाजूला आशा अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत. दोन्ही सरोवरांमध्ये असलेली ही विविधता सुद्धा त्यातलचं एक रहस्य आहे.जग कितीही पुढे गेलं असलं तरी अजूनही काही प्रश्नांना उत्तरे शोधता आलेली नाहीत.

कैलास पर्वताचा एकूण आकार, कैलासावर लोकांना आलेले अनुभव, तिथले वातावरण हे अजूनतरी एक राहस्यच आहे.कैलास पर्वताचा उल्लेख वेदांमध्ये सुद्धा केला गेलेला आहे. वेदांमध्ये सुद्धा कैलास पर्वत हा पृथ्वीचा मध्यबिंदू आहे असा उल्लेख आढळतो.तिबेट मधल्या मिलरेपा नावाच्या एका बौद्ध भिक्षुने ९०० वर्षांपूर्वी कैलास पर्वत सर केलेलं असा उल्लेख आढळतो. तुला भिक्षु ने सुद्धा कैलासावर पुन्हा चढाई करू नये असं सांगितलेली कथा प्रसिद्ध आहे.

प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहोल्ड मिसनेर यांनी जगातील ८००० मीटर पेक्षा जास्त उंची असलेली सर्व शिखरं सर केलेली आहेत. त्यांना चीन सरकारने १९८० साली कैलास पर्वतावर चढाई करण्यासाठी बोलवलं होत.पण राईनहोल्ड मिसनेर यांनी चीन सरकारचं निमंत्रण नम्रपणे नाकारले होते.राईनहोल्ड मिसनेर यांनी उत्तर देताना एकदा म्हंटल होतं,

“आपण हा सर केला तर आपण लोकांच्या मनात असलेल्या भावनांचा अनादर होईल.कैलास पर्वता पेक्षा मोठी शिखरं आणि पर्वत आहेत तर सर करा. कैलास पर्वत सोबत लोकांची श्रद्धा जोडली गेली आहे, त्यामूळे त्याला ठेस पोहचेल असं काहीही करू नका.” जगातील अनेक रहस्य आपल्या पोटात घेऊन, आपल्या सोबत घेऊन पवित्र आणि अद्भुत असलेला कैलास पर्वत आजही हिमालयात मोठ्या दिमाखात उभा आहे.कैलास मानसरोवर ची यात्रा अनेक खडतर आव्हान असलेली यात्रा म्हणून ओळखली जाते.

या परिसरात ना रस्ते आहेत ना कोणतं विमानतळ. इकडून प्रवास करायचा असेल तर निसर्गाला शरण जाऊन खडतर असा पायी प्रवास करावा लागतो. निसर्गाला शरण गेलात तरच या अद्भुत पर्वताचे आणि तिथल्या रहस्यमयी गोष्टींच दर्शन होऊ शकेल. जिकडे विज्ञानाचे रस्ते बंद होतात, तिकडे आध्यात्म सुरू होते. याच जिवंत उदाहरण म्हणजे कैलास पर्वत.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *