Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

6 मार्च 2023…होळीच्या रात्री घरात इथे गाडा 1 खिळा…पैशांत खेळू लागाल….

नमस्कार मित्रांनो,

होळीच्या रात्री एक छोटासा टोटका नक्की करा. जर तुमच्या जीवनात आर्थिक समस्या चालू असतील आणि भविष्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या आर्थिक समस्या निर्माण होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर होळीच्या रात्री हा टोटका करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो आर्थिक समस्या म्हणजे काय? प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये पैशापाण्याच्या समस्या या कधी ना कधी येतातच. पैसा कमी पडू लागतो, किंबहुना पैसा येतच नाही. जीवनामध्ये गरीबी दरिद्रता निर्माण होऊ लागते. ही गरिबी निर्माण होण्याची अनेकविध कारणे असतात. कारणे कोणतीही असू द्या तुमच्या जीवनातील ही गरिबी ही दरिद्रता दूर व्हावी आणि येणाऱ्या जीवनामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला पैसा पाण्याच्या समस्या जाणवू नयेत यासाठी होळीच्या रात्री हा तोटका आवर्जून करण्यासारखा आहे.

होळीचीच रात्र का मित्रांनो वर्षभरात ज्या चार अत्यंत महत्त्वपूर्ण रात्री येतात की ज्या रात्री तमाम प्रकारचे तांत्रिक प्रयोग आणि तोटके सर्रास केले जातात त्यापैकी एक रात्र म्हणजे होळीची रात्र. महाशिवरात्री असेल होळी असेल किंवा दिवाळीची रात्र असेल या रात्रीचं एक विशेष महात्म्य आपल्या हिंदू धर्म ग्रंथांमध्ये आणि सोबतच तंत्रशास्त्र उपायांमध्ये सांगितलेल आहे. उपाय नक्की कसा करावा? यासाठी आपण होळीच्या रात्री सर्वात प्रथम लक्षात ठेवायची गोष्ट आहे ती म्हणजे सूर्यास्त होण्यापूर्वी सूर्य मावळण्यापूर्वी आपल्या घरामध्ये आपण दिवा बत्ती करायची आहे. जितके लाईट आहेत, जे दिवे आहेत हे सर्व दिवे लावायचे आहेत.

आपलं घर आपलं अंगण प्रकाशमान करायचे. जर तुमच दुकान आहे, फॅक्टरी आहे ऑफिस आहे तर त्याही ठिकाणी आपण अशा प्रकारे दिवाबत्ती करायची आहे. अशा प्रकारे आपलं घर प्रकाशमान केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती आहे अशा आपल्या देवघरासमोर जायचं आहे. बसायचं आहे आणि या देवघरासमोर बसून हा वेळा माता लक्ष्मीचा एक मंत्र आहे ओम श्री नमः ओम श्री नमः ओम श्री नमः या मंत्राचा अकरा वेळा आपण जप करायचा आहे. मित्रांनो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण हा टोटका करत आहोत. माता लक्ष्मीच आपण आवाहन करत आहोत.

अशा प्रकारे अकरा वेळा हा मंत्र बोलून गेल्यानंतर आपण आपल्या घरातला किंवा आपल्या ऑफिसमधला, फॅक्टरी मधला, दुकानामधला ज्या कुठे तुम्हाला हा खिळा मिळेल कोणताही एक खिळा काढायचा आहे. भिंतीमध्ये ठोकलेला किंवा घरात ठेवलेला दुकानांमध्ये ठेवलेला फक्त एक खिळा आपण घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही होळी प्रज्वलित करणार आहात, होळी दहन करणारा आहात होळी पेटवणार आहात त्या ठिकाणी छोटासा खड्डा करून त्यामध्ये हा खिळा गाडायचा आहे आणि त्यानंतर आपण होळी पेटवायची आहे.

होळीची पूजा वगैरे जो काही विधी आहे तो आपण करायचा आहे. जेव्हा होळी पूर्णपणे जळून जाईल होळीसाठी आपण जे साहित्य वापरले ते पूर्णपणे जळून जाईल हे साहित्य जळून गेल्यानंतर जो खिळा आपण त्या मातीमध्ये गाडला होता तो आता व्यवस्थित बाहेर काढायचा आहे. तो खिळा तुम्ही होळीच्या दिवशी बाहेर काढू शकता किंवा होळी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो बाहेर काढला तरीही चालेल. तर त्या ठिकाणी तो खिळा बाहेर काढायचा आहे आणि आपल्या घराचं जे प्रवेशद्वार आहे म्हणजे घराचा मुख्य दरवाजा ज्या दरवाजातून तुम्ही घरामध्ये प्रवेश करता किंवा घराच्या बाहेर पडतात त्या मुख्य दरवाज्याच्या बरोबर बाहेर छोटासा खड्डा खणून त्यामध्ये आपण हा खिळा गाडायचा आहे.

आता बहुतेकांच्या मुख्य दरवाजासमोर फरशी असेल किंवा इतर प्रकारची सामग्री असेल तर ही फरशी तुम्हाला काढावी लागेल त्या ठिकाणी पर्याय नाही. हा उपाय इतका कार्गर आहे की तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी तो सहाय्यभूत होतो. माता लक्ष्मीचा आगमन तुमच्या जीवनात का होत नाही कोण कोणते अडचणी आहेत या सर्व अडचणींचा निराकरण करण्याची प्रचंड ताकद आणि क्षमता या उपायांमध्ये आहे. अनेक लोकांना कदाचित हे करता येईल शक्य होणार नाही अशावेळी एक दुसरा मार्ग आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे.

हा मार्ग कसा आहे सर्वात पहिली गोष्ट आपण होळीच्या दिवशी सूर्यास्त होण्यापूर्वी आपल्या घरामध्ये आपल्या दुकानांमध्ये फॅक्टरीमध्ये जितके काही दिवे आहेत हे सर्व दिवे लावा दिवाबत्ती करा घर प्रकाशमान करा. त्यानंतर आपण एक खिळा घ्यायचा आहे आणि हा जो खिळा आहे तो सांभाळून ठेवा तुमच्याकडेच ठेवा आणि आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर प्रतिमेसमोर ओम श्री नमः ओम श्री नमः या माता लक्ष्मीच्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे. खिळा तुमच्या जवळच ठेवा कारण तुम्हाला तो नेऊन त्या ठिकाणी गाडण वगैरे शक्य होत नाहीये. आता होलिका दहन वगैरे होईल. या होळीच्या रात्री होळी जळून जाईल. होळी जळाल्यानंतर त्या ठिकाणीची जी गरम गरम राख आहे ज्यामध्ये थोडेसे निखारे सुद्धा असतील, असे निखारे असणारी राख आपण थोडीशी गोळा करा आणि ती आपल्या घरामध्ये घेऊन या आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत मध्ये म्हणजे मुख्य दरवाजाच्या आत मध्ये तो खिळा पण ठेवून द्या आणि त्या खिळ्यावर आपण गरम गरम राख टाकायची आहे.

ही राख त्या ठिकाणी टाकल्यानंतर हा खिळा आणि ही राख संपूर्ण रात्रभर त्याच ठिकाणी असू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ही राख काढा. तो जो खिळा आहे तो आपल्या मुख्य दरवाज्याच्या पुढे मुख्य प्रवेश्वराच्या पुढे आपण गाडायचा आहे. जमिनीमध्ये काढायचा आहे आणि राख आहे ती आपण कोणत्याही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. याही मार्गाने आपल्याला हा होळीचा टोटका आहे होळीच्या रात्रीचा उपाय आहे तो याही पद्धतीने करता येतो. मित्रांनो होळीच्या रात्री करावयाचा हा जो टोटका आम्ही तुम्हाला सांगितला आहे हा दत्त तंत्र या माध्यमांमध्ये येतो.

याचा अर्थ काय तर हा उपाय करताना किंवा हा टोटका करताना आपण मांसाहार सेवन करणे हे पूर्ण टाळायचे आहे. तसेच ज्याच्या दारू वगैरेची जे व्यसन आहे त्या व्यसनांपासून दूर राहायचे कारण दत्त तंत्रामध्ये जे टोटके केले जातात त्यांचे एक विशिष्ट नियम असतात. तर आपल्या घरात पैसा यावा, असलेला पैसा टिकून राहावा पैशाची तंगी कधीही जाणवू नये यासाठी हा टोटका आपण या होळीच्या रात्री आवर्जून करा.