Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

घराच्यासमोर पाणी शिंपडल्याने काय घडते…बघा वयस्कर लोक घरासमोर पाणी मा’रयला का सांगत असतात

नमस्कार मित्रांनो,

जुन्याकाळी सकाळी लवकर उठून आपल्या घरातील महिलांचे महत्वाचे काम असे, ते म्हणजे घरासमोरील अंगण स्वच्छ करणे व सकाळी त्या अंगणात पाणी शिंपडणे. कारण या मागे विविध प्रकारचे शास्त्रीय कारणे सुद्धा होती. या बद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्या घराचा दरवाजा नेहमी स्वच्छ असावं तसेच मुख्य दरवाजा समोर कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये.

कारण कोणत्याही चांगल्या गोष्टी आपल्या मुख्य दरवाजातून प्रवेश करतात. आपल्या घराच्या समोर घाण कचरा असेल तर आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होत नाही. तसेच त्या घराची प्रगती सुद्धा होत नाही. घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून आपल्या घराचं मुख्य दरवाजा व उंबरठा स्वच्छ करणं आवश्यक आहे. दाराच्या उंबरठ्यावर तांब्याच्या तांब्यात गंगाजल घेऊन पाणी शिंपडावे.

जर गंगाजल नसेल तर घरातील स्वच्छ पाणी शिंपडले तरी चालते. कारण रात्रभर नकारात्मकता जी आपल्या उंबरठ्यावर तयार झालेली असते ती आपल्या घरात प्रवेश करत नाही. तसेच दर शनिवारी व रविवारी आपल्या अंगणात पाणी नक्की शिंपडावे आणि त्यानंतर झाडून काडावे. अस केल्याने आपल्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

प्रत्येक सोमवारी मुख्य दरवाजा वर आंब्याचे तोरण सुद्धा तुम्ही लावू शकता. त्यामुळे घरातील लोकांचे स्वस्थ चांगले राहते. तसेच घरातील फरशी पुसताना थोडं मीठ टाकावे व फरशी पुसावी. त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण चांगलं राहत. आपल्या मुख्य दरवाजावर गणपतीची प्रतिमा नक्की लावावी. पण एक गोष्ट लक्षात असुद्या घरातील आतील बाजूस सुद्धा अजून एक गणपतीची मूर्ती लावा.

त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. काही व्यक्ती विविध देवाच्या प्रतिमा घरात शोकेसमध्ये ठेऊन देतात. असे चुकूनही करू नका कारण देव शेभेची वस्तू नाही. देवाची प्रतिमा किंवा मूर्ती हे देवघरात ठेवावी. मुख्य दाराच्या आतील बाजूस तीन मोराचे पीस लावावीत. त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो. त्याचप्रमाणे घरात कोणत्याही प्रकारच्या हिं स क प्राण्यांचे चित्र लावू नये.

त्याचबरोबर घरात छोट्या मनी प्लांट सुद्धा लावू शकता त्याचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात. घराच्या मुख्य दारावर जसा केर कचरा असू नये त्याचप्रमाणे जाळी जळमटे सुद्धा असु नये. त्याचप्रमाणे घरात कुठल्याही प्रकारचे जुनी कपडे किंवा न लागणारे वस्तू तसेच तुटक सामान सुद्धा ठेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *