जेव्हा शनिदेवाची दृष्टी श्री कृष्णावर पडली तेव्हा जे घडले..पाहून तुम्हालाही धक्का बसेल..बघा त्यावेळी असे काय घडले होते

मित्रांनो, शनिदेव हे नाव तर सर्वांना प्रचलित आहे. न्यायाचे देवता शनिदेव यांचे नाव जरी घेतले तरी मनुष्याच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. शनिदेव मनुष्याला त्याच्या कर्माचा हिशोब करूनच फळ देत असतात. त्यांची एक नजर पडताच भल्या भल्यांची वेळ बदलते. परंतु तुम्हाला माहित आहे का ? भगवान श्रीकृष्ण यांच्यावर जेव्हा शनिदेवांचे दृष्टी पडली तेव्हा,

पुऱ्या सृष्टी वरती हाहाकार माजला होता. पौराणिक कथांच्या नुसार, भगवान श्रीकृष्ण यांनी नंदगावात ज’न्म घेतला. भगवान श्री विष्णू यांचा हा मानव अवतार पाहण्यासाठी अनेक देवदेवता नंद गावात आले त्यापैकी एक शनिदेव देखील होते. शनिदेवाला पाहून सर्व लोक भयभीत झाले. गोकुळ वासियांना असे वाटले की, जर शनि देवाची दृष्टी श्रीकृष्णावर पडली तर श्रीकृष्णाला हानी होईल.

आलेल्या सर्व देवी देवतांना भगवान श्रीकृष्ण यांचे दर्शन घेण्याची अनुमती मिळाली परंतु माता यशोदाने शनि देवांना दारापाशीच उभे केले. यशोदेला वाटले की, तिचा मुलगा शनि देवाला पाहून भयभीत होईल. या सगळ्या प्रकारामुळे शनिदेव नाराज झाले आणि जवळच्या जंगलात बसून प्रार्थना करू लागले की, मनुष्याच्या कर्मानुसार,

शिक्षा देण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले आहे, मी मला दिलेले कार्य करतो आहे परंतु तरीही मनुष्य मला पाहून भयभीत का होतात सर्व देवतांना विष्णू रुपी मानवताराचे दर्शन मिळाले परंतु मला दर्शन घेण्याची अनुमती मिळाली नाही असे का ? त्या क्षणी भगवान श्रीकृष्ण यांनी कोकिळेचे रूप घेऊन शनि देवाच्या समोर प्रकट झाले आणि शनि देवांची समजूत काढली.

कोकिळेच्या रूपात भगवान श्रीकृष्ण आल्यामुळे भविष्यामध्ये ते वन कोकिळावन म्हणून प्रसिद्ध झाले. त्या वनात कोकिळांचा वास असतो. भक्तीने आणि श्रद्धेने जो व्यक्ती या वनाची परिक्रमा करेल त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. तेव्हापासून कोकिळा गावात श्रीकृष्णाच्या मंदिरा सोबत शनि धाम सुद्धा स्थापित करण्यात आले. असे म्हटले जाते की,

राजा दशरथ द्वारा लिहिलेल्या शनि स्तोत्राचे येथे पठण करून परिक्रमा केल्यास, शनिदेवाची कृपादृष्टी चांगली राहते. हि परिक्रमा करण्यासाठी देश विदेशातून लाखो भक्त येतात परंपरेनुसार शनिदेव वरती तेल अर्पण करतात. कोकिळावन तीर्थस्थळ हे मथुरा शहरांमध्ये नंद गावात आहे. येथे शनि देवाचे प्राचीन आणि भव्य मंदिर आहे. येथे आलेला भक्त गण आपली सम’स्या घेऊन येतो.

आणि शनिदेव आपल्या शक्तीने भक्तांच्या सम’स्या दूर करतात. खास करून शनिवारच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. देश देशांमधून भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आलेले लोक शनि देवाचे दर्शन नक्की घेतात. गरुड पुराण आणि नारद पुराण यामध्ये या कोकिळवनाचा उल्लेख केला गेला आहे. या वनात शनि देवाचे वास्तव्य भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून आहे असे मानले जाते.

साडेतीनशे वर्षांपूर्वी राजस्थान येथील भरतपूरच्या महाराजाने, कोकिळावनात असलेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार केला होता. त्या दिवसापासून आजपर्यंत या मंदिरांचा विकास होत आहे. मित्रांनो तुम्ही पाहिले की कसे भगवान श्रीकृष्ण कोकिळेचे रूप घेऊन आपल्या भक्ताला भेटण्यास आले होते कसे त्यांना वरदान दिले.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.