Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

जेजुरी गडाचे एक रहस्य…जुन्या जेजुरी गडावरून खंडोबा देव नवीन गडावर कसे आले? आजही त्याठिकाणी खंडोबा..

नमस्कार मित्रांनो, जय मल्हार

आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा यांची एक कथा सांगितली जाते. महाराष्ट्रमध्ये पंढरपुरचा विठ्ठल, कोल्हापुरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबाचे भक्त अनेक आहेत. परंतु, सर्वांना जुनी जेजुरी आणि नवी जेजुरी बद्दल फारसे माहिती नाही. हे जुने स्थान कडेपठारावर आहे. पण देव खंडोबा जुन्या गडावरून, नवीन गडावरती कसे आले याबद्दल काही कथा सांगितली जाते.

कित्येक वर्षांपूर्वी सुपे परगण्यातील खैरे हे भक्त खंडोबा देवाची भक्ती करीत होते. ते १२ महिने कऱ्हेचे पाणी नदीतून नेवून, रोज गडावर पायी जावून देवाची पुजा करीत असत. मग कालांतराने, ते वृद्ध झाल्यावर त्यांना ते शक्य होईना. तेव्हा त्यांनी खंडोबा देवाला विनंती केली, की मी आता थकलो असून, यापुढे माझ्या हातून ही सेवा होणे शक्य वाटत नाही.

त्यावेळी, देवाने त्यांना ‘तू जेथे दमशील त्या ठिकाणी मी अवतरेन’, असे वचन दिले आणि देवानं मल्हारी मार्तंड हा जो सध्याचा गड आहे, तेथे वास्तव्य केले. तोच गड नवीन जेजुरगड होय. पण खंडोबा देवांचे मूळ स्थान हे कडेपठारच असल्याचे, सांगितले जाते. खंडोबा देवाचा अवतारात भगवान शंकराना का घ्यावा लागला, या मागेही इतिहास आहे.

प्राचीन काळात, लवथळेश्वर या ठिकाणी डोंगरावरती मोठे ऋषीमुनी निवास करीत होते. त्यावेळी मणि आणि मल्ल या दैत्य सर्वसामान्यांसह ऋषी-मुनींना खूप त्रास देत द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्वांनी मिळून लवथळेश्वर येथे शंकराची आराधना केली. सर्व योगी-मुनींना वाचविण्यासाठी शंकराने खंडोबाचा अवतार धारण केला आणि दैत्यांचा सं हा र केला, अशी कथा सांगितले जाते.

‘मार्तंडभैरवाचे रूप घेतलेल्या शंकराने दै’त्यांचा संहार करण्यासाठी हातात खड्ग घेतले अन् कडेपठारावर त्यांचा व ध केला म्हणून खंडोबा हे नाव पडले तर, म्हाळसेचा कांत (नवरा) म्हणून म्हाळसाकांत आणि मल्लांचे हरण केले म्हणून मल्हारी, अशी नावे प्रचलित आहेत.

काळभैरव म्हणजेच शिवशंकराचे मार्तंड भैरवनाथाची दोन पत्नी आहे, पहिली बायको म्हाळसा ही लिं-गायत समाजाची होती. तसेच यांना नेवशीही म्हणतात. एकदा नेवासींच्या एका मोठ्या व्यापाऱ्यांच्या स्वप्नांत,आपल्या मुलीचे खंडोबाशी लग्न झाल्याचे पडले. म्हणून ते देवाकडे गेले आणि म्हाळसा आणि खंडोबाचं पौर्णिमेला, पाली या ठिकाणी लग्न पार पडलं.

पुढे लग्न झाल्यानंतर, काही काळातच धनगर समाजातील मुलगी खंडोबाला दर्शनाला आल्यावर, त्या ठिकाणी देवांनी बाणाईला बघितलं.
तेव्हा या दोघांचे एकमेकांवर प्रेम झाले. त्या नंतर देव खंडोबाला बाणाईबरोबर लग्न करायचं होत. मग देवाचा सारीपाटाचा डाव म्हाळसेबरोबर ठरला आणि त्यावेली वचन दिलं की, तुम्ही जर सारीपाटाचा डाव हरला तर, देवाला बारा वर्षे वनवास करावा लागेल.

मग देव सारीपाटाचा डाव हारले आणि बारा वर्षे वनात निघून गेले. नंतर देव रूप घेऊन, बाणाईच्या बाबाकडे असलेली मेंढरं सांभाळण्याचे काम करून, बाणाईच्या घरी राहू लागले. मग एक दिवस देवाने ती सर्व मेंढरे मा-रून टाकली, आणि मा-रून टाकल्यानंतर बाणाईच्या बापाला म्हणाले की, तू माझं तुझ्या मुलीशी लग्न लावून दे

मग मी हि सर्व मेंढरे जिवंत करून देईन. मग बाणाईचे लग्न खंडोबा बरोबर झाले. अशी कथा मार्तंडभैरवाची सांगितली जाते, महाराष्ट्रातील धनगर समाज तसेच कोळी समाज, आगरी समाज देवांवर जीवापाड प्रेम करतो. बोला यळकोट यळकोट जय मल्हार !

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *