नमस्कार मित्रांनो आपण सर्वच देवाची पूजा करतो पण प्रत्येकालाच हवे असलेले मिळते अशे नाही आग आपण हा विचार करतो की देव मलाच काही नाही देत . माझ्या सोबत कायम निष्टोर राहतो पण सर्वच दोष देवाला देता कामा नये .आपण आपल्या देवाची पूजा कश्या प्रकारे करतो हे ही पाहणे गरजेचे आहे.
मित्रांनो देवपूजा कशी करावी या बद्दल महाराजांनी लिहून ठेवले आहे.देवपूजादेव पूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे. प्रातःकाली स्नानानंतर देवपूजा करावी. सर्व पूजा सामग्री एकत्र करून, देवासमोर बसावे. पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा.प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे.
त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी, शंख जलाने भरावा. त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंख जल प्रोक्षण करावे. भुशुद्धी, भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरवात करावी.पुरुषसूक्ताने देवांच्या मूर्तीवर दोन हात, दोन पाय, गुडघे कंबर, बेंबी, हृदय, कंठ, मुख, नेत्र, मस्तक या स्थानी पुरुष सुक्ताच्या मंत्राने क्रम नसोडता न्यास करावा.
मित्रांनो मूर्तीला साक्षात देवरूप मानून नंतर पूजा करावी. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवित, गंध, फुल, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व पुष्पांजली हे १६ उपचार पुरुषसूक्ताचे एकेक ऋचेने देवाला द्यावे. गंधा नंतर अलंकार, चांगले भोग वाहावे.
मित्रांनो नैवेद्याला चार प्रकारचे अन्न द्यावे. श्रेष्ठ उपचार, विडा, दक्षिणा, आरती, फळे, स्तवन, गायन, नाच, वाद्ये, ब्राह्मणभोजन या उपचाराने देवाला संतुष्ट करावे. पूजेच्या आरंभी घंटानाद करावा, स्नान धूप, दीप देताना घंटा वाजवावी. स्नान, नैवेद्य, वस्त्र, यज्ञोपवित समर्पणानंतर आचमन देत जावे. प्रत्येक उपचाराला आचमन देत राहावे. देव पूजेच्यावेळी स्नान घालताना, महा्देवाशिवाय अन्य देवाला शंखाचे पाणी अर्पण करावे.
मित्रांनो आपल्या घराच्या बागेतील आणलेली फुले उत्तम, अरण्यातून आणलेली फुले मध्यम, विकत आणलेली फुले कनिष्ठ होत. पांढरी फुले उत्तम, लाल फुले माध्यम, काळीं फुले कनिष्ठ होत. शीळी फुले वर्ज्य करावी. फुलास भोक पडले असेल, बारीक किडे फुलात असतील, आपोआप गाळून पडलेली फुले, मळ लागलेली फुले, डाव्या हाताच्या स्पर्श झालेली, पाण्यात घातलेली फुले, फुलांचे तुकडे देवाला वाहू नये.
तसेच बकुळ,कमळ, अशोक, चमेली, दुर्वा, बेलपत्र, शमी, कुश, देवाला वाहावे. तुळस, कण्हेर, मोगरा, अशोक हि विष्णूला उत्तम होत. कांचन, आकाव (रुई) धोत्रा, सेमल कुडा हि विष्णूला वाहू नयेत.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.