Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

जेवढा जास्त पूजापाठ करता तेवढाच घरात जास्त भांडणं, क्लेश, कलह का पसरतात…यामागील रहस्य जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो,

आपल्या घरात अनेक स्वभावांचे लोक राहतात. अशात अनेक वेळा एकमेकांच्या सवयी आणि विचार जुळत नाही. यामुळे नेहमी कुटूंबातील लोकात भांडणे, कलह होतात. या भांडणामुळे घरात नेहमी अशांती आणि क्लेश राहतो. वास्तुचे हे लहान लहान उपाय करुन भांडणांपासुन सुटका मिळवता येऊ शकते. प्रत्येकाला घरात शांततेचे वातावरण आवश्यक असते. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो.

परंतु बऱ्याच वेळा असे दिसून येते की, सर्व सोयीसुवीधी असूनही घरात शांतता नसते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणे होतात. यामुळे घराची शांती भंग होते. कधीकधी मानसिक समस्या देखील उद्भवतात, यामागे माता लक्ष्मी आपल्या घरावर नाराज असल्याचे दिसून येते.

त्याच बरोबर खुप व्यक्तींचे असे म्हणे येते की, कितीही नामस्मरण केले तरी सुद्धा घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. याचबरोबर, पौणिमा किंवा अमावस्या या दिवशी सर्व जोतिष उपाय केले तरी सुद्धा त्याचा लाभ मिळत नाही. त्याच बरोबर देवाची उपासना तसेच रोजच्या रोज पूजा केल्यावर सुद्धा त्याचे चागले परिणाम सुद्धा लवकर दिसून येत नाही.

घरात लक्ष्मी मातेचे आगमन होण्यासाठी केलेले उपाय सुद्धा त्याचा काही फरक पडत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचे अजून मन खिन्न होत जाते. मग यावेळी देवाची रोज पूजा करणे तसेच देवाची उपासना करणे या सर्व गोष्टी केल्या तरी गरीबही काही कमी होत नाही. तसेच आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही.

घरात आलेल्या पैसाला लगेच पाय फुटतात. पैसा घरात टिकत नाही. यामागील कारण म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे, आपण रोज देवाची पूजा करतो. पण त्या देव घरात आपली इष्ट देवता आहे का? तर नाही. या कडे आपण कधी लक्ष देत नाही. आपण रोज देवाची पूजा करतो पण आपल्या कुल देवांचे नामस्मरण आपण करत नाही.

आपल्या कुल देवतांची पूजा रोज करत जा त्यांचे नामस्मरण केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. कारण आपल्या कुल देवाची आराधना सर्वात चांगली गोष्ट आहे. याचबरोबर, दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना योग्य वागणूक देत नाही. काही वेळेस आपण आपल्या घरी कोणी अतिथी येतात पण ते आपल्या घरी कशाला आले असे बरेच प्रश्न येतात आपल्या मनात त्यांच्या बदल वाईट विचार येत असतात.

आपण हे लक्षात अशुद्ध अतिथी हे देवा समान असतात त्यांचा अपमान होईल असे वागू नका.तसेच तिसरी गोष्ट म्हणजे, जर आपण घराबाहेर जात आहोत आणि आपल्या मुख्य दरवाज्या समोर पालथे काही बूट, चप्पला असतील तर ते लगेच सरळ करा. त्या कडे दुर्लक्ष करू नका. आपल्या मुख्य दरवाज्या समोर अशा गोष्टी उलट्या असतील तर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात.

आपल्या घरात लक्ष्मी चे आगमन होत नाही. यामुळे लक्षात सुद्धा घरा बाहेर जाताना आपल्या मुख्य दरवाजामध्ये पालथी चप्पल किंवा बूट काढू नये. चौथी गोष्ट म्हणजे, आपल्या घरातील स्वच्छता बाबत जागृत नसतो. कारण बरेच लोक, न लागणारे समान सुद्धा घरात साठवून ठेवतात. घरात जे लोक भंगार साठवून ठेवतात त्या घरात लक्ष्मी वास करीत नाही.

कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. पाचवी गोष्ट म्हणजे, आपल्या खाण्या संबधी होय. आपण घरात अन्न शिजवतो आणि त्याचे सेवन करतो. पण काही वेळेस आपल्या हातून अन्नची नासाडी होते. आपण अन्न घराबाहेर टाकत असतो. त्यामुळे अन्नपूर्णा देवी नाराज होऊन घराबाहेर जाते आणि ज्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचे वास्तव्य घरातुन नष्ट होते.यामुळे घरात गरिबी येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *