नमस्कार मित्रांनो,
13 जुलै बुधवारचा दिवस आणि या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंप्रति कृतज्ञता दाखवण्याचा दिवस असतो. या दिवशी अनेक लोक आपल्या कुंडलील गुरू ग्रहाला मजबुती प्रदान करण्यासाठी अनेक प्रकारची उपाय करतात. आज आपण गुरुपौर्णिमेस करावयाचे असे 5 उपाय पहाणार आहोत की जे आपली आर्थिक स्थिती उन्नत बनवतात आणि आपला भाग्योदय करतात.
सोबतच जर वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील किंवा घरामध्ये अशांती असेल तर ती सुद्धा गुरू ग्रहाच्या कृपेने नक्की दूर होते. तर जाणून घेऊ या गुरुपौर्णिमेस आपण कोण कोणते उपाय करावेत. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपले कोणी ही गुरू नसतील. तर तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे जे तुमचे इष्ट देव आहेत त्यांना तुम्ही गुरू मानू शकता आणि त्यांचे पूजन या दिवशी नक्की करा.
ज्या कोणत्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवांना तुम्ही स्वतःचा गुरू बनवा. आणि तुमच्या जीवनात जी काही समस्या आहे ती समस्या त्या देवी देवते समोर व्यक्त करा. आणि समस्यातून मुक्त करण्याची प्रार्थना करा. तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते. अनेकजण गुरू यंत्र बनवून त्याची स्थापना आपल्या घरामध्ये करतात. तर या दिवशी गुरू यंत्र बनवून त्याची विधिवत पूजा करा आणि सोबतच हा मंत्र जप करा.
मंत्र असा आहे ॐ बृं बृहस्पतये नमः सातत्याने 108 वेळा हा मंत्र जप करून पहा. यामुळे गुरु ग्रह प्रचंड चांगल्या प्रकाची फळे देऊ लागतो आणि गुरूच्या कृपेने धन, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते. तुम्ही गुरू यंत्र बनवा किंवा बनवू नका मात्र या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा. जर गुरु ग्रह प्रसन्न असेल तर तुमचं जीवन सुखमय बनत हे लक्षात ठेवा.
या दिवशी आपल्या आजूबाजूला जे कोणी गरीब लोक असतील अशा गोर गरिबांना काही न काही दान धर्म आपण नक्की करा. जसे की पिवळ्या रंगाचे फळे, वस्त्र, धान्य, मिठाई असेल. आपल्या कुवती प्रमाणे जितके शक्य असेल तितका दान धर्म या गुरू पौर्णिमेच्या दिवशी केल्यास गुरू ग्रह निश्चितच शुभ फळे देऊ लागतो. अशुभ स्थानी गुरू ग्रहाचा प्रभाव सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
जे विद्यार्थी आहेत तर त्या वर्गाने शैक्षणिक क्षेत्रात यश मिळावं व करियर चांगलं घडावं यासाठी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवत गीतेचा पाठ नक्की करा किंवा भगवत गीता श्रवण करा. या सोबतच आपण भगवान श्री हरी कृष्णाची पूजा या दिवशी केलीत तर याने सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात प्रगती घडून येते.
या दिवशी जिथे कुठे गाय असेल तर त्या गाईची सेवा नक्की करा. तिला हिरवा चारा खाऊ घाला आणि गाई पुढे नतमस्तक होऊन आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळू देत स्मरण शक्ती तेज होऊ देत वाचलेलं लक्षात राहू देत अशा प्रकारची प्रार्थना विद्यार्थी वर्गाने गाईकडे नक्की करा.
जर तुमचे कुणी गुरू नसतील तर या गुरुपौर्णिमेला आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करा. त्यांच्या पुढे फक्त एक तुपाचा दिवा लावून ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः केवळ या एका मंत्राचा देखील जप केला तर भगवान श्री हरी विष्णू आपल्या जीवनातून समस्या, संकटे, दुःख, वेदना नक्की दुर करतात. फक्त विश्वासाने या गोष्टी आपण करा. तर या गुरुपौर्णिमेस हे काही छोटे उपाय आपण नक्की करून पहा.